५.१ तो एक कर्तृत्ववान माणूस होता. खूप मोठं कार्य उभारलं त्याने.त्याच्या अनुयायांनी त्याला देव मानला. आता त्याचे अनुयायी त्याच्या पूजेशिवाय काहीच करत नाहीत. ५.२ सर्वांच्या हृदयाला हात घालायचा म्हणून तो कलाकार खूप लोकप्रिय झाला. नंतर  त्याच्या भोवती पुरस्कारांची भिंत उभी राहिली आणि तो दिसेनासा झाला. ५.३ एकदा नदीच्या शेजारून जात असताना नदीने हाक मारली आणि

४.१ कोपऱ्यावरच्या रामय्याच्या टपरीला उर्जितावस्था येते आहे हे काल जगजाहीर झालं. परवापर्यन्त आमच्या कटिंग चहाचे पैसे बहीखात्यावर टाकणाऱ्या रामय्याने काल ‘आज नगद कल उधार’ ही पाटी लावली टपरीच्या पत्र्याला, आमच्याकडे पहात. ४.२ आशा कशाला म्हणतात ते हल्लीच पटलं मला जेव्हा मी ऐकलं की रेल्वेमार्गाचा एक रूळ दुसऱ्या रुळला म्हणत होता  ,”चल! भेटू लवकरच क्षितिजावर”. ४.३

३.१ लक्ष्मी सरस्वतीला म्हणाली, “मी असेन तर तुझी कुणालाच गरज नसेल” सरस्वती उत्तरली,”मी नसेन तर तुला मुळात कुणी ओळखणार कसं?” ३.२ टेक्नॉलॉजिमुळे वृद्ध आईवडीलांशी परदेशातून खूप वेळ व्हिडिओ चॅट करून त्यांना भेटल्याचं मनाचं समाधान तो नेहेमी करून घ्यायचा . पण त्याच्या आठवणीने पाणावलेले त्याच्या आईवडिलांचे डोळे कधी पुसू शकला नाही तो मोबाईलवरून. ३.३ रस्त्यावर पुस्तक

२.१ आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ; “मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!” २.२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ? जी मोजता येत नाही ती खरी उंची.” २.३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो.

१.१ त्याचे हात तिच्या हातात होते आणि नजर क्षितिजाच्या अथांगतेत. ती म्हणाली एकदा तरी माझ्या डोळ्यात बघ ना ! त्याचं उत्तर, त्यासाठीच सराव करतोय.. १.२ तिचे हात त्याच्या हातात होते.  दोघंही काहीच बोलत नव्हती.. संभाषण मात्र सुरु होतं. १.३ तो काही म्हणाला. तिने सगळं ऐकून घेतलं. ती काहीच म्हणाली नाही. त्यानेही सगळं ऐकून घेतलं… १.४

भगवद्गीता अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग    कैसे प्रकृती पुरुष ज्ञान ज्ञेय क्षेत्रज्ञाचे । क्षेत्र काय ते केशवा पार्थ म्हणे सांग साचे ।।                        ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे  ।।१।।   क्षेत्र अपुलीच काया हेचि जाणी रे कौंतेया । हेचि जाणी तो क्षेत्रज्ञ ऐसे मत ज्ञानियांचे ।।      

गीता अध्याय १८ मोक्षसंन्यास योग    अर्जुन म्हणे ऋषीकेशा । त्याग संन्यासाची दशा । जाणण्याची मज वांछा । सांगावी केशिनिसुदना ।।१।।   भगवान म्हणती त्याग । आधार जायचा भोग । हाच संन्यास विराग । त्याग सर्व कर्म फलाचा ।।२।।   सकाम कर्मासी टाकावे । विद्वान म्हणती मनोभावे । यज्ञ दान तपा न सोडावे । ऐसे

अध्याय १६ : दैवासुरसंपदविभाग योग ।   करिती पुढती वर्णन आता मोहन दोषगुणांचे । दैवी सदगुण सूरगणांचे दुर्गुण ते असुरांचे । जाणुनिया ते गूण जीवनी मलिन सरे चित्ताचे । दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१।।   निर्भय दानी सत्वशुद्ध करि चिंतन अध्यात्माचे । योग याग संयम चित्ताचा अनुशीलन वेदांचे । सत्य अहिंसा शांती व्रत

अध्याय : १५ पुरुषोत्तम योग    मधुसूदन हा  पूर्ण पुरुष अवतरला । पुरुषोत्तम नामे योग सार्थ उलगडला ।।   अश्वत्थ असा हा वृक्ष श्रुती वेदांचा । गगनात मुले संभार खाली शाखांचा । अगणित छंदपर्णांनी ऐसा नटला । जाणिता तयाला वेद अर्थ हा कळला ।।१।।   चहूकडे पसरती शाखा वरती खाली । विषयांच्या फांद्या आसक्तीच्या वेली

अध्याय १७ : श्रद्धात्रय विभाग योग    तीन तऱ्हांची भक्ती असते कसे तयांसी जाणावे । सात्विक राजस तामस त्यांचे प्रकार कैसे वर्णावे । कृष्ण सांगती ऐक अर्जुना कसे तयांसी उमजावे । श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१।।   जशी प्रकृती असे जिवाची श्रद्धा तशीच उद्भवते । जशा स्वभावे असे जन्मला श्रद्धा तशी तया

TOP