डोंबाऱ्याचा तारेवरच्या कसरतीचा खेळ बघणं हा लहापणीचा एक रोमांचक अनुभव असायचा. अर्थात मुंबईच्या रस्त्यांवर डोंबाऱ्याने खेळापुरतं तात्पुरतं बस्तान बसवावं आणि आम्ही मुलांनी ते घोळका करून पाहावं हे जेव्हा शक्य होतं त्या काळातली गोष्ट करतोय मी. आता डोंबाऱ्याचा खेळ बघण्यासाठी आवश्यक वेळ, त्याच्या तारेवरच्या कसरतीसाठी रस्त्यावर पुरेशी जागा आणि मुंबईकराच स्वतःचच दररोजच आयुष्य तारेवरची कसरत झाल्यामुळे

मला काही वेळा कीर्तनाला तबल्याची साथ करायला जाण्याचा योग येतो. कीर्तनात तबला वाजवणाऱ्या साथीदाराला साधारण संपूर्ण कीर्तनाच्या तीस ते चाळीस टक्के इतक्याच वेळेचं काम असतं. हार्मोनियमच्या साथीदाराला मात्र त्या मानाने खूप सतर्क राहावं लागतं. कारण एक तर कीर्तनकाराला सतत षड्ज किंवा मध्यमाचा सूर देत राहावा लागतो. आणि साकी, दिंडी, आर्या, ओव्या, अभंग, श्लोक, कटाव अशा एक नाही

स्थळ हॉस्पिटलचा एक वॉर्ड. संध्याकाळची वेळ. प्रसंग असा की माझे एक नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते आणि त्यामुळे मी ​त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबतीसाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो. मी आणि ​माझे नातेवाईक असलेल्या खोलीतच एक दुसरा रुग्ण आणि त्याचा नातेवाईक हे दोघेही होते. संध्याकाळी जवळजवळ दोन तासांच्या व्हीजिटिंग आवर्स मध्ये त्या खोलीत त्या ​दुसऱ्या रुग्णासाठी जमलेल्या लोकांची

एक दिवस एका मित्राकडे जाण्याचा योग आला. चांगला प्रशस्त बंगला. घराचं इंटेरिअर डेकोरेशन खूप सुंदर केलेलं. कोपऱ्या कोपऱ्यात छान छान शोभेच्या वस्तू. उंची पडदे, घरात ५५ इंची LED TV. अतिशय छान सजवलेली मास्टर बेडरूम, दोन मुलांच्या दोन वेगळ्या खोल्या. प्रत्येक मुलाची खोली वेगळी सजवलेली. प्रत्येक खोलीत स्वतंत्र TV, प्रत्येकाला लॅपटॉप. प्रशस्त किचन, डायनिंगरूम ,गेस्टरूम, एक

काही वर्षांपूर्वी एका देवस्थानाला भेट देण्याचा योग आला. त्या देवस्थानात नेहेमीच खूप गर्दी होते भाविकांची. देवाच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं तर तासनतास रांगेत उभं रहावं लागतं. ज्यांना देवासाठी द्यायला तितका वेळ नाही त्यांच्यासाठी देवस्थानाने एक खास सोय ठेवली आहे. एका विशिष्ठ रकमेचं तिकीट काढून देवाच्या एक्सप्रेस दर्शनाची एक विशेष रांग असते त्यात तुम्हाला उभं राहून, इतर

भगवान गौतम बुद्धांची एक गोष्ट वाचनात आली. ती गोष्ट अशी. एकदा एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि म्हणाला,’भगवान मी आपल्या संदेशाच्या प्रसारासाठी गेलो असता काही लोकांनी मला खूप अपमानास्पद वागणूक दिली’ त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, ‘हो का !! पण बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही’. त्यावर तो शिष्य म्हणाला की ‘भगवान, त्यांनी मला मारलं सुद्धा’ त्यावर

१९६८ चा ऑलिम्पिक चा सोहळा. ‘उंचउडी’ म्हणजेच ‘हाय जम्प’ चा सामना. ऑलिम्पिकच्या सामन्यातली जाणवणारी चुरस, स्पर्धा याही सामन्यात शिगेला पोहोचलेली. २.२२ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेला. या उंचीवर रशियाचा खेळाडू बाद झाला. आता बार ची पातळी वाढून २. २४ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेलेला. आतापर्यंत कधीही इतकी उंची उंचउडीच्या सामन्यात पार केलेली नव्हती.

लग्नाच्या संदर्भात एक सुंदर सुभाषित आहे. कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्| बान्धवा: कुलम् इच्छन्ति मिष्टान्नम् इतरे जना: ॥ सुभाषिताचा साधारण अर्थ असा की लग्नामधे मुलगी वराच्या रुपाला वरते, मुलीची आई त्याच्या पैशाकडे, तर वडील त्याच्या गुणांकडे पहातात. नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक फक्त उत्तम जेवणावर लक्ष ठेवतात. लग्नाच्या संदर्भात

काही काही दिवस असे असतात की काहीही न करता आळसात दिवस घालवणे हाच दिवासभराचा प्लॅन असतो. साधारणतः असं सद्भाग्य क्वचित एखाद्या रविवारी किंवा एखाद्या सुटीच्या दिवशी मिळतं. त्यात घरातली सगळी मंडळी बाहेर गेलेली असली तर सोनेपे सुहागा!! एकदा एक असाच सोनियाचा दिवस उजाडला. खरं सांगायचं तर त्या दिवशी अंमळ उशिराच उजाडला. म्हणजे सूर्यदेव मध्यान्ह रेषेवरून

५१ लेख लिहून झाले की थांबायचं असं ठरवलं होतं. कुठेतरी व्यक्त व्हावं असं मनापासून वाटलं म्हणून लिहायला सुरुवात केली. या पूर्वी व्यक्त होण्यासाठी सुरांची, लयीची निवड केली होती मी. पण सुरांतून व्यक्त व्हायच्या ऐवजी आसक्त झालो त्यांच्यावर. आणि माझी गत झाली समुद्रकिनारी गेलेल्या छोट्या मुलांसारखी. शंख शिंपल्यांनी भरलेल्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या छोट्या मुलांना पाहिलं आहे