Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • alak
  • अलक (अति लघु कथा) – भाग १ (Alak – Part 1)

अलक (अति लघु कथा) – भाग १ (Alak – Part 1)

by Rajendra Vaishampayan / Sunday, 20 November 2016 / Published in alak

१.१

त्याचे हात तिच्या हातात होते आणि नजर क्षितिजाच्या अथांगतेत.

ती म्हणाली एकदा तरी माझ्या डोळ्यात बघ ना !

त्याचं उत्तर, त्यासाठीच सराव करतोय..


१.
२

तिचे हात त्याच्या हातात होते.  दोघंही काहीच बोलत नव्हती.. संभाषण मात्र सुरु होतं.


१.
३

तो काही म्हणाला. तिने सगळं ऐकून घेतलं.

ती काहीच म्हणाली नाही. त्यानेही सगळं ऐकून घेतलं…


१.
४

त्याची काही स्वप्न होती. तिच्या स्वप्नात…  त्याचीच स्वप्न होती.


१.
५

तो गायचा तेव्हा ती देहभान विसरायची. ती आता कोमात आहे. तो आशेनी अजूनही गातोच आहे..


१.
६

तो उशीरा यायचा. ती वाट पहात रहायची..

तो आवरून झोपी जायचा… ती परत वाट पहात राहायची…


१.
७

त्याला पाऊस आवडत नाही म्हणून तो रुक्ष आहे असं तिला वाटायचं.  पण तिच्या डोळ्यातही त्यानं कधी मेघ दाटू दिले नाही..


१.
८

तो म्हणाला तू मला समजून घे.

ती म्हणाली मी सोडलंय तुला कधी?


१.
९

तो तिला त्याची स्वप्नं सांगायचा.

ती त्याची सारखी काळजी करायची.

मग अधिक सकारात्मक तीच होती नं !


१.
१०

तो तिला नेहेमी स्वावलंबी होण्याचे धडे द्यायचा.

ती गेली. आणि तो पूर्णपणे कोसळला.


१.
११

कितीही संकटं आली तरी तो कधीच डगमगला नाही.

मधून मधून ती मागे उभी आहे नं एवढीच खात्री करायचा …


१.
१२

त्याच्या स्पर्शात मागणी असायची, आणि तिच्या स्पर्शात तृप्ती.

मग दोघे कुठेतरी मध्यावर भेटायचे…

 

१.
१३

त्याच्या मनाच्या एका हळुवार कोपऱ्यात तिची जागा होती.

तिच्या हळुवार मनात फक्त तोच होता..


१.
१४

तो खूप आदळआपट करायचा. ती मुलांकडे बघायची आणि शांत राहायची.

आता मुलं आदळआपट करतात ती त्याच्याकडे बघते आणि शांत राहते.


१.
१५

दोघं खूप आनंदात होती. पण एका गोष्टीत त्यांचं खूप भिन्न मत होतं.

त्याला वाटायचं तिच्यापेक्षा तो खूप सुखी आहे आणि तिला वाटायचं त्याच्यापेक्षा ती. 

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

अलक (अति लघु कथा) – भाग २८ (Alak – Part 28)
अलक (अति लघु कथा) – भाग ३० (Alak – Part 30)
अलक (अति लघु कथा) – भाग १६ (Alak – Part 16)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP