अलक (अति लघु कथा) – भाग १५ (Alak – Part 15)
१५.१ एकदा एका बिल्डिंगच्या मैल्याची टाकी तुंबली म्हणून सफाई कामगाराला बोलावलं. तो काम झाल्यावर स्वच्छ होऊन आला आणि त्याने पाणी मागितलं तर त्याला दुरूनच तुटक्या कपातून पाणी मिळालं आणि त्याला सांगण्यात आलं,”जाता जाता तो कप कचऱ्यातच फेकून दे रे” १५.२ एक मजूर दुपारच्या उन्हात रस्त्याच्या कडेला खडी फोडत होता आणि शेजारीच पहुडलं होतं त्याचं तान्हं
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग १४ (Alak – Part 14)
१४.१ एका मजुराच्या मुलाला रद्दीत एक जुनं मराठी म्हणी, सुभाषितांच पुस्तक मिळालं. तो ते पुस्तक घेऊन आपल्या मालकाच्या मुलाकडे गेला आणि म्हणाला “माझा बा, मला साळत न्हाई पाठवू शकत. मला ह्यो वाचून दाखिव की रे!” त्यावर मालकाचा मुलगा त्याला म्हणाला, “अरे हे मराठीत आहे , मला नाही रीड करता येत.तू डॅडबरोबर चेक कर ते लहानपणी
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग १३ (Alak – Part 13)
सैनिकहो तुमच्यासाठी १३.१ ‘सरहद जवान मदत निधी’ साठी जेव्हा कार्यकर्ते त्याच्या घरी गेले तेव्हा त्याने त्यांना विन्मुख परत पाठवलं कारण त्याचं सगळं बजेट नुकतंच त्यांच्या घराची सेक्युरिटी सिस्टिम बसवण्यात खर्च झालं होतं म्हणे!! १३.२ एका नेत्याने प्रस्ताव आणला की सैन्यात धर्माप्रमाणे तुकड्या पाडाव्या. सगळ्या सैनिकांनी ते मान्य केलं पण एकच अट ठेवली की प्रत्येकाच्या धर्मानुसार
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग १२ (Alak – Part 12)
१२.१ त्याने स्वतःच्या फायद्यासाठी खांद्यावरच्या झेंड्यांचे आणि स्वतःचेही रंग बदलले खूप वेळा. या भानगडीत तो इतका बदलला की आता लोकांचं तर सोडाच पण ओळख न पटून त्याच्या घरातलं कुत्रदेखील भुंकतं त्याच्यावर. १२.२ ज्या धर्मादाय संस्थेच्या कार्यात त्याने इतकं वाहून घेतलं होतं स्वतःला की तो गेल्यानंतर यदाकदाचित संस्थेनं त्याच्या मनाविरुद्ध पण त्याच्या सन्मानार्थ फोटो लावला भिंतीवर
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ११ ( Alak – Part 11)
११.१ त्याला अनंत व्याधी होत्या पण तरीही तो नेहेमी प्रसन्न असायचा. त्याला एकाने विचारलं,”इतक्या आजारातही कसा आनंदी राहू शकतोस तू?” तो म्हणाला,”या आजाराने मला वेदना आणि दुःख यातला फरक शिकवला आणि तेंव्हापासून मी वेदना सहन करूनही आनंदात असतो,” ११.२ एकदा एका दारुड्याचा एका धर्मप्रसारकला धक्का लागला. त्या एका कारणावरून तो धर्मप्रसारक त्या दारुड्याला खूप अद्वातद्वा
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग १० (Alak – Part 10)
१०.१ तो नेहेमी एका प्रार्थनास्थळाबाहेर लोकांच्या चपला सांभाळायचा. पण त्याला आत जाताना कधी पाहिलं नाही. त्याला विचारलं तर तो म्हणाला. प्रत्येक माणसात ‘तो’ आहे तर मी आत जाऊन अजून वेगळं असं पादुकांचं दर्शन काय घेणार ? १०.२ प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेने होत असते असं लहानपणापासून त्याचे वडील त्याला सांगत आले. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले ,”
- Published in alak






