भगवद्गीता अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग    कैसे प्रकृती पुरुष ज्ञान ज्ञेय क्षेत्रज्ञाचे । क्षेत्र काय ते केशवा पार्थ म्हणे सांग साचे ।।                        ज्ञान क्षेत्र क्षेत्रज्ञाचे  ।।१।।   क्षेत्र अपुलीच काया हेचि जाणी रे कौंतेया । हेचि जाणी तो क्षेत्रज्ञ ऐसे मत ज्ञानियांचे ।।      

गीता अध्याय १८ मोक्षसंन्यास योग    अर्जुन म्हणे ऋषीकेशा । त्याग संन्यासाची दशा । जाणण्याची मज वांछा । सांगावी केशिनिसुदना ।।१।।   भगवान म्हणती त्याग । आधार जायचा भोग । हाच संन्यास विराग । त्याग सर्व कर्म फलाचा ।।२।।   सकाम कर्मासी टाकावे । विद्वान म्हणती मनोभावे । यज्ञ दान तपा न सोडावे । ऐसे

अध्याय १६ : दैवासुरसंपदविभाग योग ।   करिती पुढती वर्णन आता मोहन दोषगुणांचे । दैवी सदगुण सूरगणांचे दुर्गुण ते असुरांचे । जाणुनिया ते गूण जीवनी मलिन सरे चित्ताचे । दैवासुर गुणस्वभाव करिती मोहन वर्णन साचे ।।१।।   निर्भय दानी सत्वशुद्ध करि चिंतन अध्यात्माचे । योग याग संयम चित्ताचा अनुशीलन वेदांचे । सत्य अहिंसा शांती व्रत

अध्याय : १५ पुरुषोत्तम योग    मधुसूदन हा  पूर्ण पुरुष अवतरला । पुरुषोत्तम नामे योग सार्थ उलगडला ।।   अश्वत्थ असा हा वृक्ष श्रुती वेदांचा । गगनात मुले संभार खाली शाखांचा । अगणित छंदपर्णांनी ऐसा नटला । जाणिता तयाला वेद अर्थ हा कळला ।।१।।   चहूकडे पसरती शाखा वरती खाली । विषयांच्या फांद्या आसक्तीच्या वेली

अध्याय १७ : श्रद्धात्रय विभाग योग    तीन तऱ्हांची भक्ती असते कसे तयांसी जाणावे । सात्विक राजस तामस त्यांचे प्रकार कैसे वर्णावे । कृष्ण सांगती ऐक अर्जुना कसे तयांसी उमजावे । श्रद्धात्रय हे समजुन घेण्या सावध होऊन ऐकावे ।।१।।   जशी प्रकृती असे जिवाची श्रद्धा तशीच उद्भवते । जशा स्वभावे असे जन्मला श्रद्धा तशी तया

अध्याय १४ : गुणत्रयविभागयोग    ज्ञान असे जे करी मुनींना उघडी कवाडे सिद्धीची । करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित ऐशा त्रिगुणांची ।।धृ ।।   असे ज्ञान जे उत्तमातले उत्तम आहे सर्वांसी । असे ज्ञान जे सुस्थिर होता देई दिव्य अनुभूतीसी । ज्ञान हेच साधले जयाला तमा न सृजना विलयाची । करी त्रिविक्रम हितकर चर्चा परिचित

अध्याय १२ : भक्ती योग    पार्थ म्हणे रे सांग माधवा । योगी श्रेष्ठ कि भक्त केशवा । व्यक्तमयी अव्यक्त मांडिती । भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।१।।   स्थिरबुद्धी माझिया रूपाशी । नित्ययुक्त सश्रद्ध मनाशी । उपासती ते मला पावती । भक्तियोग श्रीकृष्ण सांगती ।।२।।   समानदृष्टी गात्र संयमी । आत्मचिंतनी अंतर्यामी । तेही अंती मला

अध्याय ११ : विश्वरूप दर्शन योग    ऐकुनी अतिगुह्य ज्ञान धन्य जाहला । मिटले अज्ञान सर्व मोह निवळला । प्राप्त होय दिव्य दृष्टी नेत्रदीप्त तो । परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो ।।१।।   उत्पत्ती विलय स्थिती सार्थ जाणुनी । कृष्णाचे अविनाशी रूप समजुनी । बघण्या ऐश्वर्य ते मनात इच्छितो । परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२।।   उमजतात

अध्याय १० : विभूती योग    परमब्रह्म श्रेष्ठ तू  परमधाम दिव्य तू । देवता शिरोमणी शाश्वतसे तत्व तू ।।१।।   असो असित देवलांचे देवऋषी नारदांचे । वा तुझे असो स्वयेच  कौतुकाचे बोल तू ।।२।।   चिन्मय हे तत्व तू परमशुद्ध सत्व तू । भूतांचा देव देव दानवा अगम्य तू ।।३।।   पार्थ म्हणे सांग तू

अध्याय ९ : राजविद्या राजगुह्य योग    कृष्ण म्हणे पार्था । गुह्यतम अर्था । जनी त्या सर्वार्था । दु:ख मोक्ष ।।१।।   गूढ ऐसे ज्ञान । पवित्र निधान । अनुभवे जाण । धर्म सुख ।।२।।   जया होई ज्ञान । आकळे विज्ञान । तया मोक्ष धन । दु:ख मुक्ती ।।३।।    राजविद्या ऐसी । म्हणती