निर्णयाच्या नाण्याच्या दोन बाजू- ११ ऑक्टोबर २०१७
काही काळापूर्वी माझ्या वाचनात एक छान लेख आला होता. तो जगातल्या सर्वात श्रीमंत व्यंक्तींपैकी एकावर लिहिलेला मुलाखतवजा लेख होता. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकाला त्या मुलाखतीत विचारलं होतं की “तुम्ही इतकं प्रचंड आर्थिक साम्राज्य उभारलं. ते करत असताना तुम्हाला अनेकवेळा खूप महत्वाचे आर्थिक निर्णय घ्यावे लागले असतील. प्रत्येक निर्णयावर लक्षावधी डॉलर्सची उलाढाल अवलंबून असायची. अशावेळी
- Published in Uncategorized
अलक (अति लघु कथा) – भाग १९ (Alak – Part 19)
१९.१ एकदा टपरीवरचा चहा पंचतारांकित चहाला म्हणाला ,” आपल्यात चहा पावडर तीच, साखर तीच, पाणी तेच दूध तेच मग तुला इतकी किंमत का ? पंचतारांकित चहा म्हणाला,” मित्रा,चहा आपला निमित्त असतो, किंमत ज्या कपात तो दिला जातो त्याची असते.” त्यावर टपरीवाला चहा त्याला म्हणाला ,” ओह, मग मी आहे तिथेच असलो तरी चालेल कारण इथे
- Published in alak
कुलरचा गोंगाट आणि मन- १० ऑक्टोबर २०१७
माझ्या ओळखीचं एक दाम्पत्य आहे. त्यातील श्रीमान रात्री झोपल्यावर खूप घोरत असत. इतकं की त्या घोरण्यामुळे श्रीमतींना झोपणं मुश्किल होऊन जात असे. बरेच दिवस त्या दांपत्याने या समस्येवरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. घोरण्यावरची औषध झाली, नाकाला लावायची क्लिप झाली, कुशीवर निजण्याची सवय लावायचा प्रयत्न झाला पण सर्व उपाय थकले. एक दिवस अचानक गर्मीच्या दिवसांमध्ये एका
- Published in marathi
सगुणातील माणूसपण – ९ ऑक्टोबर २०१७
श्री रामकृष्ण परमहंसांच्या एका भक्ताची एक गोष्ट वाचनात आली. ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे आणि ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी त्यांच्या गाडीत त्यांच्या आराध्य देवतेचा किंवा सद्गुरूंचा फोटो ठेवतात. साधारणतः तो फोटो गाडीत बसलेल्या माणसांच्याकडे तोंड करून ठेवलेला असतो. पण या श्री रामकृष्णांच्या भक्ताने त्या फोटोचं छोटं मंदिर आणि त्यातील श्रीरामकृष्णांचा फोटो समोरच्या बाजूला ड्रायव्हर सारखा
- Published in marathi
आईन्स्टाईन आणि श्रद्धा- ९ ऑक्टोबर २०१७
काही दिवसांपूर्वी एक अप्रतिम विडिओ पाहिला. तो होता पदार्थविज्ञानात आणि एकंदरीतच जगाच्या इतिहासात उलथापालथ घडवून आणणाऱ्या आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाच्या दोन सिद्धांतांविषयी. एका सिद्धांतात आईन्स्टाईनने जडपदार्थ (Matter), ऊर्जा (Energy) आणि प्रकाशाचा वेग (Speed of Light) याचा संबंध जोडला आणि एक जगप्रसिद्ध समीकरण जन्माला घातलं E=MC². या समीकरणाचा अर्थ असा की एखाद्या पदार्थात किती ऊर्जा साठवलेली असते?
- Published in marathi
अनुग्रहाची AMC- ६ ऑक्टोबर २०१७
आमच्या सोसायटीत दर वर्षी दोन वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवसापूर्वी दोन दिवस आमचा वॉचमन सोसायटीमधल्या सगळ्या घरात येऊन “कल टाकी साफ होनेवाला है. पुरा दिन पानी बंद रहेगा. घरमे पानी भरके रखना. परसो भी सफाईके कारण थोडा गंदा पानी आ सकता है. थोडा ध्यान
- Published in marathi
खांब खांब खांबोळी – ३ ऑक्टोबर २०१७
खांब खांब खांबोळी एकदा ट्रेन मधून दूरच्या प्रवासाला जात होतो. कामानिमित्त दौरा असल्यामुळे एकटाच होतो. माझ्या डब्यात माझ्या कंपार्टमेंट मध्ये माझ्यासारखेच कामानिमित्त प्रवास करणारे इतर पाच प्रवासी होते. काही नोकरी करणारे काही व्यावसायिक होते. पल्ला बराच लांबचा होता. हळू हळू परिचय व्हायला लागला, गप्पा व्हायला लागल्या. मला अशी संभाषणं खूप आवडतात. नवीन छान माणसं भेटतात,
- Published in marathi
अहंकार आणि लिफ्ट- ३ ऑक्टोबर २०१७
माझ्या करियरच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ १४ वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर नोकरी करण्याचा योग आला. आणि त्या नंतर नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचा , बऱ्याच जणांच्या दृष्टीने मूर्खपणाचा!, निर्णय घेतला. तो निर्णय इतरांना मूर्खपणाचा वाटणं साहजिकच होतं त्यांची चूक नाही त्यात. कारण त्या काळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं स्थान स्वर्गाच्या दोनच बोटं खाली आहे असं
- Published in marathi
कॉंटिनेंटल नैवेद्य- २ ऑक्टोबर २०१७
आमच्या घराजवळच्या एका संस्थेमध्ये गणपतीमध्ये विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाआरती असते. लहानपणी आम्ही त्या दिवसाची अगदी वाट पाहत असू. बेंबीच्या देठापासून ओरडून गायल्या जाणाऱ्या वीस पंचवीस आरत्या, ढोल , ताशे, टाळ, मृदंग, रिंगण, फुगड्या, नाच, गजर अशी धमाल असायची. असायची कशाला अजूनही असते. आणि अगदी खरं सांगायचं तर लहानपणी पाहायचो तशी अजूनही मी त्या महा-आरतीची वाट
- Published in marathi
स्थितप्रज्ञतेचा रबरबँड- 1 ऑक्टोबर 2017
श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील उत्तरार्धात स्थितप्रज्ञाची लक्षण भगवंतांनी सांगितलेली आहेत. स्थितप्रज्ञ हा दुर्घटनेने किंवा दुःखाने कष्टी होत नाही आणि त्याला सुखाची आसक्ती नसते. कासव ज्याप्रमाणे आपलं अंग कवचामध्ये ओढून घेतं तसं स्थितप्रज्ञ आपले षडरिपू आपल्या नियंत्रणात ठेवतो. तो विषयभोगांपासून दूर राहतो. तो मनोवसना टाकून देतो. ही आणि अशी अनेक स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. ही
- Published in marathi









