अध्याय १४ : गुणत्रयविभागयोग    ज्ञान असे जे करी मुनींना उघडी कवाडे सिद्धीची । करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।धृ ।।   असे ज्ञान जे उत्तमातले उत्तम आहे सर्वांसी । असे ज्ञान जे सुस्थिर होता देई दिव्य अनुभूतीसी । ज्ञान हेच साधले जयाला तमा न सृजना विलयाची । करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित

अध्याय १२ : भक्ती योग    पार्थ म्हणे रे सांग माधवा । योगी श्रेष्ठ कि भक्त केशवा । व्यक्तमयी अव्यक्त मांडिती । भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१।।   स्थिरबुद्धी माझिया रूपाशी । नित्ययुक्त सश्रद्ध मनाशी । उपासती ते मला पावती । भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।२।।   समानदृष्टी गात्र संयमी । आत्मचिंतनी अंतर्यामी । तेही अंती मला

अध्याय ११ : विश्वरूप दर्शन योग    ऐकुनी अतिगुह्य ज्ञान धन्य जाहला । मिटले अज्ञान सर्व मोह निवळला । प्राप्त होय दिव्य दृष्टी नेत्रदीप्त तो । परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो ।।१।।   उत्पत्ती विलय स्थिती सार्थ जाणुनी । कृष्णाचे अविनाशी रूप समजुनी । बघण्या ऐश्वर्य ते मनात इच्छितो । परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२।।   उमजतात

अध्याय १० : विभूती योग    परमब्रह्म श्रेष्ठ तू  परमधाम दिव्य तू । देवता शिरोमणी शाश्वतसे तत्व तू ।।१।।   असो असित देवलांचे देवऋषी नारदांचे । वा तुझे असो स्वयेच  कौतुकाचे बोल तू ।।२।।   चिन्मय हे तत्व तू परमशुद्ध सत्व तू । भूतांचा देव देव दानवा अगम्य तू ।।३।।   पार्थ म्हणे सांग तू

अध्याय ९ : राजविद्या राजगुह्य योग    कृष्ण म्हणे पार्था । गुह्यतम अर्था । जनी त्या सर्वार्था । दु:ख मोक्ष ।।१।।   गूढ ऐसे ज्ञान । पवित्र निधान । अनुभवे जाण । धर्म सुख ।।२।।   जया होई ज्ञान । आकळे विज्ञान । तया मोक्ष धन । दु:ख मुक्ती ।।३।।    राजविद्या ऐसी । म्हणती

अध्याय ८ : अक्षरब्रह्म योग    सांग मजसी तू खुणा । मोहना सांग मजसी तू खुणा ।।ध्रु १॥    काय ब्रह्म अध्यात्म कोणते । म्हणू कर्म अधिभूत कुणा ते । अधिदैवत अधियज्ञ कोणते । अंतकाळी तुज कसे स्मरू । अधिदेह म्हणावे कुणा । मोहना सांग मजसी तू खुणा ।।१।।   ओळख या तू खुणा ।

अध्याय ७ ज्ञान विज्ञान योग    अनित्यात भरले नित्य त्यास नाव ज्ञान । नित्य जन्म देत अनित्य आकळे विज्ञान । असा खेळ खेळत राही सृष्टीचा पसारा । हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा ।।१।।   धरा आप अग्नी वायू व्योम महाभूते । अहंकार बुद्धी चित्ते वृत्ती पूर्ण होते । परी नचही वृत्ती अपरा जीव मूळ धारा

अध्याय ६ – ध्यानयोगांतर्गत मन:संयम    अर्जुन वादला हे हृषिकेषा चंचल मन हे पाही । बलिष्ठ दृढ अन अस्थिर माझे चित्त स्थिरावत नाही ।।१।।   कधी आवरू जाता मन हे हाती येतच नाही । कधी बंधनामधे जसा हा  वारा मुळी न राही ।।२।।   निष्फळ का ते यत्न जयांची वृत्ती साधक नाही । विरती का

अध्याय ६ : ध्यान योग    टाकुनी फलकामना कर्तव्यकर्माला स्मरावे । सार्थ या चिदआत्मरुपाला कसे समजून घ्यावे । खोल दडल्या आत्मसूर्याला कसे ते  ओळखावे। कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१।।   जाणते सन्यस्त होती टाकती उपभोग सारे । साधना अष्टांगयोगाची करोनी कर्म द्वारे । साधला हा योग त्याने भौतिका टाकून द्यावे । कृष्ण आता सांगती ध्यानात ते

अध्याय ५ : कर्म संन्यास योग    पार्थ म्हणे कर्म सोडण्यास तूच सांगतो । परि फिरुनी भक्तियुक्त कर्म तू प्रशंसतो । श्रेयस्कर काय पार्थ सांगण्यास विनवितो । कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१।।   कर्म संन्यास एक एक कर्मयोग तो । दोन्ही मार्ग आक्रमोनी व्यक्ती मुक्ती साधतो । भक्तियुक्त कर्म परी त्यात श्रेष्ठ मार्ग तो ।

TOP