आमच्या घराजवळच एक शांत मंदिर आहे. “जागृत स्थान” अशी प्रसिद्धी झाली नसावी कदाचित म्हणून ते मंदिर अजून तरी गजबजलेलं नाही आणि म्हणूनच देव अजूनही त्या वास्तूत टिकून आहे अशी एक माझी श्रद्धा आहे. त्या शांत मंदिरात गेलं नं की गाभाऱ्यात गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. परिसरातल्या गडबड हालचाली आवाज बाहेरच रावखुळलेले असतात. गाभाऱ्यात बऱ्याच वेळा

कोणी जर कधी आपल्याला सांगितलं की कुणी आपल्याबरोबर २४ तास राहतं. त्याच्या इच्छेनुसार आपल्याला नाचवतं पण असं असूनही आपली त्याच्याशी फारशी ओळख नसते तर खरं वाटेल? अहंकाराचं तसंच नाही का? खूप ऐकत आलोय या अहंकाराबद्दल. प्रत्येक जागृत क्षणी आपला अहंकार एक तर सुखावत असतो किंवा दुखावत असतो. पण हा अहंकार म्हणजे नक्की आहे तरी काय?

१६.१ दोन मित्रांची खूप गट्टी होती. ते नेहेमीच त्यांचं सगळं एकमेकात वाटायचे. त्या दिवशी दंगल झाली आणि त्यांच्याच समाजाने त्यांना मारून टाकलं. कारण मारेकऱ्यांनी फक्त कपडे पाहिले आणि त्यांचे रंग. त्यांना कुठून माहीत असणार त्या दोघींनी आदल्याच रात्री त्यांच्या आवडत्या ड्रेसची अदलाबदल केली होती एकदाच घालून पाहण्यासाठी. १६.२ त्याचा भोंगा सुरू झाला की याच्या तेवढ्याच

जन्माला येऊन थोडं कळायला लागल्यावर प्रत्येक श्वास हा आपण जगापासून वेगळे आहोत ही जाणीव करून घेणे आणि मग जगात आपलं वेगळेपण प्रस्थापित करण्यात खर्च होतं. आपण जगावेगळ काहीतरी कराव, आपण चार चौघात उठून दिसावं, आपलं चार चौघात कौतुक व्हावं यासाठी आपल्या अजाणतेपणी आपले आईवडील आणि नंतर जाणते झाल्यावर आपण या इच्छेला खात पाणी देतो आणि

१५.१ एकदा एका बिल्डिंगच्या मैल्याची टाकी तुंबली म्हणून सफाई कामगाराला बोलावलं. तो काम झाल्यावर स्वच्छ होऊन आला आणि त्याने पाणी मागितलं तर त्याला दुरूनच तुटक्या कपातून पाणी मिळालं आणि त्याला सांगण्यात आलं,”जाता जाता तो कप कचऱ्यातच फेकून दे रे” १५.२ एक मजूर दुपारच्या उन्हात रस्त्याच्या कडेला खडी फोडत होता आणि शेजारीच पहुडलं होतं त्याचं तान्हं

१४.१ एका मजुराच्या मुलाला रद्दीत एक जुनं मराठी म्हणी, सुभाषितांच पुस्तक मिळालं. तो ते पुस्तक घेऊन आपल्या मालकाच्या मुलाकडे गेला आणि म्हणाला “माझा बा, मला साळत न्हाई पाठवू शकत. मला ह्यो वाचून दाखिव की रे!” त्यावर मालकाचा मुलगा त्याला म्हणाला, “अरे हे मराठीत आहे , मला नाही रीड करता येत.तू डॅडबरोबर चेक कर ते लहानपणी

सैनिकहो तुमच्यासाठी १३.१ ‘सरहद जवान मदत निधी’ साठी जेव्हा कार्यकर्ते त्याच्या घरी गेले तेव्हा त्याने त्यांना विन्मुख परत पाठवलं कारण त्याचं सगळं बजेट नुकतंच त्यांच्या घराची सेक्युरिटी सिस्टिम बसवण्यात खर्च झालं होतं म्हणे!! १३.२ एका नेत्याने प्रस्ताव आणला की सैन्यात धर्माप्रमाणे तुकड्या पाडाव्या. सगळ्या सैनिकांनी ते मान्य केलं पण एकच अट ठेवली की प्रत्येकाच्या धर्मानुसार

१२.१ त्याने स्वतःच्या फायद्यासाठी खांद्यावरच्या झेंड्यांचे आणि स्वतःचेही रंग बदलले खूप वेळा. या भानगडीत तो इतका बदलला की आता लोकांचं तर सोडाच पण ओळख न पटून त्याच्या घरातलं कुत्रदेखील भुंकतं त्याच्यावर. १२.२ ज्या धर्मादाय संस्थेच्या कार्यात त्याने इतकं वाहून घेतलं होतं स्वतःला की तो गेल्यानंतर यदाकदाचित संस्थेनं त्याच्या मनाविरुद्ध पण त्याच्या सन्मानार्थ  फोटो लावला भिंतीवर

११.१ त्याला अनंत व्याधी होत्या पण तरीही तो नेहेमी प्रसन्न असायचा. त्याला एकाने विचारलं,”इतक्या आजारातही कसा आनंदी राहू शकतोस तू?” तो म्हणाला,”या आजाराने मला वेदना आणि दुःख यातला फरक शिकवला आणि तेंव्हापासून मी वेदना सहन करूनही आनंदात असतो,” ११.२ एकदा एका दारुड्याचा एका धर्मप्रसारकला धक्का लागला. त्या एका कारणावरून तो धर्मप्रसारक त्या दारुड्याला खूप अद्वातद्वा

१०.१ तो नेहेमी एका प्रार्थनास्थळाबाहेर लोकांच्या चपला सांभाळायचा. पण त्याला आत जाताना कधी पाहिलं नाही. त्याला विचारलं तर तो म्हणाला. प्रत्येक माणसात ‘तो’ आहे तर मी आत जाऊन अजून वेगळं असं पादुकांचं दर्शन काय घेणार ? १०.२ प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेने होत असते असं लहानपणापासून त्याचे वडील त्याला सांगत आले. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले ,”