शेवट गोड करी – ७ डिसेंबर २०१९
माझ्या माहिती तंत्रज्ञानाच्या कारकिर्दीत म्हणा किंवा सांगीतिक प्रवासात म्हणा, मला खूप चांगल्या मंडळींबरोबर काम करण्याचा योग आला. त्यात खूप दिग्गज माणसं होती आणि त्यांनी सहज बोलता बोलता मला इतक्या गोष्टी शिकवल्या की त्या सहज अंगी मुरत गेल्या आणि त्याचा एकंदरीत माझ्या वैयक्तिक जीवनावर आणि व्यावसायिक कारकिर्दीवर मूलगामी परिणाम झाला. एकदा माझा एक बॉस मला सहज
- Published in marathi
वाढदिवस नावाचा जन्मसोहळा – ५ डिसेंबर २०१८
आज माझा मुलगा त्याच्या एका मित्राच्या ‘बद्देपार्टी’ हुन परत आला आणि त्या पार्टीचं रसभरीत वर्णन करू लागला. एका अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये साधारण 100 लोकांची पार्टी होती. त्या पार्टीतला मेनू त्याने सांगितला तेव्हा, तुडुंब पोट भरलेलं असूनसुद्धा पुन्हा एकदा त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, आणि मी हेही प्रामाणिकपणे मान्य करतो की तो मेनू ऐकून या वयातही माझे
- Published in marathi
कौशल्यांचे उरवडे – ०५ डिसेंबर २०१८
साधारण काही काळ लोटला की काही घरातील फ्रिजची धोक्याची पातळी उलटते. म्हणजे ‘आता मज सोसवेना भार’ या स्थितीकडे तो फ्रिज जायला सुरवात झालेली असते. एकावर एक भांडी, वाट्या, वाडगे, इत्यादींच्या एकमेकांच्या साहाय्याने शक्य असलेल्या सगळ्या तोल सांभाळण्याऱ्या रचनांचे नमुने तिथे उपस्थित असतात. जरा धक्का लागला तर ती सर्व सर्कस केव्हा खाली कोसळेल याचा नेम नसतो.
- Published in marathi
मानवाची PUC – २१ नोव्हेंबर २०१८
काही दिवसांपूर्वी एका पिकनिकला जाण्याचा योग आला. आम्ही सर्व तयारी करून निघालो आणि कारचे कागदपत्र तपासून पाहताना लक्षात आलं की गाडीच्या PUC (Polution Under Control) सर्टिफिकेटची संपण्याची तारीख तीन चार दिवसात येणार होती. म्हणून एका पेट्रोल पंपाच्या जवळ एक PUC सेंटरवर गाडी नेऊन उभी केली. तिथला कर्मचारी चांगला मुरलेला होता. त्याने विचारलं ‘चेक करू की
- Published in marathi
लागी कलेजवा कटार – १९ नोव्हेंबर २०१८
मुंबईबाहेरची एका निवांत ठिकाणची एक सुंदर आणि निवांत संध्याकाळ. लांबून कुठून तरी पं. जितेंद्र अभिषेक यांची ‘लागी कलेजवा कटार’ ही अप्रतिम ठुमरी कानावर पडते. ऐकणाऱ्याला उन्मनी करून स्वतःबरोबर अलगद घेऊन जाण्याची स्वरमोहिनी आजही माझ्यावर परिणाम करते आणि मी त्या स्वरहिंदोळ्यावर ‘झोपाळ्यावाचून झुलायला’ लागतो. त्या परिचित स्वरांबरोबरच मी माझ्याच मनोराज्यातील खूप खोलवरच्या आणि बऱ्याच वेळा अपरिचित
- Published in marathi
म्हातारपणाची प्रॅक्टिस – २६ सप्टेंबर २०१८
माझे आजोबा आणि नंतर माझे वडील यांच्याकडून मी एक कवन लहानपणापासून ऐकत आलो आहे. अदमासे शंभर वर्षे तरी ते कवन आमच्या कुटुंबात परंपरेने म्हटलं जातं आहे. ते कवन असं सावधान सावधान । वाचे बोलो राम नाम । सावधान सावधान ।। धृ।। दश वर्षे बालपण । वीस वर्षे तारुण्य । अंगी भरलासे मदन । तेथे कैसा
- Published in marathi
गणपतीबाप्पा चालते व्हा – १६ सप्टेंबर २०१८
आज खूप दिवसांनी आमच्या जवळच्या एका संस्थेमध्ये गणपतीच्या आरतीला जाण्याचा योग आला. या संस्थेमध्ये आमचे कुटुंबीय तीन पिढ्यांपासून संलग्न आहेत. माझ्या लहानपणची गणपतीची पहिली आठवणच मुळी या संस्थेची आहे. गणपतीच्या दिवसात दर रात्री टाळ आणि ढोलाच्या गजरात पंधरावीस आरत्या आपल्याला जशा समजतील तशा बोबड्या बोलाने म्हणणे आणि नंतर पोट भरेल इतका घवघवीत प्रसाद खाऊन (खरं
- Published in marathi
सांगीतिक पेनकिलर – १९ ऑगस्ट २०१८
माझा ध्वनिमुद्रण स्टुडिओ असल्यामुळे ध्वनिमुद्रण करण्यासाठी खूप मंडळी माझ्या संपर्कात येत असतात. माझं बहुतांशी सर्व काम खूप आल्हाददायी असतं. पण कधी कधी मात्र खूप गमतीदार प्रसंगही घडतात. अशीच एकदा, एका हिंदीशी साधर्म्य सांगणाऱ्या कुठल्यातरी भाषेत एक गाणं ध्वनिमुद्रित करण्याची वेळ माझ्यावर आली. ‘हिंदीशी साधर्म्य’ असं मी म्हणण्याचं कारण की त्या गाण्यातील ओळींचा कर्ता इंग्रजीत, कर्म
- Published in marathi
हॅप्पी डेथ ऍनिव्हर्सरी – २३ जुलै २०१८
मी सकाळी उठलो आणि माझं व्हाट्सअप उघडलं. नेहेमीचे ‘गुड मॉर्निंग’ चे संदेश, सकाळ प्रसन्न करू पाहणारे आणि आपण अगदीच ‘गये गुजरे’ आहोत अस उगाच अध्यारुत धरून पाठवलेले ज्ञानगुटी मिश्रित संदेश, फुलाचे इंटरनेटवर फुकट उपलब्ध असणारे म्हणून ‘दिल खोलके’ पाठवलेले फुलांचे फोटो, देवाचे फोटो व अग्रेशित भक्तीसंदेश इत्यादी बरीच नित्याची प्रभातसफाई झाली.आणि माझं लक्ष गेलं एका
- Published in marathi
मनाची रद्दी – १८ मार्च २०१८
प्रसन्न सकाळी चहाचा वाफाळता कप हाती घेऊन कोरं करकरीत वर्तमानपत्र पुढ्यात घेऊन बातम्या वाचण्यामध्ये एक वेगळाच अवर्णनीय रोमान्स असतो. पतीराज या रोमान्सच्या मूडमध्ये असताना गृहिणींच्या मनात मात्र नवऱ्याने सकाळचा पेपर हातात घेतल्या क्षणी सवतीमत्सर का जागा होतो हे मला अजून न उमगलेलं कोडं आहे. चिडचिडीचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला तर, ” मी रिकामटेकडी बसली नाहीये
- Published in marathi










