एक दिवस एका मित्राकडे जाण्याचा योग आला. चांगला प्रशस्त बंगला. घराचं इंटेरिअर डेकोरेशन खूप सुंदर केलेलं. कोपऱ्या कोपऱ्यात छान छान शोभेच्या वस्तू. उंची पडदे, घरात ५५ इंची LED TV. अतिशय छान सजवलेली मास्टर बेडरूम, दोन मुलांच्या दोन वेगळ्या खोल्या. प्रत्येक मुलाची खोली वेगळी सजवलेली. प्रत्येक खोलीत स्वतंत्र TV, प्रत्येकाला लॅपटॉप. प्रशस्त किचन, डायनिंगरूम ,गेस्टरूम, एक

काही वर्षांपूर्वी एका देवस्थानाला भेट देण्याचा योग आला. त्या देवस्थानात नेहेमीच खूप गर्दी होते भाविकांची. देवाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं तर तासनतास रांगेत उभं रहावं लागतं. ज्यांना देवासाठी द्यायला तितका वेळ नाही त्यांच्यासाठी देवस्थानाने एक खास सोय ठेवली आहे. एका विशिष्ठ रकमेचं तिकीट काढून देवाच्या एक्सप्रेस दर्शनाची एक विशेष रांग असते त्यात तुम्हाला उभं राहून, इतर

भगवान गौतम बुद्धांची एक गोष्ट वाचनात आली. ती गोष्ट अशी. एकदा एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि म्हणाला,’भगवान मी आपल्या संदेशाच्या प्रसारासाठी गेलो असता काही लोकांनी मला खूप अपमानास्पद वागणूक दिली’ त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, ‘हो का !! पण बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही’. त्यावर तो शिष्य म्हणाला की ‘भगवान, त्यांनी मला मारलं सुद्धा’ त्यावर

१९६८ चा ऑलिम्पिक चा सोहळा. ‘उंचउडी’ म्हणजेच ‘हाय जम्प’ चा सामना. ऑलिम्पिकच्या सामन्यातली जाणवणारी चुरस, स्पर्धा याही सामन्यात शिगेला पोहोचलेली. २.२२ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेला. या उंचीवर रशियाचा खेळाडू बाद झाला. आता बार ची पातळी वाढून २. २४ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेलेला. आतापर्यंत कधीही इतकी उंची उंचउडीच्या सामन्यात पार केलेली नव्हती.

लग्नाच्या संदर्भात एक सुंदर सुभाषित आहे. कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्| बान्धवा: कुलम् इच्छन्ति मिष्टान्नम् इतरे जना: ॥ सुभाषिताचा साधारण अर्थ असा की लग्नामधे मुलगी वराच्या रुपाला वरते, मुलीची आई त्याच्या पैशाकडे, तर वडील त्याच्या गुणांकडे पहातात. नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक फक्त उत्तम जेवणावर लक्ष ठेवतात. लग्नाच्या संदर्भात

काही काही दिवस असे असतात की काहीही न करता आळसात दिवस घालवणे हाच दिवासभराचा प्लॅन असतो. साधारणतः असं सद्भाग्य क्वचित एखाद्या रविवारी किंवा एखाद्या सुटीच्या दिवशी मिळतं. त्यात घरातली सगळी मंडळी बाहेर गेलेली असली तर सोनेपे सुहागा!! एकदा एक असाच सोनियाचा दिवस उजाडला. खरं सांगायचं तर त्या दिवशी अंमळ उशिराच उजाडला. म्हणजे सूर्यदेव मध्यान्ह रेषेवरून

५१ लेख लिहून झाले की थांबायचं असं ठरवलं होतं. कुठेतरी व्यक्त व्हावं असं मनापासून वाटलं म्हणून लिहायला सुरुवात केली. या पूर्वी व्यक्त होण्यासाठी सुरांची, लयीची निवड केली होती मी. पण सुरांतून व्यक्त व्हायच्या ऐवजी आसक्त झालो त्यांच्यावर. आणि माझी गत झाली समुद्रकिनारी गेलेल्या छोट्या मुलांसारखी. शंख शिंपल्यांनी भरलेल्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या छोट्या मुलांना पाहिलं आहे

काही दिवसांपूर्वी एक गंमत घडली. मी जेवणाच्या टेबलवर बसलो होतो. समोर मारी बिस्किटाचा पुडा होता. बिस्किटं संपली होती त्यातली पण थोडा चुरा शिल्लक होता. बोलता बोलता त्या पुड्याला माझा धक्का लागला आणि त्या बिस्किटाचा थोडा चुरा टेबलवर पडला. गप्पा मारता मारता माझ्या नकळत मी तो चुरा माझ्या नखांनी टेबलावरच अधिक चुरायला सुरवात केली. बोलता बोलता

माझ्या ओळखीचं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबातील काका रिटायर झाले आता. पण ते जेव्हा नोकरी करीत होते त्यावेळी खूप सकाळी पहिल्या शिफ्टला जाण्यासाठी घरातून निघत असत. आमच्या जवळच राहायचे ते. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जात असे तेव्हा त्यांच्या घरातलं घड्याळ मला नेहेमी दिसायचं. ते घड्याळ लक्षात राहण्याचं कारण की ते नेहेमी ४५ मिनिटांनी पुढे असायचं.

२०.१ दररोजच्या कटकटीला कंटाळून उद्विग्न मनाने तो घराबाहेर पडला. गच्चीवर गेला आणि कठड्यावर उभा राहिला. घड्याळात बघितलं आणि एकदम भानावर आला कारण औषधाची वेळ झाली होती. तो शांत मनाने कठड्यावरून खाली उतरला. त्याच्या घड्याळानं आज दोन हत्या वाचवल्या होत्या.  एक आत्महत्या आणि दुसरी त्याच्यावर पूर्ण अवलंबून असलेल्या त्याच्या मानसिक रुग्ण मुलाची. २०.२ आज ती आणि