३५.१ तो समुद्रावर गेला आणि एक एक शिंपला हातात घेऊन आत पाहत होता. कुणीतरी त्याला विचारलं काय करतोयस ? तो म्हणाला ,” माझी आजी काल गोष्ट सांगताना म्हणाली की आपली नाती म्हणजे शिंपल्यातल्या मोत्यांसारखी असतात, दुर्मिळ आणि मौल्यवान. म्हणून माझे आई बाबा मिळतायत का ते शोधतोय या शिंपल्यात..” ३५.२ दिवे गेले म्हणून तो अंधारात चाचपडत

Tagged under: ,

३४.१ त्याच्या अप्रतिम पदलालित्याचं तोंड भरुन कौतुक केल्यावर त्याला रंगमंचावर बोलावलं तेव्हा सत्काराला उत्तर देताना तो म्हणाला”क्षमा करा, तुमच्यासमोर असं व्हीलचेअरवर बसून राहणं योग्य नाही पण नृत्य करताना होणाऱ्या वेदना येऊ देत नाही मी चेहऱ्यावर पण नृत्यानंतर मात्र माझ्या वेशभूषेबरोबर माझे जयपूर फूट पण काढावे लागतात मला … ३४.२ परवडत नाही म्हणून दोघांपैकी एकालाच खूप

Tagged under: ,

३३.१ तो धावता धावता तोंडाला फेस येऊन पडला. त्याने वर पाहिलं तर आजूबाजूच्या सगळ्यांच्याच तोंडाला फेस आला होता. त्याने त्यातल्याच एकाला विचारलं अरे आपण का इतके धावतोय ? तो म्हणाला मला माहीत नाही पण एक लक्षात आलंय की जितका फेस तोंडाला जास्त येतो तितके जास्त पैसे जमा होतात बँकेत माझ्या.. ३३.२ तो जादूगार रस्त्यावर खेळ

३२.१ त्याच्या मित्राने त्याला खूप रकमेचं कर्ज दिलं. त्याने मित्राला विचारलं “हमीपत्र कुठल्या वकीलाकडून करून घेऊया?” मित्र म्हणाला, “कागद नको. तू फक्त शब्द दे. तुझ्या संकारांचं हमीपत्र पुरेसं आहे माझ्यासाठी” ३२.२ विषण्ण मनाने तो देवळात गेला पण मन शांत झालं नाही त्याचं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो त्याच मनस्थितीत स्मशानात गेला. तिथे जळणाऱ्या एकाकी

कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे ३१.१ खूप वर्षांनी मी परवा रद्दी टाकायला रद्दीवाल्याकडे गेलो.  त्याने रद्दीचं वजन करून अर्धेच पैसे दिले. मी कारण विचारल्यावर तो निरागसपणे म्हणाला,” दादा, काय जादू झाली माहीत नाही, पण हल्ली पूर्वीपेक्षा दुप्पट माल पारड्यात घालावा तेव्हा

कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे.  ३०.१ आपली एकजूट कशी दाखवायची या विषयावर वाद वाढत जाऊन शेवटी ते एकमेकांच्या उरावर बसले आणि तो प्रश्न त्यांनी परस्पर सामंजस्याने सोडवला. ३०.२ एक तरुण खोलीतून बाहेर आला आणि बाबांना म्हणाला ,”बाबा बाबा !, बघा ना 

प्रसन्न सकाळी चहाचा वाफाळता कप हाती घेऊन कोरं करकरीत वर्तमानपत्र पुढ्यात घेऊन बातम्या वाचण्यामध्ये एक वेगळाच अवर्णनीय रोमान्स असतो. पतीराज या रोमान्सच्या मूडमध्ये असताना गृहिणींच्या मनात मात्र नवऱ्याने सकाळचा पेपर हातात घेतल्या क्षणी सवतीमत्सर का जागा होतो हे मला अजून न उमगलेलं कोडं आहे. चिडचिडीचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला तर,  ” मी रिकामटेकडी बसली नाहीये

२९.एक ढग नुसताच गर्जायचा बरसायचाच नाही. त्याने आषाढातल्या ढगांशी फारकत घेऊन वेगळा पक्ष काढलाय म्हणे !! २९.त्याने कुणालाच कधी मदत केली नाही, तो कधी कुणात मिसळला नाही, उलट  शेजारच्यांना शिव्याच देत राहिला. एक दिवस अचानक घरात पाणी शिरलं त्याच्या आणि सगळा गाव मदतीला धावला. पण सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तो सगळ्यांना एवढंच म्हणाला की,” कामच होतं

२८.१ परवा फ्युजन म्युझिकची धून खूप आवडली म्हणून एका गाण्यावर बेभान होऊन नाचले लोक एका चित्रपटगृहात. बऱ्याच लोकांना लक्षातच आलं नाही की ते राष्ट्रगीत वाजत होतं. हे जेव्हा कळलं त्यावेळी मात्र कोणीतरी त्यांना त्यांच्या भावना दुखावल्याचं लक्षात आणून दिल आणि म्हणून त्यावेळी चित्रपटगृहच जाळून टाकलं त्यांनी. २८.२ जेव्हा खिशात पडत होते तेव्हा काहीच वाटत नव्हतं

मी काही दिवसांपूर्वी एका कलाकाराची जीवनी वाचत होतो. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला स्वप्नवत वाटावं असं त्या कलाकाराला यश मिळालेलं होतं. अत्यंत देखणं रूप, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता सर्वच. एका काळी तो कलाकार इतका यशस्वी होता की प्रत्येक उदयोन्मुख कलाकाराचं त्या कलाकारासारखं यशस्वी व्हायचं हेच ध्येय असायचं. पण पुढे त्या कलाकाराला व्यसन लागलं आणि हळू हळू तो त्याच्या