खांब खांब खांबोळी – ३ ऑक्टोबर २०१७
खांब खांब खांबोळी एकदा ट्रेन मधून दूरच्या प्रवासाला जात होतो. कामानिमित्त दौरा असल्यामुळे एकटाच होतो. माझ्या डब्यात माझ्या कंपार्टमेंट मध्ये माझ्यासारखेच कामानिमित्त प्रवास करणारे इतर पाच प्रवासी होते. काही नोकरी करणारे काही व्यावसायिक होते. पल्ला बराच लांबचा होता. हळू हळू परिचय व्हायला लागला, गप्पा व्हायला लागल्या. मला अशी संभाषणं खूप आवडतात. नवीन छान माणसं भेटतात,
- Published in marathi
अहंकार आणि लिफ्ट- ३ ऑक्टोबर २०१७
माझ्या करियरच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ १४ वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर नोकरी करण्याचा योग आला. आणि त्या नंतर नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचा , बऱ्याच जणांच्या दृष्टीने मूर्खपणाचा!, निर्णय घेतला. तो निर्णय इतरांना मूर्खपणाचा वाटणं साहजिकच होतं त्यांची चूक नाही त्यात. कारण त्या काळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं स्थान स्वर्गाच्या दोनच बोटं खाली आहे असं
- Published in marathi
कॉंटिनेंटल नैवेद्य- २ ऑक्टोबर २०१७
आमच्या घराजवळच्या एका संस्थेमध्ये गणपतीमध्ये विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाआरती असते. लहानपणी आम्ही त्या दिवसाची अगदी वाट पाहत असू. बेंबीच्या देठापासून ओरडून गायल्या जाणाऱ्या वीस पंचवीस आरत्या, ढोल , ताशे, टाळ, मृदंग, रिंगण, फुगड्या, नाच, गजर अशी धमाल असायची. असायची कशाला अजूनही असते. आणि अगदी खरं सांगायचं तर लहानपणी पाहायचो तशी अजूनही मी त्या महा-आरतीची वाट
- Published in marathi
स्थितप्रज्ञतेचा रबरबँड- 1 ऑक्टोबर 2017
श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील उत्तरार्धात स्थितप्रज्ञाची लक्षण भगवंतांनी सांगितलेली आहेत. स्थितप्रज्ञ हा दुर्घटनेने किंवा दुःखाने कष्टी होत नाही आणि त्याला सुखाची आसक्ती नसते. कासव ज्याप्रमाणे आपलं अंग कवचामध्ये ओढून घेतं तसं स्थितप्रज्ञ आपले षडरिपू आपल्या नियंत्रणात ठेवतो. तो विषयभोगांपासून दूर राहतो. तो मनोवसना टाकून देतो. ही आणि अशी अनेक स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. ही
- Published in marathi
नादयात्रा- २९ सप्टेंबर २०१७
एकदा एक पालक त्यांच्या ६-७ वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. मला म्हणाले, “सर ह्याला काहीतरी शिकवायचंय.” मी म्हणालो “काहीतरी म्हणजे नक्की काय?” “काहीतरी म्हणजे संगीतातलं काहीतरी”, पालक म्हणाले. मी म्हणालो ” मी तबला आणि संवादिनी दोन्ही शिकवतो त्यापैकी काय?”. त्यावर पालक म्हणाले, “अहो आता सुट्या लागल्या आहेत. घरी बसला ना की भयंकर मस्ती करतो. या
- Published in marathi
माणुसकीचं MLM- २८ सप्टेंबर २०१७
काही दिवसापूर्वी एक माणूस मला भेटला. एका मित्रामुळे त्यांची आणि माझी ओळख झाली. फारशी ओळख नसून तो खूप मित्रत्वाने वागत होता माझ्याबरोबर. एक दोन वेळा भेटल्यावरच त्याने मला एका कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. इतकच नव्हे तर त्याचा गाडीतून मला घेऊन जाण्याची तयारीही दर्शवली. मी त्याला विचारलं की काय कार्यक्रम आहे तर त्यावर त्यानं मला अगदी
- Published in marathi
निर्विकल्प समाधीचा डेमो- 27 सप्टेंबर 2017
स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध शिकागो व्याख्यानाला 125 वर्ष पूर्ण होतील. हे व्याख्यान म्हणजे नुसत्या स्वामी विवेकानंदांच्याच चरित्रात नव्हे तर भारतीय इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेले क्षण आहेत. स्वामी विवेकानंदांच चरित्र वाचनात खूप वर्षांपूर्वी लहानपणी आलं. त्यात त्यांच्या बालपणीचे प्रसंग वाचताना मजा वाटायची. लहानपणी एका झाडाला ब्रह्मसमंध बाधा झाली आहे हे कळल्यावर त्या झाडावर ते रात्री बारा वाजता
- Published in marathi
किंमत मूल्य आणि अमूल्य- २६ सप्टेंबर २०१७
माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनात भाग घेण्याचा योग आला. आमची उत्पादनं तिथे विक्रीला असायची. तिथे येणाऱ्या ग्राहकाला आमच्या उत्पादनांबद्दल माहिती द्यायचो आणि इतर काही शंका असतील तर त्यांचीही, त्यांचं समाधान होईपर्यंत उत्तरं देण्याचा प्रयत्न करीत असू. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात काही वर्ष मी स्वतः स्टॉलवर उभा राहून विक्री करत असे, ग्राहकाशी बोलत असे. त्यानिमित्ताने मनुष्यस्वभावाचे
- Published in marathi
सत्वगुणाची चक्रवाढ- २५ सप्टेंबर २०१७
कोकणात गावी आमची छोटी जागा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तिथे बांबूची चार पाच रोपटी रुजवली होती. त्या चारपाच रोपट्यांचं आता बांबूचं बनच तयार झालं आहे. त्या पहिल्या चार पाच रोपांनंतर तिथे नवीन बांबूची रोपणी केलीच नव्हती. मग ते बन कसं वाढलं याच उत्तर शोधताना असं लक्षात आलं की बांबूची वाढ चक्रवाढ दराने झाली आहे. त्यावेळी एक
- Published in marathi
देवाची भाषा- २४ सप्टेंबर २०१७
परवा एका पूजेला जाण्याचा योग आला. पूजेचे मंत्र ‘देवभाषा’ म्हणून जी मानली जाते त्या संस्कृतमध्ये म्हटले जात होते. ते ज्या पद्धतीने म्हटले जात होते ते ऐकून विचार आला की देवभाषा जरी संस्कृत असली तरी असे म्हटलेले मंत्र देवाला तरी समजत असतील का? ह्या विचारावरून काही वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सहज आठवला. माझ्या भाच्याने एकदा कुठल्यातरी
- Published in marathi










