लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीत एका राजाला डुकराचे कान होते. त्यामुळे तो असा फेटा बांधायचा की कुणालाच त्याचे कान दिसायचे नाहीत. पण त्या राजाचे केस कापणारा ‘राजनाभिक’, त्या पासून कसं लपून राहणार हे गुपित! पण राजाने त्याला सक्त ताकीद दिली होती की त्याने जर हे गुपित कोणाला सांगितलं तर त्याचा त्याच दिवशी शिरच्छेद

साक्षी हे गण आप्त मित्र मिळुनी जमली इथे मंडळी। येऊनी घटिका समीप शुभ या स्थानावरी थांबली। वरमाला धरुनी करी सुखकरी लक्ष्मी उभी मंदिरी विष्णूचे व्रत घेऊनि वर उभा वरण्या वधू लाजरी।।1।। सौख्याने भरू देत हा प्रतिदिनी संसार ऐसा खरा। आतिथ्या करण्यास मात्र कधिही देईन ना अंतरा। ऐशा या वाचनास नित्य दृढ या ठेऊनिया अंतरी। विष्णूचे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका समारंभात गेलो होतो. त्या समारंभात एक जोडपं आणि त्यांचा एक चुणचुणीत मुलगा असं कुटुंब भेटलं. विषयात विषय निघत गेले आणि तो मुलगा काय करतो यावर विषय सुरू झाला. एकंदरीत वर्णनातून असं कळलं की तो मुलगा इंटरनॅशनल शाळेत शिकतो. शाळेमध्ये फुटबॉलचं विशेष कोचिंग आठवड्यातून दोन वेळा सकाळी सहा वाजता शाळा सुरु

काही दिवसांपूर्वी मी लेख लिहू लागलो. मी काही लेखक नव्हे. पण मनात विचारांचे जेव्हा जेव्हा तरंग उठतील ते तरंग माझ्या कुवतीप्रमाणे शब्दबद्ध करायचे या विचाराने मी लिहायला लागलो. मी सुचेल तसं आणि सुचेल तेव्हा लिहीत असे, अजूनही तसंच लिहितो. दररोज काहीना काही विषयासंबंधातील चिंतन होतं आणि ते विचार मनात घोळत असल्यामुळे त्या अनुषंगाने दररोज काही ना काही

काही काळापूर्वी माझ्या वाचनात एक छान लेख आला होता. तो जगातल्या सर्वात श्रीमंत व्यंक्तींपैकी एकावर लिहिलेला मुलाखतवजा लेख होता. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकाला त्या मुलाखतीत विचारलं होतं की “तुम्ही इतकं प्रचंड आर्थिक साम्राज्य उभारलं. ते करत असताना तुम्हाला अनेकवेळा खूप महत्वाचे आर्थिक निर्णय घ्यावे लागले असतील. प्रत्येक निर्णयावर लक्षावधी डॉलर्सची उलाढाल अवलंबून असायची. अशावेळी

१९.१ एकदा टपरीवरचा चहा पंचतारांकित चहाला म्हणाला ,” आपल्यात चहा पावडर तीच, साखर तीच, पाणी तेच दूध तेच मग तुला इतकी किंमत का ? पंचतारांकित चहा म्हणाला,” मित्रा,चहा आपला निमित्त असतो, किंमत ज्या कपात तो दिला जातो त्याची असते.” त्यावर टपरीवाला चहा त्याला म्हणाला ,” ओह, मग मी आहे तिथेच असलो तरी चालेल कारण इथे

माझ्या ओळखीचं एक दाम्पत्य आहे. त्यातील श्रीमान रात्री झोपल्यावर खूप घोरत असत. इतकं की त्या घोरण्यामुळे श्रीमतींना झोपणं मुश्किल होऊन जात असे. बरेच दिवस त्या दांपत्याने या समस्येवरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. घोरण्यावरची औषध झाली, नाकाला लावायची क्लिप झाली, कुशीवर निजण्याची सवय लावायचा प्रयत्न झाला पण सर्व उपाय थकले. एक दिवस अचानक गर्मीच्या दिवसांमध्ये एका

श्री रामकृष्ण परमहंसांच्या एका भक्ताची एक गोष्ट वाचनात आली. ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे आणि ज्यांची श्रद्धा आहे अशी मंडळी त्यांच्या गाडीत त्यांच्या आराध्य देवतेचा किंवा सद्गुरूंचा फोटो ठेवतात. साधारणतः तो फोटो गाडीत बसलेल्या माणसांच्याकडे तोंड करून ठेवलेला असतो. पण या श्री रामकृष्णांच्या भक्ताने त्या फोटोचं ​छोटं ​मंदिर आणि त्यातील श्रीरामकृष्णांचा फोटो समोरच्या बाजूला ड्रायव्हर सारखा

काही दिवसांपूर्वी एक अप्रतिम विडिओ पाहिला. तो होता पदार्थविज्ञानात आणि एकंदरीतच जगाच्या इतिहासात उलथापालथ घडवून आणणाऱ्या आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाच्या दोन सिद्धांतांविषयी. एका सिद्धांतात आईन्स्टाईनने जडपदार्थ (Matter), ऊर्जा (Energy) आणि प्रकाशाचा वेग (Speed of Light) याचा संबंध जोडला आणि एक जगप्रसिद्ध समीकरण जन्माला घातलं E=MC². या समीकरणाचा अर्थ असा की एखाद्या पदार्थात किती ऊर्जा साठवलेली असते?

आमच्या सोसायटीत दर वर्षी दोन वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवसापूर्वी दोन दिवस आमचा वॉचमन सोसायटीमधल्या सगळ्या घरात येऊन “कल टाकी साफ होनेवाला है. पुरा दिन पानी बंद रहेगा. घरमे पानी भरके रखना. परसो भी सफाईके कारण थोडा गंदा पानी आ सकता है. थोडा ध्यान