अलक (अति लघु कथा) – भाग ९ (Alak – Part 9)
९.१ घरेलू बायको म्हणून पार्टीज मध्ये तिला तो घेऊन जात नसे. पण त्याला अर्धांगवायू झाला तेव्हा त्याला आणि त्याच्या व्यवसायालाही घरीच बसून सांभाळलं तिने. ९.२ हौदात दिसणाऱ्या पाण्याच्या नितळतेबद्दल सगळे हौदाचं कौतुक करायचे आणि पाण्याचं गुणगान. कोणीतरी आला आणि तळ हलवून गेला काठीने. तेव्हा कळलं लोकांना हौदाने आणि पाण्याने मिळून किती चिखल दडविला होता तळाशी.
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ८ (Alak – Part 8)
८.१ एकदा एका ठिकाणी पाहिलं की खूप संगणक त्यांच्या समोर बसलेल्या माणसांना खेळवत होते. एका संगणकाला विचारलं काय करतो आहेस ? तर तो उत्तरला. आमच्या आभासी बुद्धीचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करून माणसाची बुद्धी वाढवायचे प्रयोग चालले आहेत. ८.२ एका संतांच्या तीर्थक्षेत्राला गेलो असता तिथल्या एका विविधवस्तू भांडारात जाण्याचा योग आला. मी सहज चौकशी केली,”सर्वात जास्त
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ७ (Alak – Part 7)
७.१ एकदा शिष्य गुरूंना विचारतो,” गुरुजी एखाद्या माणसाच्या विचाराची खोली कशी ओळखायची?” गुरुजी म्हणतात,” तो स्वतःविषयी किती बोलतो यावरून” “आणि उंची?” शिष्य विचारतो. गुरुजी उत्तरतात,” तो इतरांविषयी कसं बोलतो यावरून” ७.२ काल माझ्या मित्राचा मेसेज आला,”काय करतोयस आत्ता? कंटाळा आलाय. कट्ट्यावर भेटूया?” मी मेसेज लिहिला,”नाही जमणार खूप बिझी आहे” त्यानं ,” बरं” असा मेसेज
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ६ (Alak – Part 6)
६.१ शेजारच्या परसातील गवताच्या गंजीला लागलेल्या आगीमुळे आपला गोठा जळला असा समज करून त्याने शेजाऱ्याचं अख्ख घर जाळलं. या गदारोळात कुणाच्याच लक्षात आलं नाही की यात ज्याचा सर्वाधिक फायदा झाला त्याला गंजी पेटवायला केवळ एक काडीचा खर्च आला. ६.२ हल्ली आमच्या घरातला देव्हारा खूप खराब झालाय हे असे लोक आम्हाला सांगतायत की ज्यांच्या घरात देव्हाराच
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ५ (Alak – Part 5)
५.१ तो एक कर्तृत्ववान माणूस होता. खूप मोठं कार्य उभारलं त्याने.त्याच्या अनुयायांनी त्याला देव मानला. आता त्याचे अनुयायी त्याच्या पूजेशिवाय काहीच करत नाहीत. ५.२ सर्वांच्या हृदयाला हात घालायचा म्हणून तो कलाकार खूप लोकप्रिय झाला. नंतर त्याच्या भोवती पुरस्कारांची भिंत उभी राहिली आणि तो दिसेनासा झाला. ५.३ एकदा नदीच्या शेजारून जात असताना नदीने हाक मारली आणि
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४ (Alak – Part 4)
४.१ कोपऱ्यावरच्या रामय्याच्या टपरीला उर्जितावस्था येते आहे हे काल जगजाहीर झालं. परवापर्यन्त आमच्या कटिंग चहाचे पैसे बहीखात्यावर टाकणाऱ्या रामय्याने काल ‘आज नगद कल उधार’ ही पाटी लावली टपरीच्या पत्र्याला, आमच्याकडे पहात. ४.२ आशा कशाला म्हणतात ते हल्लीच पटलं मला जेव्हा मी ऐकलं की रेल्वेमार्गाचा एक रूळ दुसऱ्या रुळला म्हणत होता ,”चल! भेटू लवकरच क्षितिजावर”. ४.३
- Published in alak






