कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे ३१.१ खूप वर्षांनी मी परवा रद्दी टाकायला रद्दीवाल्याकडे गेलो.  त्याने रद्दीचं वजन करून अर्धेच पैसे दिले. मी कारण विचारल्यावर तो निरागसपणे म्हणाला,” दादा, काय जादू झाली माहीत नाही, पण हल्ली पूर्वीपेक्षा दुप्पट माल पारड्यात घालावा तेव्हा

कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे.  ३०.१ आपली एकजूट कशी दाखवायची या विषयावर वाद वाढत जाऊन शेवटी ते एकमेकांच्या उरावर बसले आणि तो प्रश्न त्यांनी परस्पर सामंजस्याने सोडवला. ३०.२ एक तरुण खोलीतून बाहेर आला आणि बाबांना म्हणाला ,”बाबा बाबा !, बघा ना 

प्रसन्न सकाळी चहाचा वाफाळता कप हाती घेऊन कोरं करकरीत वर्तमानपत्र पुढ्यात घेऊन बातम्या वाचण्यामध्ये एक वेगळाच अवर्णनीय रोमान्स असतो. पतीराज या रोमान्सच्या मूडमध्ये असताना गृहिणींच्या मनात मात्र नवऱ्याने सकाळचा पेपर हातात घेतल्या क्षणी सवतीमत्सर का जागा होतो हे मला अजून न उमगलेलं कोडं आहे. चिडचिडीचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला तर,  ” मी रिकामटेकडी बसली नाहीये

२९.एक ढग नुसताच गर्जायचा बरसायचाच नाही. त्याने आषाढातल्या ढगांशी फारकत घेऊन वेगळा पक्ष काढलाय म्हणे !! २९.त्याने कुणालाच कधी मदत केली नाही, तो कधी कुणात मिसळला नाही, उलट  शेजारच्यांना शिव्याच देत राहिला. एक दिवस अचानक घरात पाणी शिरलं त्याच्या आणि सगळा गाव मदतीला धावला. पण सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तो सगळ्यांना एवढंच म्हणाला की,” कामच होतं

२८.१ परवा फ्युजन म्युझिकची धून खूप आवडली म्हणून एका गाण्यावर बेभान होऊन नाचले लोक एका चित्रपटगृहात. बऱ्याच लोकांना लक्षातच आलं नाही की ते राष्ट्रगीत वाजत होतं. हे जेव्हा कळलं त्यावेळी मात्र कोणीतरी त्यांना त्यांच्या भावना दुखावल्याचं लक्षात आणून दिल आणि म्हणून त्यावेळी चित्रपटगृहच जाळून टाकलं त्यांनी. २८.२ जेव्हा खिशात पडत होते तेव्हा काहीच वाटत नव्हतं

मी काही दिवसांपूर्वी एका कलाकाराची जीवनी वाचत होतो. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला स्वप्नवत वाटावं असं त्या कलाकाराला यश मिळालेलं होतं. अत्यंत देखणं रूप, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता सर्वच. एका काळी तो कलाकार इतका यशस्वी होता की प्रत्येक उदयोन्मुख कलाकाराचं त्या कलाकारासारखं यशस्वी व्हायचं हेच ध्येय असायचं. पण पुढे त्या कलाकाराला व्यसन लागलं आणि हळू हळू तो त्याच्या

२७.१ एक दिवस मराठी भाषा कशी समृद्ध आहे याबद्दलचा लेख माझ्या वाचनात आला. त्या लेखकाचा मराठीबद्दलचा अभिमान पाहून माझं उर भरून आलं. एकच वैषम्य वाटलं की तो विचारलेख त्याने अस्खलित इंग्रजीत लिहिला होता. २७.२ एका प्रदर्शनात महान व्यक्तींचे पुतळे विक्रीस ठेवलेले बघून मी मूर्तिकाराला विचारलं,” मूर्ती विकत घेऊन घरात ठेवल्यावर, त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन विचार बदलतील

२६.१ ती नेहेमीसारखीच कॉल आल्यावर हॉटेलवर गेली. शरीर उस्कटलं जाण्याची सवय झाली होती तिला आता,  पण त्या दिवशी मिळणारे पैसे मात्र खूप महत्वाचे होते कारण दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेची फी भरायची होती… २६.२ त्याला प्रश्न पडला की सरहद्दीवर देशासाठी लढताना रक्त सांडलेल्या जवानांना, त्यांनी देशासाठी जीव गमावला म्हणून नुकसान भरपाई दिलेली ऐकली नाही

मागच्या आठ्वड्यातलीच गोष्ट. मला काही कारणासाठी १००० रुपयांचे १० रुपयांच्या नोटांमध्ये सुट्टे हवे होते. शनिवार संध्याकाळची वेळ त्यामुळे बँका बंद होत्या. मग आमच्या जवळच्याच बाजारात ‘दे दान सुट्टे गिऱ्हाण’ करत दुकानं पालथी घालत होतो. अपेक्षेप्रमाणे सगळ्यांनीच सुट्टे देण्यासाठी नकारघंटा वाजवली. अखेरचा प्रयत्न म्हणून एका डेरीवाल्याकडे सुट्टयांची मागणी केली आणि काय विचारता, तो डेरीमालक सुट्टे द्यायला

मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. एक माणूस त्याचा मुलगा आणि गाढव यांची कथा होती ती. त्या गोष्टीचा गोषवारा असा की एकदा रणरणत्या उन्हात रस्त्यातून एक माणूस त्याचा बारा वर्षाचा मुलगा आणि त्यांचं गाढव जाताना लोक पाहतात. काही लोक म्हणतात “काय वेडे आहेत गाढव नुसतच चाललं आहे, कुणीतरी बसायचं तरी !”. हे ऐकल्यावर तो माणूस

TOP