२३.१ एका शिष्याने गुरूंना विचारलं,” दररोज रात्री निजण्यापूर्वी आणि उठल्यावर तुम्ही गादीतच देवाला नमस्कार का करता?” गुरुजी उत्तरले “आयुष्य समेटून सुंदर मरणाला सामोरं जाण्यासाठी रात्री आणि आयुष्य उमलून सुंदर जीवनाला सामोरं जाण्यासाठी सकाळी आशा दोन्ही वेळी मनशक्ती मिळावी यासाठी भगवंताकडे अर्ज आणि दरम्यान झोपेत मुक्तीचा आनंद मिळावा म्हणून प्रार्थना करतो दररोज” २३.२ तो आणि त्याचा

माझ्या भावाने मला नुकताच घडलेला एक गमतीशीर प्रसंग सांगितला. तो आणि त्याचा ८-९ वर्षाचा मुलगा एकदा एका मंदिरात गेले होते. दर्शन झाल्यावर थोडावेळ दोघेही तिथे बसले. येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच गर्दी होती. शनिवारचा दिवस होता म्हणून भक्तमांदियाळी मारुतीरायांकडे जरा अधिकच होती. सगळ्या भक्तमंडळींच्या नमस्काराच्या आणि पूजेच्या वेगवेगळ्या तऱ्हा तो मुलगा पाहत होता. त्याच्या डोक्यात काय सुरु

  मध्यंतरी एका स्नेह्यांच्या घरी श्रीसत्यनारायणाच्या पूजेला  दर्शनाला जाण्याचा योग आला. उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक टुमदार फ्लॅट होता त्यांचा.   श्रीसत्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि लगेच हातावर छानपैकी केशर घातलेल्या आटवलेल्या दुधाचं तीर्थ मिळालं. तीर्थामागे प्रसाद येईल याची मी वाट पाहत होतो पण काही हालचाल दिसेना म्हणून मुकाट्याने जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात एका छान चुटचुटीत प्लॅस्टिकचा बॉक्स

बोहारी नावाचा एक विशिष्ट समुदाय असतो. जुने कपडे किंवा जुनी भांडी घेऊन त्या बदल्यात नवीन वस्तू देणे असा त्यांचा व्यवसाय असतो. लहानपणी आमच्या चाळीत अशीच एक बोहारीण येत असे. तिच्या बांबूच्या विणलेल्या टोपलीत तवे, भांडी, पातेल्या, टोप, पोळपाट, लाटणी, डाव, ओगराळी, चमचे अशा नानाविध गृहपयोगी वस्तू असायच्या. एखाद दुसरा ‘लेटेस आयटम’पण असायचा. प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या

​माझा एक जवळचा मित्र आहे. तो नावाजलेला कलाकारही आहे. ​आम्ही आमच्या आमच्यात वेगळे वागतो मात्र बाहेर सर्वांसमक्ष मी त्याच्याशी वेगळा वागतो. एकदा त्याने मला प्रश्न विचारला की ‘आपण दोघेच असताना तू खूप मोकळा वागतोस पण लोकांत असताना अंतर ठेऊन वागतोस असं का?’ मी त्यावेळी त्याला माझं मत व्यक्त केलं की प्रत्येक व्यक्तीचं , प्रत्येक नात्यामध्ये,

२२.१ एकदा एका सुगंधालयात जाऊन त्याने स्वतःसाठी पाच हजार रुपयांची उंची अत्तरं खरेदी केली. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो दुकानदाराला म्हणाला ,” अरे तुझ्याकडे स्वस्तातल्या उदबत्त्या असतील तर दे. आईला देवपूजेसाठी हव्या आहेत.” २२.२ तो आईबाबांना दररोज देवाला नमस्कार करताना पाहायचा पण आईबाबांनी कितीही वेळा सांगितलं तरी तो देवाला नमस्कार करायचा नाही. सध्या तो

डोंबाऱ्याचा तारेवरच्या कसरतीचा खेळ बघणं हा लहापणीचा एक रोमांचक अनुभव असायचा. अर्थात मुंबईच्या रस्त्यांवर डोंबाऱ्याने खेळापुरतं तात्पुरतं बस्तान बसवावं आणि आम्ही मुलांनी ते घोळका करून पाहावं हे जेव्हा शक्य होतं त्या काळातली गोष्ट करतोय मी. आता डोंबाऱ्याचा खेळ बघण्यासाठी आवश्यक वेळ, त्याच्या तारेवरच्या कसरतीसाठी रस्त्यावर पुरेशी जागा आणि मुंबईकराच स्वतःचच दररोजच आयुष्य तारेवरची कसरत झाल्यामुळे

मला काही वेळा कीर्तनाला तबल्याची साथ करायला जाण्याचा योग येतो. कीर्तनात तबला वाजवणाऱ्या साथीदाराला साधारण संपूर्ण कीर्तनाच्या तीस ते चाळीस टक्के इतक्याच वेळेचं काम असतं. हार्मोनियमच्या साथीदाराला मात्र त्या मानाने खूप सतर्क राहावं लागतं. कारण एक तर कीर्तनकाराला सतत षड्ज किंवा मध्यमाचा सूर देत राहावा लागतो. आणि साकी, दिंडी, आर्या, ओव्या, अभंग, श्लोक, कटाव अशा एक नाही

२१.१ अध्यात्मविचारांनी तो नेहेमी झिंगलेला दिसायचा. होय ! झिंगलेला हाच शब्द बरोबर आहे आणि जाणीवपूर्वक वापरलाय तो ! कारण झिंगलेला आणि रंगलेला या स्थितींमधला फरक लक्षात येतो ना सुज्ञांना लगेच !! २१.२ आचार्य आपल्या लाडक्या शिष्यांना सांगत होते, “ही गोष्ट खरी आहे की देव जसा प्रल्हादाला जवळ घेतो तसा हिरण्यकश्यपूलाही मांडीवर घेतो. आणि हेही खरं

स्थळ हॉस्पिटलचा एक वॉर्ड. संध्याकाळची वेळ. प्रसंग असा की माझे एक नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते आणि त्यामुळे मी ​त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबतीसाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. मी आणि ​माझे नातेवाईक असलेल्या खोलीतच एक दुसरा रुग्ण आणि त्याचा नातेवाईक हे दोघेही होते. संध्याकाळी जवळजवळ दोन तासांच्या व्हीजिटिंग आवर्स मध्ये त्या खोलीत त्या ​दुसऱ्या रुग्णासाठी जमलेल्या लोकांची