२१.१ अध्यात्मविचारांनी तो नेहेमी झिंगलेला दिसायचा. होय ! झिंगलेला हाच शब्द बरोबर आहे आणि जाणीवपूर्वक वापरलाय तो ! कारण झिंगलेला आणि रंगलेला या स्थितींमधला फरक लक्षात येतो ना सुज्ञांना लगेच !! २१.२ आचार्य आपल्या लाडक्या शिष्यांना सांगत होते, “ही गोष्ट खरी आहे की देव जसा प्रल्हादाला जवळ घेतो तसा हिरण्यकश्यपूलाही मांडीवर घेतो. आणि हेही खरं

२०.१ दररोजच्या कटकटीला कंटाळून उद्विग्न मनाने तो घराबाहेर पडला. गच्चीवर गेला आणि कठड्यावर उभा राहिला. घड्याळात बघितलं आणि एकदम भानावर आला कारण औषधाची वेळ झाली होती. तो शांत मनाने कठड्यावरून खाली उतरला. त्याच्या घड्याळानं आज दोन हत्या वाचवल्या होत्या.  एक आत्महत्या आणि दुसरी त्याच्यावर पूर्ण अवलंबून असलेल्या त्याच्या मानसिक रुग्ण मुलाची. २०.२ आज ती आणि

१९.१ एकदा टपरीवरचा चहा पंचतारांकित चहाला म्हणाला ,” आपल्यात चहा पावडर तीच, साखर तीच, पाणी तेच दूध तेच मग तुला इतकी किंमत का ? पंचतारांकित चहा म्हणाला,” मित्रा,चहा आपला निमित्त असतो, किंमत ज्या कपात तो दिला जातो त्याची असते.” त्यावर टपरीवाला चहा त्याला म्हणाला ,” ओह, मग मी आहे तिथेच असलो तरी चालेल कारण इथे

१८.१ वास्तुसंग्रहालयातील त्या भग्न मुर्तीसमोर उभा राहून मी त्या मूर्तीच्या तुटलेल्या हाताकडे पाहून हळहळत होतो. एवढ्यात ती मूर्ती   जिवंत होऊन मला म्हणाली,” माझा हात तोडला तेव्हा परकीय आक्रमण तरी झालं होतं रे! स्वतंत्र देशात तुमची अवस्था माझ्यापेक्षा काही वेगळी आहे असं वाटतंय का तुला ?” माझी नजर जमिनीकडे वळली नकळत. १८.१ समुद्रकिनाऱ्यावरून चालत होतो.

१७.१ दाराबाहेर उभं राहून एक भिक्षेकरी अहं वैश्वानरो भुत्वा प्राणिनाम देहम आश्रित: । प्राणापान समायुक्त: पचामि अन्नम चतुरविधम ।। या श्लोकावर प्रवचन ऐकत उभा होता. पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. पूर्ण प्रवचनभर त्याला काहीच कळलं नाही पण सगळ्या प्रवाचनाचा  अर्थ त्याला त्याच्या हातातल्या वाडग्यात शिळी पोळी पडल्यावर क्षणार्धात उलगडला. १७.२ श्रीमदभगवद्गीतेवर प्रवचनं करून त्या मिळकतीवर

१६.१ दोन मित्रांची खूप गट्टी होती. ते नेहेमीच त्यांचं सगळं एकमेकात वाटायचे. त्या दिवशी दंगल झाली आणि त्यांच्याच समाजाने त्यांना मारून टाकलं. कारण मारेकऱ्यांनी फक्त कपडे पाहिले आणि त्यांचे रंग. त्यांना कुठून माहीत असणार त्या दोघींनी आदल्याच रात्री त्यांच्या आवडत्या ड्रेसची अदलाबदल केली होती एकदाच घालून पाहण्यासाठी. १६.२ त्याचा भोंगा सुरू झाला की याच्या तेवढ्याच

TOP