Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • alak
  • अलक (अति लघु कथा) – भाग २८ (Alak – Part 28)

अलक (अति लघु कथा) – भाग २८ (Alak – Part 28)

by Rajendra Vaishampayan / Saturday, 03 March 2018 / Published in alak

२८.१

परवा फ्युजन म्युझिकची धून खूप आवडली म्हणून एका गाण्यावर बेभान होऊन नाचले लोक एका चित्रपटगृहात. बऱ्याच लोकांना लक्षातच आलं नाही की ते राष्ट्रगीत वाजत होतं. हे जेव्हा कळलं त्यावेळी मात्र कोणीतरी त्यांना त्यांच्या भावना दुखावल्याचं लक्षात आणून दिल आणि म्हणून त्यावेळी चित्रपटगृहच जाळून टाकलं त्यांनी.

२८.२

जेव्हा खिशात पडत होते तेव्हा काहीच वाटत नव्हतं पण आता खात्यात पडायला लागल्यावर खूप कमी मिळतात अशी अचानक जाणीव झाली त्यांना.

२८.३

त्याच्या घरी त्याने एका मुलाला दया येऊन आश्रय दिला. तो मुलगा सज्ञान झाल्यावर त्याने वारसा हक्काचा दावा ठोकला आश्रयदात्यावर. गम्मत म्हणजे लोकांची सहानुभूती त्याच्याकडे वळवण्यातही यशस्वी झाला तो मुलगा. आता तो आश्रयदाता कोर्टाच्या पायऱ्या झिजवतोय  न्यायासाठी.

२८.४

मी आणि माझा मित्र एकदा जॉगिंग करायला गेलो. पूर्ण रस्ताभर मित्र कटकट करत होताच की माझी कंपनी त्याला आवडत नाही म्हणून. शेवटी टपरीवर माझ्याच पैश्याने चहा पिऊन झाल्यावर  मला म्हणाला ,”बरं मग उद्या भेटू परत.” मला कळेना मी याला मित्र म्हणायचं की नाही ?

२८.५

पूर्वी एकाच ताटात जेवायचे दोघे. त्यांना कुणीतरी उचकवलं,”उष्ट काय खाता एकमेकांचं?” दोघे चवताळले आणि दोन तुकडे केले ताटलीचे. आता तुटलेल्या ताटलीत नीट खाता येत नाही म्हणून दोघे उपाशी असतात आणि उचकवणारा ढेकर देऊन निवांत झोपतो चेहऱ्यावर पांघरून ओढून.

२८.६

त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मिळावी म्हणून कोर्टात गेला तो परवा. तिथे पाहतो काय तर न्याय मिळावा म्हणून न्यायाधीशच धरणं धरून बसले होते कोर्टा बाहेर. ते पाहून तो गोंधळला आणि त्याला प्रश्न पडला की  नक्की या देशात न्याय देणारं आहे कोण ?

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

अलक (अति लघु कथा) – भाग २४ (Alak – Part 24)
अलक (अति लघु कथा) – भाग ३४ (Alak – Part 34)
अलक (अति लघु कथा) – भाग १३ (Alak – Part 13)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP