Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • alak
  • अलक (अति लघु कथा) – भाग २४ (Alak – Part 24)

अलक (अति लघु कथा) – भाग २४ (Alak – Part 24)

by Rajendra Vaishampayan / Wednesday, 03 January 2018 / Published in alak

२४.१

एका पत्रकाराने एका वारकऱ्याला विचारलं, “इतकी गैरसोय पत्करून इथे पंढरपूरला येता आणि पांडुरंगाचं दर्शनही धक्काबुक्कीत नीट होत नाही याबद्दल काय वाटतं तुम्हाला?” वारकरी उत्तरला, “तुम्ही हे विचारावं? अहो त्या रुपड्याचा फोटो डोळ्यातून अंतःकरणात उतरायला तुमच्या कमेऱ्याहुनही कमी वेळ लागतो हो! आणि विठुरायाच्या दर्शनाचं म्हणाल तर पूर्ण वारीभर आम्ही एकमेकांच्या पायी लागतो ते कशासाठी?”

२४.२

बुवांनी कीर्तनात रंग भरला होता. आसक्ती सोडा असं बुवा अनेक दाखले देऊन कळकळीने सांगत होते. आज पासून बुवा सांगतात तसं करायचं असं ठरवून शेजारच्या काकू कीर्तन संपायचा अर्धा तास अगोदरच मालिकेच्या बरोब्बर वेळी घरी आल्या.

२४.३

तो विठुरायासमोर उभा राहिला  आणि म्हणाला,” दर वर्षी वारीला येतोय, कृपाशीर्वाद कधी देशील?” कुणीतरी कानात कुजबुजलं,”कृपाशीर्वाद आहे म्हणूनच दर वर्षी वारीला येतोयस बेटा”

२४.४

आज खूप पाऊस होता म्हणून  त्याने मुलाला आज शाळेत जाऊ नको म्हणून सांगितलं आणि चहा पिण्याच्या वेळी सकाळचा पेपर वेळेवर मिळाला नाही म्हणून नखशिखांत ओल्या स्थितीत पेपर टाकणाऱ्या त्या पोरावर तो वसकन ओरडला.

२४.५

धर्मनिरपेक्ष देशात सुस्थितीत चालणाऱ्या कॉन्व्हेंट शाळेतून कपाळावर गंध लावलं म्हणून परत पाठवल्यामुळे रडत रडत घरी आलेल्या त्याच्या मुलाला त्याने सहिष्णुता दाखवायला सांगितली. मुलाला कुणावर अधिक नाराज व्हावं हेच कळेना!

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

अलक (अति लघु कथा) – भाग ५ (Alak – Part 5)
अलक (अति लघु कथा) – भाग ५० (Alak – Part 50)
अलक (अति लघु कथा) – भाग ४४ (Alak – Part 44)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP