आयुष्याचं FMEA- २० सप्टेंबर २०१७
परवा youtube वर एक विडिओ पाहत होतो. त्यामध्ये वैमानिक अभियांत्रिकी (एरोनॉटिक इंजिनीरिंग) मध्ये काय प्रगती सुरु आहे या बद्दल चर्चा केली होती. अधिक जलद, अधिक ताकदीची, अधिक सुरक्षा असणारी, अधिक प्रवासी घेऊन जाणारी अशी विमानं बाजारात घेऊन येताना विमान कंपन्या किती चाचण्या करतात याचाही थोडा उहापोह त्या व्हिडिओमध्ये केला होता. सुरक्षेचे अतिशय कडक नियम पाळून
- Published in marathi
मज खुणावतो तो पूर्णविराम- १९ सप्टेंबर २०१७
पु. ल. देशपांडे यांच्या ‘रावसाहेब’ या व्यक्तिरेखेमध्ये एक सुंदर वाक्य आलं आहे. पु. ल. कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत हे कळल्यावर त्यांना कानडी हेलात रावसाहेब प्रश्न विचारतात “ते मराठी मध्ये काय शिकवायचं असतं हो त्यांतं “. ते वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर मी खळखळून तर हसलोच आणि मन लगेच भूतकाळात गेलं. अगदी खरं सांगतो असे काही प्रश्न मलाही
- Published in marathi
माणसांमधलं इलेक्ट्रॉनिक्स- १८ सप्टेंबर २०१७
मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि त्यातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स या विषयाशी अधिक निगडित असलेला. आमच्या अभ्यासक्रमात आम्हाला खूप इलेक्ट्रॉनिक्स च्या सर्किट्स चा आणि विविध सुट्या भागांचा अभ्यास होता. आम्ही विद्युतवाहक पदार्थ, विद्युतनिरोधक पदार्थ शिकलो. रेसिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इन्डक्टर्स इत्यादी सुटे भाग, त्यांचे गुणधर्म, ते कसे बनवले जातात आणि त्यांचा सर्किट मध्ये कसा उपयोग होतो तेही शिकलो.
- Published in marathi
फुटलेला थर्मामिटर आणि वारी- 17 सप्टेंबर 2017
आज आमच्याकडे असलेला पाऱ्याचा थर्मामिटर चुकून फुटला. आणि त्यातला पारा जमिनीवर बारीक बारीक थेंब होऊन पसरला. थर्मामिटरच्या काचांचे तुकडे नीट व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावल्यानंतर माझा मोर्चा मी पाऱ्याकडे वळवला. मी हळू हळू एकेक थेंब एकत्र करायला लागलो. पाऱ्याची एक विशेषता असते. पाऱ्याचा एक थेंब दुसऱ्याजवळ नेला की क्षणार्धात ते दोन थेंब एकत्र
- Published in marathi
शॅम्पू पाऊच मधलं समाधान- १६ सप्टेंबर २०१७
माझ्या कार्यक्रमांच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने खूप ठिकाणी प्रवासाचा योग येतो. प्रवास करून नंतर छान गरम पाण्याचा शॉवर हा एक परमानंद देणारा कार्यक्रम असतो. एकदा असंच जवळजवळ 10 तासांच्या प्रवासानंतर खूप रात्री उशिरा मुक्कामी पोहोचलो. नियोजकाने माझी राहण्याची सोय, काही कारणाने हॉटेल मध्ये न करता कुणाच्या तरी घरी केली होती. त्या यजमानांनी सर्व सोय खरोखर अप्रतिम
- Published in marathi
विसंभर पलंबर- १५ सप्टेंबर २०१७
आमच्या घराजवळच एक पाटी लावलेली आहे. त्यावर पुढीलप्रमाणे ओळी आहेत. “विसंभर पलंबर. 5739201938. लिकेज पेशालीस” या एका पाटीवरून केवळ ‘लिकेज’ या शब्दामुळे ती पाटी एखाद्या पलंबर म्हणजेच प्लम्बरची असावी असा आम्ही बरेच दिवस कयास करत होतो. एकदा खरंच घराच्या वॉशबेसिन चा नळ अचानक लीक व्हायला लागला आणि आम्ही त्या पाटीवाल्या नंबरवर फोन लावला आणि त्या
- Published in marathi
सुधारणा, उत्कर्ष आणि उत्क्रांती- १४ सप्टेंबर २०१७
मी ‘सोनी’ या जगद्मान्य कंपनीचे संस्थापक ‘अकिओ मोरिता’ यांचं “मेड इन जपान” हे पुस्तक वाचत होतो. दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण बेचिराख झालेल्या या देशात कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना ‘मासारु इबुका’ या सहसंस्थापकाबरोबर त्यांनी ‘सोनी’ सारखी कंपनी सुरु केली आणि नंतर ती जगाच्या पाठीवर एक बलाढ्य कंपनी म्हणून नावारूपाला आणली. पूर्वी “मेड इन जपान” ही ओळ
- Published in marathi
भगवंतांची LIC पॉलिसी- 13 सप्टेंबर 2017
नुकताच मला माझा एक लहानपणीचा मित्र भेटला. चौकशी करताना माझा नेहेमीचा प्रश्न, “काय करतोस हल्ली?” त्यावर तो म्हणाला , ” अजूनही ‘Life In Comfort’ मध्येच आहे”. माझा गोंधळलेला चेहरा ओळखून तो म्हणाला “अरे म्हणजे LIC – Life Insurance Corporation चा एजन्ट आहे” छान चाललंय सगळं”. Life In Comfort – LIC चा इतका यथायोग्य फुलफॉर्म मला
- Published in marathi
भक्तीतल्या “क” चा फरक- 11 सप्टेंबर 2017
मध्यंतरी एक चर्चा रंगली. निर्गुणभक्तीपंथी एका अनुयायाने एक प्रश्न विचारला “गणपतीबाप्पाची मूर्ती 10 दिवस मनोभावे पूजल्यावर त्याचं वाजतगाजत विसर्जन लोकं कसं करू शकतात?” प्रश्न एका दृष्टीनं अगदीच चुकीचा नव्हता. या प्रश्नासंदर्भात तत्वज्ञानाचे खूप कंगोरे निघून त्यावर न संपणाऱ्या चर्चा घडू शकतील. पण या निमित्ताने बरेच दिवस माझ्या मनात घोळत असलेल्या एका विषयाचं विचारचक्र पुन्हा मनात
- Published in marathi
अलक (अति लघु कथा) – भाग १७ (Alak – Part 17)
१७.१ दाराबाहेर उभं राहून एक भिक्षेकरी अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनाम देहम आश्रित: । प्राणापान समायुक्त: पचामि अन्नम चतुरविधम ।। या श्लोकावर प्रवचन ऐकत उभा होता. पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. पूर्ण प्रवचनभर त्याला काहीच कळलं नाही पण सगळ्या प्रवाचनाचा अर्थ त्याला त्याच्या हातातल्या वाडग्यात शिळी पोळी पडल्यावर क्षणार्धात उलगडला. १७.२ श्रीमदभगवद्गीतेवर प्रवचनं करून त्या मिळकतीवर
- Published in alak










