भारतीय खाद्यपरंपरेत दाक्षिणात्य पदार्थांचा एक वेगळा तोरा आहे आणि इडली, वडा, डोसा ह्या त्रिमूर्तीचं तर भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेशाइतकं अढळ स्थान आहे असं मला नेहेमी वाटत आलं आहे. साधारणपणे इडली करणं त्यामानाने सोपं, वडा थोडा अधिक परीक्षा घेणारा आणि डोसा म्हणजे हात बसलेला नसेल तर पिठल्यापासून ते पापडापर्यंत कुठलंही रूप घेणारा. डोसा उत्तम

एकदा आमच्याकडे अचानक आमच्या झाडूपोछा, भांडी घासणे या कामांसाठी असणाऱ्या मावशी आल्या नाहीत. त्यामुळे सहाजिकच ही सगळी कामं घरातल्या सगळ्या माणसांमध्ये वाटली गेली आणि माझ्याकडे घराची स्वच्छता ही कामगिरी येऊन पडली. हल्ली या अशा कामांची सवय थोडी मोडली होती ही गोष्ट खरीच. पण आईनेच परिस्थिती हातात घेतल्यामुळे नाही म्हणणं तर शक्यच नव्हतं. या माझ्या अवघडलेल्या

एकट्याने प्रवास करताना एअरपोर्टवर विमानाची वाट पाहत थांबायची वेळ आली की त्यावेळचा माझा सर्वात आवडता छंद म्हणजे एअरपोर्टवरचं पुस्तकांचं दुकान शोधून काढायचं आणि पुस्तकं, मासिकं चाळायची. एक तर नवीन पुस्तकांना एक प्रकारचा विशिष्ट सुगंध येतो तो मला खूप आवडतो. आणि दुसरं म्हणजे पुस्तकं, मासिकं चाळल्यामुळे नवीन विचार कळतात, नवीन ट्रेंड समजतात, जग कुठे चाललंय याची

काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेमध्ये ‘व्यक्तिमत्वाची जडणघडण’ या विषयावर माझं व्याख्यान होतं. व्याख्यान हे निमित्त असलं तरी माझ्यासाठी तरी तो पुरस्कार प्रदान समारंभ होता. कारण ज्या शाळेमध्ये खूप मस्ती करतो म्हणून ‘दहशतवादी’ हे विशेषण माझ्या शिक्षकांनी मला ठेवलं होतं त्याच शाळेत पुढच्या पिढीशी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर बोलण्यासाठी निमंत्रण मिळणं हे माझ्यासाठी तरी कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी

नुकतीच एक गमतीशीर बातमी वाचली. अमेरिकेमध्ये दर वर्षी एक कोटी पन्नास लाख (१,५०,००,०००) इतक्या दातांच्या रूट कॅनालच्या केसेस होतात. प्रत्येक रूट कॅनाल चा सरासरी खर्च ८०० डॉलर्स इतका असतो. म्हणजे दरवर्षी अमेरिकेमध्ये १२ अब्ज डॉलर्स (१२,००,००,००,०००) इतका खर्च केवळ दातांच्या रूट कॅनाल वर होतो. या सरासरी अंदाजित संख्या जरी धरल्या तरी १० अब्ज डॉलर तरी

प्रसंग एक: आद्य शंकराचार्य म्हणजे ज्ञानभांडार, विद्वत्तेचा सागर, बुद्धीचा भास्कर. ते एकदा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी आपला दंड वाळूत खुपसला आणि वर काढला. त्याला काही वाळूचे कण चिकटले होते. त्याच्याकडे निर्देश करून ते आपल्या शिष्यांना म्हणाले की, “या समुद्रकिनाऱ्यावर जितकी वाळू दिसते आहे त्यापेक्षा अनंत पटीने विश्वात ज्ञान पसरलं आहे. आणि त्यापुढे

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीत एका राजाला डुकराचे कान होते. त्यामुळे तो असा फेटा बांधायचा की कुणालाच त्याचे कान दिसायचे नाहीत. पण त्या राजाचे केस कापणारा ‘राजनाभिक’, त्या पासून कसं लपून राहणार हे गुपित! पण राजाने त्याला सक्त ताकीद दिली होती की त्याने जर हे गुपित कोणाला सांगितलं तर त्याचा त्याच दिवशी शिरच्छेद

साक्षी हे गण आप्त मित्र मिळुनी जमली इथे मंडळी। येऊनी घटिका समीप शुभ या स्थानावरी थांबली। वरमाला धरुनी करी सुखकरी लक्ष्मी उभी मंदिरी विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।1।। सौख्याने भरू देत हा प्रतिदिनी संसार ऐसा खरा। आतिथ्या करण्यास मात्र कधिही देईन ना अंतरा। ऐशा या वाचनास नित्य दृढ या ठेऊनिया अंतरी। विष्णूचे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका समारंभात गेलो होतो. त्या समारंभात एक जोडपं आणि त्यांचा एक चुणचुणीत मुलगा असं कुटुंब भेटलं. विषयात विषय निघत गेले आणि तो मुलगा काय करतो यावर विषय सुरू झाला. एकंदरीत वर्णनातून असं कळलं की तो मुलगा इंटरनॅशनल शाळेत शिकतो. शाळेमध्ये फुटबॉलचं विशेष कोचिंग आठवड्यातून दोन वेळा सकाळी सहा वाजता शाळा सुरु

काही दिवसांपूर्वी मी लेख लिहू लागलो. मी काही लेखक नव्हे. पण मनात विचारांचे जेव्हा जेव्हा तरंग उठतील ते तरंग माझ्या कुवतीप्रमाणे शब्दबद्ध करायचे या विचाराने मी लिहायला लागलो. मी सुचेल तसं आणि सुचेल तेव्हा लिहीत असे, अजूनही तसंच लिहितो. दररोज काहीना काही विषयासंबंधातील चिंतन होतं आणि ते विचार मनात घोळत असल्यामुळे त्या अनुषंगाने दररोज काही ना काही

TOP