Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • alak
  • अलक (अति लघु कथा) – भाग ७ (Alak – Part 7)

अलक (अति लघु कथा) – भाग ७ (Alak – Part 7)

by Rajendra Vaishampayan / Saturday, 13 May 2017 / Published in alak

७.१

एकदा शिष्य गुरूंना विचारतो,” गुरुजी एखाद्या माणसाच्या विचाराची खोली कशी ओळखायची?”
गुरुजी म्हणतात,” तो स्वतःविषयी  किती बोलतो यावरून”
“आणि उंची?” शिष्य विचारतो.
गुरुजी उत्तरतात,” तो इतरांविषयी   कसं बोलतो यावरून”

७.२

काल माझ्या मित्राचा मेसेज आला,”काय करतोयस आत्ता? कंटाळा आलाय. कट्ट्यावर भेटूया?”  मी मेसेज लिहिला,”नाही जमणार खूप बिझी आहे”
त्यानं ,” बरं” असा मेसेज टाकला आणि तो शेजारून उठून निघून गेला .

७.३

दोघांचं लग्न होतं. त्यानं खूप खरेदी केली. तिनं त्याच्याही पेक्षा अधिक खरेदी केली. मग दोघेही अनाथालयात गेली आणि त्यांच्या  सगळ्या नातेवाईकांचं रीतसर मानपान करून मग लग्न केलं त्यांनी सगळ्यांच्या आशीर्वादाने.

७.४

माझ्या एका फौजी मित्राच्या उघडलेल्या कपड्याच्या बॅगेत एक तिरंगा नीट घडी करून ठेवलेला पाहिला. मी हसत विचारलं “इतकी देशभक्ती?” तोही हसत उत्तरला,” तसं नाही रे,   कधी लपेटायची वेळ आली तर साथीदारांना मिळायला सोपा जावा म्हणून ठेवतो बरोबर नेहमी”
आणि मला वाटायचं माझ्या व्यवसायात मी  खूपच रिस्क घेतो!

७.५

एकदा भावांच्यात वाटणी झाली. त्यांनी खूप प्रयत्न केले पण सामायिक तळ्यातल्या पाण्यावर विभाजनाची रेषच उमटेना त्यांच्याकडून.

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

अलक (अति लघु कथा) – भाग २५ (Alak – Part 25)
अलक (अति लघु कथा) – भाग ३ (Alak – Part 3)
अलक (अति लघु कथा) – भाग १५ (Alak – Part 15)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP