मी ‘सोनी’ या जगद्मान्य कंपनीचे संस्थापक ‘अकिओ मोरिता’ यांचं “मेड इन जपान” हे पुस्तक वाचत होतो. दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण बेचिराख झालेल्या या देशात कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना ‘मासारु इबुका’ या सहसंस्थापकाबरोबर त्यांनी ‘सोनी’ सारखी कंपनी सुरु केली आणि नंतर ती जगाच्या पाठीवर एक बलाढ्य कंपनी म्हणून नावारूपाला आणली. पूर्वी “मेड इन जपान” ही ओळ

नुकताच मला माझा एक लहानपणीचा मित्र भेटला. चौकशी करताना माझा नेहेमीचा प्रश्न, “काय करतोस हल्ली?” त्यावर तो म्हणाला , ” अजूनही ‘Life In Comfort’ मध्येच आहे”. माझा गोंधळलेला चेहरा ओळखून तो म्हणाला “अरे म्हणजे LIC – Life Insurance Corporation चा एजन्ट आहे” छान चाललंय सगळं”. Life In Comfort – LIC चा इतका यथायोग्य फुलफॉर्म मला

मध्यंतरी एक चर्चा रंगली. निर्गुणभक्तीपंथी एका अनुयायाने एक प्रश्न विचारला “गणपतीबाप्पाची मूर्ती 10 दिवस मनोभावे पूजल्यावर त्याचं वाजतगाजत विसर्जन लोकं कसं करू शकतात?” प्रश्न एका दृष्टीनं अगदीच चुकीचा नव्हता. या प्रश्नासंदर्भात तत्वज्ञानाचे खूप कंगोरे निघून त्यावर न संपणाऱ्या चर्चा घडू शकतील. पण या निमित्ताने बरेच दिवस माझ्या मनात घोळत असलेल्या एका विषयाचं विचारचक्र पुन्हा मनात

१७.१ दाराबाहेर उभं राहून एक भिक्षेकरी अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनाम देहम आश्रित: । प्राणापान समायुक्त: पचामि अन्नम चतुरविधम ।। या श्लोकावर प्रवचन ऐकत उभा होता. पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. पूर्ण प्रवचनभर त्याला काहीच कळलं नाही पण सगळ्या प्रवाचनाचा  अर्थ त्याला त्याच्या हातातल्या वाडग्यात शिळी पोळी पडल्यावर क्षणार्धात उलगडला. १७.२ श्रीमदभगवद्गीतेवर प्रवचनं करून त्या मिळकतीवर

नुकताच मी एका परिसंवादात भाग घेतला. परिसंवादात खूप अनुभवी, खूप विद्वान आणि खूप यशस्वी व्यक्तींनी भाग घेतला होता. प्रत्येकाची कहाणी, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांना मिळालेलं यश हे ऐकणं, आयुष्याच्या विविध कंगोऱ्यांवर त्यांच्याशी चर्चा करणं व्यक्तीगतरित्या खूप प्रेरणादायी ठरलं. त्या सगळ्या चर्चेत माझ्या सहवासात आलेल्याच काय पण जगात कुठेही यशस्वी झालेल्या व्यक्तीच्याबाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली

माझे संवादिनीचे गुरू पं. मनोहर चिमोटे यांची काल 5 वी पुण्यतिथी. त्यांचं सही सही वर्णन म्हणता येईल असं सूर संगम चित्रपटातील गाणं मला आठवतंय. ते गाणं असं ; साधो ऐसा ही गुरू भावे l राग रंग के भर भर प्याले पीये और पिलावे l साधो ऐसा ही गुरू भावेl नाद छुपा तन मे लय मनमे

परवा गणेशोत्सवात एक ५-६ वर्षाचा छोटा मित्र माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला “काका, तुम्हाला एक कोडं घालू का?”. मी हो म्हटल्यावर त्यानी विचारलं ” काका ATM चा फुलफॉर्म सांगा.” मी म्हटलं, “अगदीच सोपं आहे. (A)ऑल (T)टाइम (M)मनी”. माझं उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे चुकल्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर झळकला आणि तो म्हणाला , ” नाहीच मुळी. खरं उत्तर

Ashtang Yog

परवा एका कार्यक्रमानंतर घरी परतलो आणि अंगावरचा कुर्ता काढता काढता सहज मनात आलं की हा कुर्ता पुन्हा धुवून, इस्त्री करून नीट ठेवला पाहिजे म्हणजे पुढे नंतर पुन्हा कधीतरी वापरता येईल. गम्मत म्हणजे हा विचार करता करता भंगवंतांच्या भगवदगीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायामधला २२ वा श्लोक सहज आठवला; वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर खूप परिणाम होतो असा मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे. सर्व संत मंडळींनी म्हणूनच सत्संगतीचा महिमा गायला आहे. वातावरणाचा मनावर खूप परिणाम होतो आणि त्याच वातावरणातील लहरींशी मन एकरूप होण्याचा प्रयत्न करतं असं मानसशास्त्र मानतं. आधुनिक जगात सर्वच बाबतीत संगणकीकरण सुरु आहे. डिजिटल जग सर्वच व्यापून दशांगुळं उरलं आहे. ध्वनी डिजिटल, छायाचित्र डिजिटल,

बुद्धिबळ हा खूप गमतीशीर खेळ आहे. हालचालीला केवळ ६४ घरं. वेगवेगळ्या स्वभावाची म्हणजेच चालीची ३२ प्यादी. त्यात एक वजीर आणि एक राजा. ६४ घरं पण दोनच रंगांची. घर एक तर काळं तरी नाहीतर पांढरं तरी. बुद्धिबळ खेळताना पहिल्या चालीपासून सावध असायला लागत कारण एक चाल, एक निर्णय चुकीचा घेतला आणि समोरचा चाणाक्ष असला की जी