उपासाचा बुफे – ९ नोव्हेंबर २०१७
लग्नाच्या संदर्भात एक सुंदर सुभाषित आहे. कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्| बान्धवा: कुलम् इच्छन्ति मिष्टान्नम् इतरे जना: ॥ सुभाषिताचा साधारण अर्थ असा की लग्नामधे मुलगी वराच्या रुपाला वरते, मुलीची आई त्याच्या पैशाकडे, तर वडील त्याच्या गुणांकडे पहातात. नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक फक्त उत्तम जेवणावर लक्ष ठेवतात. लग्नाच्या संदर्भात
- Published in marathi
देवाची सुट्टी – ५ नोव्हेंबर २०१७
काही काही दिवस असे असतात की काहीही न करता आळसात दिवस घालवणे हाच दिवासभराचा प्लॅन असतो. साधारणतः असं सद्भाग्य क्वचित एखाद्या रविवारी किंवा एखाद्या सुटीच्या दिवशी मिळतं. त्यात घरातली सगळी मंडळी बाहेर गेलेली असली तर सोनेपे सुहागा!! एकदा एक असाच सोनियाचा दिवस उजाडला. खरं सांगायचं तर त्या दिवशी अंमळ उशिराच उजाडला. म्हणजे सूर्यदेव मध्यान्ह रेषेवरून
- Published in marathi
असे का करावे – २ नोव्हेंबर २०१७
५१ लेख लिहून झाले की थांबायचं असं ठरवलं होतं. कुठेतरी व्यक्त व्हावं असं मनापासून वाटलं म्हणून लिहायला सुरुवात केली. या पूर्वी व्यक्त होण्यासाठी सुरांची, लयीची निवड केली होती मी. पण सुरांतून व्यक्त व्हायच्या ऐवजी आसक्त झालो त्यांच्यावर. आणि माझी गत झाली समुद्रकिनारी गेलेल्या छोट्या मुलांसारखी. शंख शिंपल्यांनी भरलेल्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या छोट्या मुलांना पाहिलं आहे
- Published in marathi
पिंड, ब्रह्मांड आणि क्वान्टम मेकॅनिक्स- १ नोव्हेंबर २०१७
काही दिवसांपूर्वी एक गंमत घडली. मी जेवणाच्या टेबलवर बसलो होतो. समोर मारी बिस्किटाचा पुडा होता. बिस्किटं संपली होती त्यातली पण थोडा चुरा शिल्लक होता. बोलता बोलता त्या पुड्याला माझा धक्का लागला आणि त्या बिस्किटाचा थोडा चुरा टेबलवर पडला. गप्पा मारता मारता माझ्या नकळत मी तो चुरा माझ्या नखांनी टेबलावरच अधिक चुरायला सुरवात केली. बोलता बोलता
- Published in marathi
फ्लॅशबॅक आणि फ्लॅशफॉरवर्ड – ३१ऑक्टोबर २०१७
माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील काका रिटायर झाले आता. पण ते जेव्हा नोकरी करीत होते त्यावेळी खूप सकाळी पहिल्या शिफ्टला जाण्यासाठी घरातून निघत असत. आमच्या जवळच राहायचे ते. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जात असे तेव्हा त्यांच्या घरातलं घड्याळ मला नेहेमी दिसायचं. ते घड्याळ लक्षात राहण्याचं कारण की ते नेहेमी ४५ मिनिटांनी पुढे असायचं.
- Published in marathi
अलक (अति लघु कथा) – भाग २० (Alak – Part 20)
२०.१ दररोजच्या कटकटीला कंटाळून उद्विग्न मनाने तो घराबाहेर पडला. गच्चीवर गेला आणि कठड्यावर उभा राहिला. घड्याळात बघितलं आणि एकदम भानावर आला कारण औषधाची वेळ झाली होती. तो शांत मनाने कठड्यावरून खाली उतरला. त्याच्या घड्याळानं आज दोन हत्या वाचवल्या होत्या. एक आत्महत्या आणि दुसरी त्याच्यावर पूर्ण अवलंबून असलेल्या त्याच्या मानसिक रुग्ण मुलाची. २०.२ आज ती आणि
- Published in alak
हौदाचं समीकरण- ३० ऑक्टोबर २०१७
सहावी किंवा सातवीची इयत्ता असेल. गणिताच्या पुस्तकातील काळ, काम, वेग यांचं त्रैराशिक शिकवत असताना बरीच उदाहरणं घेऊन आम्हाला शिक्षकांनी ह्या संकल्पना शिकवल्या. त्यात एक गणित हमखास असायचं. एक हौद आहे. त्याची उंची, लांबी, रुंदी अमुक अमुक आहे. त्या हौदात काही नळ अमुक अमुक एवढं पाणी दर मिनिटाला वरच्या बाजूने हौदात सोडतात. त्या हौदाच्या तळाला काही
- Published in marathi
गाणारा माणूस गंमतीला- २८ ऑक्टोबर २०१७
काही काळापूर्वी घडलेला एक प्रसंग. त्या प्रसंगात दोन पात्र होती. एक पात्र होतं ते म्हणजे एक २०-२२ वर्षाचा तरुण, तात्पुरतं त्याचं नाव ठेऊ ‘शशी’. आणि दुसरं पात्र होतं ते म्हणजे ५२-५५ वर्षाचे त्याचे बाबा, त्यांचंही तात्पुरतं नाव ठेऊ ‘सुरेशराव’. शशीचं इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्ष. घरात संगीताचं वातावरण. शशीने शास्त्रीय संगीताचं खूप व्यवस्थित शिक्षण घेतलेलं, शिक्षण सांभाळून
- Published in marathi
डिजिटल सुबत्ता – २५ ऑक्टोबर २०१७
मागच्या आठवड्यात मी माझा लॅपटॉप आतून स्वच्छ करण्याचा घाट घातला. आतून स्वच्छ करणे याचा अर्थ असा की नवीन फाईल साठवण्यासाठी जागा करणे. लॅपटॉप घेतल्यापासून मी त्याच्या हार्ड डिस्क मध्ये केवळ फाइल्स साठवतच गेलो. माझ्या लॅपटॉपची साठवणुकीची क्षमता जेव्हा मी घेतला त्यावेळी ५०० घबाड इतकी होती (१ घबाड = १ GB असं या एककाला मला सुचलेलं
- Published in marathi
माझ्यातला अंशावतार – २४ ऑक्टोबर २०१७
माझ्यातला अंशावतार काही दिवसापूर्वी एक सोहळा पाहिला. या सोहळ्यात उत्सवमूर्ती म्हणून भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेली ८ ते १५ वयाच्या आसपासची २५ मुलं होती. त्यांना भारताच्या माननीय राष्ट्रपतींकडून सम्मानित केलं जाणार होतं. त्या मुलांकडे पाहिलं तर भारतातल्या इतर कोट्यवधी मुलांसारखीच दिसणारी ही मुलं होती. पण त्यांचा माननीय राष्ट्रपतींच्या तर्फे सन्मान होणार होता कारण त्यांनी असं काही
- Published in marathi









