जनाचे श्लोक – ५ डिसेंबर २०१७
माझा एक जवळचा मित्र आहे. तो नावाजलेला कलाकारही आहे. आम्ही आमच्या आमच्यात वेगळे वागतो मात्र बाहेर सर्वांसमक्ष मी त्याच्याशी वेगळा वागतो. एकदा त्याने मला प्रश्न विचारला की ‘आपण दोघेच असताना तू खूप मोकळा वागतोस पण लोकांत असताना अंतर ठेऊन वागतोस असं का?’ मी त्यावेळी त्याला माझं मत व्यक्त केलं की प्रत्येक व्यक्तीचं , प्रत्येक नात्यामध्ये,
- Published in marathi
अलक (अति लघु कथा) – भाग २२ (Alak – Part 22)
२२.१ एकदा एका सुगंधालयात जाऊन त्याने स्वतःसाठी पाच हजार रुपयांची उंची अत्तरं खरेदी केली. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो दुकानदाराला म्हणाला ,” अरे तुझ्याकडे स्वस्तातल्या उदबत्त्या असतील तर दे. आईला देवपूजेसाठी हव्या आहेत.” २२.२ तो आईबाबांना दररोज देवाला नमस्कार करताना पाहायचा पण आईबाबांनी कितीही वेळा सांगितलं तरी तो देवाला नमस्कार करायचा नाही. सध्या तो
- Published in alak
डोंबाऱ्याची काठी – ३० नोव्हेंबर २०१७
डोंबाऱ्याचा तारेवरच्या कसरतीचा खेळ बघणं हा लहापणीचा एक रोमांचक अनुभव असायचा. अर्थात मुंबईच्या रस्त्यांवर डोंबाऱ्याने खेळापुरतं तात्पुरतं बस्तान बसवावं आणि आम्ही मुलांनी ते घोळका करून पाहावं हे जेव्हा शक्य होतं त्या काळातली गोष्ट करतोय मी. आता डोंबाऱ्याचा खेळ बघण्यासाठी आवश्यक वेळ, त्याच्या तारेवरच्या कसरतीसाठी रस्त्यावर पुरेशी जागा आणि मुंबईकराच स्वतःचच दररोजच आयुष्य तारेवरची कसरत झाल्यामुळे
- Published in marathi
कीर्तनाची प्लास्टिक सर्जरी – २७ नोव्हेंबर २०१७
मला काही वेळा कीर्तनाला तबल्याची साथ करायला जाण्याचा योग येतो. कीर्तनात तबला वाजवणाऱ्या साथीदाराला साधारण संपूर्ण कीर्तनाच्या तीस ते चाळीस टक्के इतक्याच वेळेचं काम असतं. हार्मोनियमच्या साथीदाराला मात्र त्या मानाने खूप सतर्क राहावं लागतं. कारण एक तर कीर्तनकाराला सतत षड्ज किंवा मध्यमाचा सूर देत राहावा लागतो. आणि साकी, दिंडी, आर्या, ओव्या, अभंग, श्लोक, कटाव अशा एक नाही
- Published in marathi
अलक (अति लघु कथा) – भाग २१ (Alak – Part 21)
२१.१ अध्यात्मविचारांनी तो नेहेमी झिंगलेला दिसायचा. होय ! झिंगलेला हाच शब्द बरोबर आहे आणि जाणीवपूर्वक वापरलाय तो ! कारण झिंगलेला आणि रंगलेला या स्थितींमधला फरक लक्षात येतो ना सुज्ञांना लगेच !! २१.२ आचार्य आपल्या लाडक्या शिष्यांना सांगत होते, “ही गोष्ट खरी आहे की देव जसा प्रल्हादाला जवळ घेतो तसा हिरण्यकश्यपूलाही मांडीवर घेतो. आणि हेही खरं
- Published in alak
सात्विकतेची जबरदस्ती – २५ नोव्हेंबर २०१७
स्थळ हॉस्पिटलचा एक वॉर्ड. संध्याकाळची वेळ. प्रसंग असा की माझे एक नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबतीसाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. मी आणि माझे नातेवाईक असलेल्या खोलीतच एक दुसरा रुग्ण आणि त्याचा नातेवाईक हे दोघेही होते. संध्याकाळी जवळजवळ दोन तासांच्या व्हीजिटिंग आवर्स मध्ये त्या खोलीत त्या दुसऱ्या रुग्णासाठी जमलेल्या लोकांची
- Published in marathi
संस्कारांचा क्वालिटी टाइम – २३ नोव्हेम्बर २०१७
एक दिवस एका मित्राकडे जाण्याचा योग आला. चांगला प्रशस्त बंगला. घराचं इंटेरिअर डेकोरेशन खूप सुंदर केलेलं. कोपऱ्या कोपऱ्यात छान छान शोभेच्या वस्तू. उंची पडदे, घरात ५५ इंची LED TV. अतिशय छान सजवलेली मास्टर बेडरूम, दोन मुलांच्या दोन वेगळ्या खोल्या. प्रत्येक मुलाची खोली वेगळी सजवलेली. प्रत्येक खोलीत स्वतंत्र TV, प्रत्येकाला लॅपटॉप. प्रशस्त किचन, डायनिंगरूम ,गेस्टरूम, एक
- Published in marathi
देवाचं एक्सप्रेस दर्शन – २० नोव्हेंबर २०१७
काही वर्षांपूर्वी एका देवस्थानाला भेट देण्याचा योग आला. त्या देवस्थानात नेहेमीच खूप गर्दी होते भाविकांची. देवाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं तर तासनतास रांगेत उभं रहावं लागतं. ज्यांना देवासाठी द्यायला तितका वेळ नाही त्यांच्यासाठी देवस्थानाने एक खास सोय ठेवली आहे. एका विशिष्ठ रकमेचं तिकीट काढून देवाच्या एक्सप्रेस दर्शनाची एक विशेष रांग असते त्यात तुम्हाला उभं राहून, इतर
- Published in marathi
सकारात्मकतेचं वसतिगृह – १८ नोव्हेंबर २०१७
भगवान गौतम बुद्धांची एक गोष्ट वाचनात आली. ती गोष्ट अशी. एकदा एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि म्हणाला,’भगवान मी आपल्या संदेशाच्या प्रसारासाठी गेलो असता काही लोकांनी मला खूप अपमानास्पद वागणूक दिली’ त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, ‘हो का !! पण बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही’. त्यावर तो शिष्य म्हणाला की ‘भगवान, त्यांनी मला मारलं सुद्धा’ त्यावर
- Published in marathi
फॉसबरी फ्लॉप – १४ नोव्हेंबर २०१७
१९६८ चा ऑलिम्पिक चा सोहळा. ‘उंचउडी’ म्हणजेच ‘हाय जम्प’ चा सामना. ऑलिम्पिकच्या सामन्यातली जाणवणारी चुरस, स्पर्धा याही सामन्यात शिगेला पोहोचलेली. २.२२ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेला. या उंचीवर रशियाचा खेळाडू बाद झाला. आता बार ची पातळी वाढून २. २४ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेलेला. आतापर्यंत कधीही इतकी उंची उंचउडीच्या सामन्यात पार केलेली नव्हती.
- Published in marathi










