अलक (अति लघु कथा) – भाग ३३ (Alak – Part 33)
३३.१ तो धावता धावता तोंडाला फेस येऊन पडला. त्याने वर पाहिलं तर आजूबाजूच्या सगळ्यांच्याच तोंडाला फेस आला होता. त्याने त्यातल्याच एकाला विचारलं अरे आपण का इतके धावतोय ? तो म्हणाला मला माहीत नाही पण एक लक्षात आलंय की जितका फेस तोंडाला जास्त येतो तितके जास्त पैसे जमा होतात बँकेत माझ्या.. ३३.२ तो जादूगार रस्त्यावर खेळ
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ३२ (Alak – Part 32)
३२.१ त्याच्या मित्राने त्याला खूप रकमेचं कर्ज दिलं. त्याने मित्राला विचारलं “हमीपत्र कुठल्या वकीलाकडून करून घेऊया?” मित्र म्हणाला, “कागद नको. तू फक्त शब्द दे. तुझ्या संकारांचं हमीपत्र पुरेसं आहे माझ्यासाठी” ३२.२ विषण्ण मनाने तो देवळात गेला पण मन शांत झालं नाही त्याचं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो त्याच मनस्थितीत स्मशानात गेला. तिथे जळणाऱ्या एकाकी
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ३१ (Alak – Part 31)
कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे ३१.१ खूप वर्षांनी मी परवा रद्दी टाकायला रद्दीवाल्याकडे गेलो. त्याने रद्दीचं वजन करून अर्धेच पैसे दिले. मी कारण विचारल्यावर तो निरागसपणे म्हणाला,” दादा, काय जादू झाली माहीत नाही, पण हल्ली पूर्वीपेक्षा दुप्पट माल पारड्यात घालावा तेव्हा
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ३० (Alak – Part 30)
कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे. ३०.१ आपली एकजूट कशी दाखवायची या विषयावर वाद वाढत जाऊन शेवटी ते एकमेकांच्या उरावर बसले आणि तो प्रश्न त्यांनी परस्पर सामंजस्याने सोडवला. ३०.२ एक तरुण खोलीतून बाहेर आला आणि बाबांना म्हणाला ,”बाबा बाबा !, बघा ना
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग २९ (Alak – Part 29)
२९.एक ढग नुसताच गर्जायचा बरसायचाच नाही. त्याने आषाढातल्या ढगांशी फारकत घेऊन वेगळा पक्ष काढलाय म्हणे !! २९.त्याने कुणालाच कधी मदत केली नाही, तो कधी कुणात मिसळला नाही, उलट शेजारच्यांना शिव्याच देत राहिला. एक दिवस अचानक घरात पाणी शिरलं त्याच्या आणि सगळा गाव मदतीला धावला. पण सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तो सगळ्यांना एवढंच म्हणाला की,” कामच होतं
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग २८ (Alak – Part 28)
२८.१ परवा फ्युजन म्युझिकची धून खूप आवडली म्हणून एका गाण्यावर बेभान होऊन नाचले लोक एका चित्रपटगृहात. बऱ्याच लोकांना लक्षातच आलं नाही की ते राष्ट्रगीत वाजत होतं. हे जेव्हा कळलं त्यावेळी मात्र कोणीतरी त्यांना त्यांच्या भावना दुखावल्याचं लक्षात आणून दिल आणि म्हणून त्यावेळी चित्रपटगृहच जाळून टाकलं त्यांनी. २८.२ जेव्हा खिशात पडत होते तेव्हा काहीच वाटत नव्हतं
- Published in alak






