अलक (अति लघु कथा) – भाग ५० – उपसंहार (Alak – Part 50 – epilog)
आजच्या अलक नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या लिहिल्या गेल्या. कुठल्याही कथेचा सुखांत किंवा दुःखांत एक साहित्यकृती म्हणून करता येऊ शकतो आणि साहित्य म्हणून, लेखकाचे विचार म्हणून, किंवा त्या साहित्यकृतीची गरज म्हणून त्या दोन्ही प्रकारचे शेवट करण्यात काहीच योग्य किंवा अयोग्य असं नाही. परंतु आजच्या अलक लिहीत असताना मनात विचार आला की अलकचं एखादं कथाबीज सुचल्यावर अलक एका
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ५० (Alak – Part 50)
अलक ५०.१ त्याला बातमी कळली आणि तो लगोलग सरांच्या घरी पोहोचला. सर तपोवृद्ध तर होतेच , पण वयोवृद्धही होते. कधीतरी ही बातमी अपेक्षित होतीच. तो पोहोचला तेव्हा घराबाहेर लोक जमा झालेच होते. काय असेल पुढची गोष्ट? सुखांत की दुःखांत ? कारण बातमी पुरस्काराचीही असू शकते किंवा मृत्यूची. तुम्ही कसा विचार केला असता? सकारात्मक की नकारात्मक?
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४९ (Alak – Part 49)
अलक ४९.१ काही क्षुल्लक कारणावरून तिचा उच्चविद्याविभूषित मुलगा तिच्यावर चरफडून, तिला वाटेल ते बोलून तिनेच तयार केलेला जेवणाचा डब्बा घेऊन बाहेर पडला.वाईट वाटून ती भरल्या डोळ्यांनी तिच्या दुसऱ्या मुलाजवळ येऊन बसली.त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले, कपाळावरचा घाम पुसला आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि एवढंच स्वतःशी पुटपुटली,”याला लोक मतिमंद का म्हणतात?”
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४८ (Alak – Part 48)
अलक ४८.१ गाण्यासाठी ‘लाइफटाइम अचिवमेंट अवॉर्ड’ घेऊन तो व्यसपीठावरून खाली उतरला. पत्रकाराने त्याला विचारलं ,” तुम्हाला स्वतःला आज कसं वाटतंय?, “अपूर्ण आणि म्हणूनच अपराधी” नम्रपणे इतकंच तो म्हणाला… अलक ४८.२ अमेरिकेत चौथ्या पिढीत जन्माला आलेला एक मुलगा आपलं मूळ शोधण्यासाठी भारतात आला. खूप जणांना विचारलं शेवटी एकाने सांगितलं आपला सगळा कुलवृत्तांत कॅलिफोर्नियाच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये जनिओलॉजि
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४७ (Alak – Part 47)
४७.१ तो दारूच्या ग्लासवर पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाकडे पहात होता. अचानक त्याला लक्षात आलं की त्याच्या गेल्या काही वर्षांच्या प्रवासात, ग्लासच्या आत असणाऱ्या दारूची उंची वाढली खरी पण त्याच ग्लासच्या बाहेर त्याला दिसत आलेल्या त्याच्या प्रतिबिंबाची उंची मात्र तितक्याच व्यस्त प्रमाणात घटली होती… ४७.२ त्याने आपल्या पत्र्याच्या छोट्या पेटीतलं मोरपीस हळुवार बाहेर काढलं आणि आपल्या डोक्यावरून
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४६ (Alak – Part 46)
४६.१ बहिण पोस्टाने राखी पाठवायची तेव्हा तो तिला अंधश्रद्धाळू म्हणायचा. तीच राखी हातातून खाली पडली म्हणून परत उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि सीमापार असणाऱ्या शत्रूच्या गोटातून सु सु करीत आलेली लक्ष्यवेधी गोळी त्याच्या डोक्यावरून त्याला इजा न करता निघून गेली…. ४६.२ दरवाज्यावर कुणाची तरी टकटक झाली तेव्हा तिने दार उघडल्यावर बाहेर अपेक्षा होती तोच होता.
- Published in alak






