Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • alak
  • अलक (अति लघु कथा) – भाग २० (Alak – Part 20)

अलक (अति लघु कथा) – भाग २० (Alak – Part 20)

by Rajendra Vaishampayan / Monday, 30 October 2017 / Published in alak

२०.१

दररोजच्या कटकटीला कंटाळून उद्विग्न मनाने तो घराबाहेर पडला. गच्चीवर गेला आणि कठड्यावर उभा राहिला. घड्याळात बघितलं आणि एकदम भानावर आला कारण औषधाची वेळ झाली होती. तो शांत मनाने कठड्यावरून खाली उतरला. त्याच्या घड्याळानं आज दोन हत्या वाचवल्या होत्या.  एक आत्महत्या आणि दुसरी त्याच्यावर पूर्ण अवलंबून असलेल्या त्याच्या मानसिक रुग्ण मुलाची.

२०.२

आज ती आणि तिचं दोरीतल्या पाळण्यातलं बाळ दोघेही खुश होते कारण काही दिवसांसाठी का होईना पावसापाण्यापासून वाचण्यासाठी त्यांना पक्कं घर मिळालं होतं. पावसाच्या तोंडावर नालादुरुस्तीसाठी रस्त्याच्या कडेला सिमेंटचे पाईप टाकून गेले होते नगरपालिकेचे कर्मचारी. आणि त्या घराचा एरियाच्या दादाला द्यायला लागणारा हप्ताही तिला परवडणार होता मिळणाऱ्या भिकेच्या पैशात.

२०.३

एका वृद्ध दुष्काळग्रस्ताचं सांत्वन करण्यासाठी गेलेल्या एक बड्या नेत्याने कॅमेऱ्यासमोर त्या वृद्धाला म्हटलं ” बाबा तुम्ही मला वाडीलांसारखे.  तुमच्यासाठी काय करू ?”
“माझा मुलगा होऊन फक्त एक दिवस रहा माझ्याबरोबर” असं त्या  वृद्धाच उत्तर ऐकून साहेब काही न बोलता निघून गेले खरे पण केलेल्या अपमानामुळे त्या वृद्धाचं पेन्शनही बंद झालं अस गाववाल्यांना नंतर कळलं

२०.४

दररोज दारू पिऊन ज्या मुलाला तो बाप अर्धमेला होईपर्यंत मारायचा तोच मुलगा त्याच्या बापाच्या अर्धमेल्या स्थितीतही मनापासून निरलस
सेवा करत होता हे पाहून तो बाप दररोज पश्चात्तापदग्ध होऊन रडायचा. सात्विक राहूनही बदला घेण्याची ही पद्धत तो मुलगा कुठे शिकला कोण जाणे…

२०.५

प्रवचन देण्यासाठी मिळणाऱ्या मानधनाचे पैसे त्या संस्थेकडून पूर्ण वसूल झाल्यानंतरच बुवा व्यासपीठावर बसले आणि मग ‘निष्काम कर्मयोग’ या विषयावरचं त्यांचं प्रवचन काय रंगलं म्हणून विचारता !!

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

अलक (अति लघु कथा) – भाग ७ (Alak – Part 7)
अलक (अति लघु कथा) – भाग ४६ (Alak – Part 46)
अलक (अति लघु कथा) – भाग ४ (Alak – Part 4)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP