२५.१ मित्राला रुग्णालयात बघायला गेलं असता त्याच्या शेजारच्या बेडवर एकटाच असणाऱ्या एका रुग्णाशीही त्याच्या तासभर गप्पा झाल्या. त्याला नंतर कळलं की तेवढ्यानेही दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाच्या तब्येतीत खूप फरक पडला होता. आता तो संध्याकाळचा वेळ सिनिअर सिटीझन क्लब ऐवजी रुग्णालयात रुग्णांशी हलक्या फुलक्या गप्पा मारण्यात घालवतो. गंमत म्हणजे त्याच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत आहे असं

काही दिवसांपूर्वी मला एका whatsapp ग्रुपमध्ये समाविष्ट केलं गेलं. खरं तर मी स्वतःहून त्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी तशी इच्छा प्रदर्शित केली नव्हती. पण आपली इच्छा असो व नसो एखाद्या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार ऍडमिन या सर्वशक्तिमान मानवाला whatsapp ने दिलेला आहे. तो अधिकार वापरून मला त्या ग्रुपमध्ये ऍडमिन नेे समाविष्ट केलं. बरं केलं तर केलं त्यावर

२४.१ एका पत्रकाराने एका वारकऱ्याला विचारलं, “इतकी गैरसोय पत्करून इथे पंढरपूरला येता आणि पांडुरंगाचं दर्शनही धक्काबुक्कीत नीट होत नाही याबद्दल काय वाटतं तुम्हाला?” वारकरी उत्तरला, “तुम्ही हे विचारावं? अहो त्या रुपड्याचा फोटो डोळ्यातून अंतःकरणात उतरायला तुमच्या कमेऱ्याहुनही कमी वेळ लागतो हो! आणि विठुरायाच्या दर्शनाचं म्हणाल तर पूर्ण वारीभर आम्ही एकमेकांच्या पायी लागतो ते कशासाठी?” २४.२

मला माझ्या एका सुहृदाने आंग्लनववर्षाची शुभेच्छा म्हणून जॉन पॉल मुर ची एक सुंदर कविता पाठवली. मला अतिशय आवडली. वाचता वाचता त्याचा मराठीत भावानुवाद सुचला तो सर्वांबरोबर वाटावा असं वाटलं म्हणून हा संदेशप्रपंच    मूळ इंग्रजी कविता अशी:    _*Drinking From The Saucer*_ – John Paul Moore_   I’ve never made a fortune, And I’ll never

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह एका उपहारगृहात खाण्यासाठी गेलो होतो. तसं चांगल्या वस्तीतलं तामझाम असलेलं उपहारगृह होतं ते. खूप भूक लागल्यामुळे लगेच मिळेल म्हणून दाक्षिणात्य पदार्थांची निवड केली आणि छानपैकी ‘घी ओनियन रवा साधा डोसा’ अशा घवघवीत नावाचा पदार्थ ऑर्डर केला. साधारण १० मिनिटांनी तो डोसा माझ्यासमोर अवतीर्ण झाला आणि अगदी खरं सांगतो माझा हिरमोड झाला.

गेल्याच आठवड्यातली गोष्ट. माझ्या रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये एका शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी  काही मुलांच्या नाटिका ध्वनिमुद्रित करणं सुरु होतं. त्या शाळेचे, ती नाटिका बसवणारे शिक्षक आणि दहा पंधरा मुलं, अशी स्टुडिओ मध्ये आली होती. आठवी ते दहावी अशा उच्चमाध्यमिक वर्गातील सगळी मुलं होती.  रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये येण्याची त्यांची पहिलीच वेळ होती म्हणून काहीशी भांबावलेली पण प्रचंड कुतूहलाने ती

२३.१ एका शिष्याने गुरूंना विचारलं,” दररोज रात्री निजण्यापूर्वी आणि उठल्यावर तुम्ही गादीतच देवाला नमस्कार का करता?” गुरुजी उत्तरले “आयुष्य समेटून सुंदर मरणाला सामोरं जाण्यासाठी रात्री आणि आयुष्य उमलून सुंदर जीवनाला सामोरं जाण्यासाठी सकाळी आशा दोन्ही वेळी मनशक्ती मिळावी यासाठी भगवंताकडे अर्ज आणि दरम्यान झोपेत मुक्तीचा आनंद मिळावा म्हणून प्रार्थना करतो दररोज” २३.२ तो आणि त्याचा

माझ्या भावाने मला नुकताच घडलेला एक गमतीशीर प्रसंग सांगितला. तो आणि त्याचा ८-९ वर्षाचा मुलगा एकदा एका मंदिरात गेले होते. दर्शन झाल्यावर थोडावेळ दोघेही तिथे बसले. येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच गर्दी होती. शनिवारचा दिवस होता म्हणून भक्तमांदियाळी मारुतीरायांकडे जरा अधिकच होती. सगळ्या भक्तमंडळींच्या नमस्काराच्या आणि पूजेच्या वेगवेगळ्या तऱ्हा तो मुलगा पाहत होता. त्याच्या डोक्यात काय सुरु

  मध्यंतरी एका स्नेह्यांच्या घरी श्रीसत्यनारायणाच्या पूजेला  दर्शनाला जाण्याचा योग आला. उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक टुमदार फ्लॅट होता त्यांचा.   श्रीसत्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि लगेच हातावर छानपैकी केशर घातलेल्या आटवलेल्या दुधाचं तीर्थ मिळालं. तीर्थामागे प्रसाद येईल याची मी वाट पाहत होतो पण काही हालचाल दिसेना म्हणून मुकाट्याने जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात एका छान चुटचुटीत प्लॅस्टिकचा बॉक्स

बोहारी नावाचा एक विशिष्ट समुदाय असतो. जुने कपडे किंवा जुनी भांडी घेऊन त्या बदल्यात नवीन वस्तू देणे असा त्यांचा व्यवसाय असतो. लहानपणी आमच्या चाळीत अशीच एक बोहारीण येत असे. तिच्या बांबूच्या विणलेल्या टोपलीत तवे, भांडी, पातेल्या, टोप, पोळपाट, लाटणी, डाव, ओगराळी, चमचे अशा नानाविध गृहपयोगी वस्तू असायच्या. एखाद दुसरा ‘लेटेस आयटम’पण असायचा. प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या

TOP