यशाच्या नशेचे विड्रॉवल सिम्टम्स – ३ मार्च २०१८
मी काही दिवसांपूर्वी एका कलाकाराची जीवनी वाचत होतो. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला स्वप्नवत वाटावं असं त्या कलाकाराला यश मिळालेलं होतं. अत्यंत देखणं रूप, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता सर्वच. एका काळी तो कलाकार इतका यशस्वी होता की प्रत्येक उदयोन्मुख कलाकाराचं त्या कलाकारासारखं यशस्वी व्हायचं हेच ध्येय असायचं. पण पुढे त्या कलाकाराला व्यसन लागलं आणि हळू हळू तो त्याच्या
- Published in marathi
नोटांची पॅथॉलॉजि – ८ फेब्रुवारी २०१८
मागच्या आठ्वड्यातलीच गोष्ट. मला काही कारणासाठी १००० रुपयांचे १० रुपयांच्या नोटांमध्ये सुट्टे हवे होते. शनिवार संध्याकाळची वेळ त्यामुळे बँका बंद होत्या. मग आमच्या जवळच्याच बाजारात ‘दे दान सुट्टे गिऱ्हाण’ करत दुकानं पालथी घालत होतो. अपेक्षेप्रमाणे सगळ्यांनीच सुट्टे देण्यासाठी नकारघंटा वाजवली. अखेरचा प्रयत्न म्हणून एका डेरीवाल्याकडे सुट्टयांची मागणी केली आणि काय विचारता, तो डेरीमालक सुट्टे द्यायला
- Published in marathi
ऐकावे जनाचे – २९ जानेवारी २०१८
मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. एक माणूस त्याचा मुलगा आणि गाढव यांची कथा होती ती. त्या गोष्टीचा गोषवारा असा की एकदा रणरणत्या उन्हात रस्त्यातून एक माणूस त्याचा बारा वर्षाचा मुलगा आणि त्यांचं गाढव जाताना लोक पाहतात. काही लोक म्हणतात “काय वेडे आहेत गाढव नुसतच चाललं आहे, कुणीतरी बसायचं तरी !”. हे ऐकल्यावर तो माणूस
- Published in marathi
समाजमाध्यमांवरील नागरिकशास्त्र – ९ जानेवारी २०१८
काही दिवसांपूर्वी मला एका whatsapp ग्रुपमध्ये समाविष्ट केलं गेलं. खरं तर मी स्वतःहून त्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी तशी इच्छा प्रदर्शित केली नव्हती. पण आपली इच्छा असो व नसो एखाद्या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार ऍडमिन या सर्वशक्तिमान मानवाला whatsapp ने दिलेला आहे. तो अधिकार वापरून मला त्या ग्रुपमध्ये ऍडमिन नेे समाविष्ट केलं. बरं केलं तर केलं त्यावर
- Published in marathi
चालतंय की, उर्फ चलतां है – २२ डिसेम्बर २०१७
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह एका उपहारगृहात खाण्यासाठी गेलो होतो. तसं चांगल्या वस्तीतलं तामझाम असलेलं उपहारगृह होतं ते. खूप भूक लागल्यामुळे लगेच मिळेल म्हणून दाक्षिणात्य पदार्थांची निवड केली आणि छानपैकी ‘घी ओनियन रवा साधा डोसा’ अशा घवघवीत नावाचा पदार्थ ऑर्डर केला. साधारण १० मिनिटांनी तो डोसा माझ्यासमोर अवतीर्ण झाला आणि अगदी खरं सांगतो माझा हिरमोड झाला.
- Published in marathi
देशांतर्गत गहूवर्णीय फॉरेनर – २० डिसेंबर २०१७
गेल्याच आठवड्यातली गोष्ट. माझ्या रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये एका शाळेच्या वार्षिकोत्सवासाठी काही मुलांच्या नाटिका ध्वनिमुद्रित करणं सुरु होतं. त्या शाळेचे, ती नाटिका बसवणारे शिक्षक आणि दहा पंधरा मुलं, अशी स्टुडिओ मध्ये आली होती. आठवी ते दहावी अशा उच्चमाध्यमिक वर्गातील सगळी मुलं होती. रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये येण्याची त्यांची पहिलीच वेळ होती म्हणून काहीशी भांबावलेली पण प्रचंड कुतूहलाने ती
- Published in marathi
मारुतीराया आणि फ्लाईंग किस – १५ डिसेम्बर २०१७
माझ्या भावाने मला नुकताच घडलेला एक गमतीशीर प्रसंग सांगितला. तो आणि त्याचा ८-९ वर्षाचा मुलगा एकदा एका मंदिरात गेले होते. दर्शन झाल्यावर थोडावेळ दोघेही तिथे बसले. येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच गर्दी होती. शनिवारचा दिवस होता म्हणून भक्तमांदियाळी मारुतीरायांकडे जरा अधिकच होती. सगळ्या भक्तमंडळींच्या नमस्काराच्या आणि पूजेच्या वेगवेगळ्या तऱ्हा तो मुलगा पाहत होता. त्याच्या डोक्यात काय सुरु
- Published in marathi
ही ऐक सत्यनारायणाची कथा – १२ डिसेंबर २०१७
मध्यंतरी एका स्नेह्यांच्या घरी श्रीसत्यनारायणाच्या पूजेला दर्शनाला जाण्याचा योग आला. उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक टुमदार फ्लॅट होता त्यांचा. श्रीसत्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि लगेच हातावर छानपैकी केशर घातलेल्या आटवलेल्या दुधाचं तीर्थ मिळालं. तीर्थामागे प्रसाद येईल याची मी वाट पाहत होतो पण काही हालचाल दिसेना म्हणून मुकाट्याने जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात एका छान चुटचुटीत प्लॅस्टिकचा बॉक्स
- Published in marathi
आधुनिक बोहारणी – ६ डिसेंबर २०१७
बोहारी नावाचा एक विशिष्ट समुदाय असतो. जुने कपडे किंवा जुनी भांडी घेऊन त्या बदल्यात नवीन वस्तू देणे असा त्यांचा व्यवसाय असतो. लहानपणी आमच्या चाळीत अशीच एक बोहारीण येत असे. तिच्या बांबूच्या विणलेल्या टोपलीत तवे, भांडी, पातेल्या, टोप, पोळपाट, लाटणी, डाव, ओगराळी, चमचे अशा नानाविध गृहपयोगी वस्तू असायच्या. एखाद दुसरा ‘लेटेस आयटम’पण असायचा. प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या
- Published in marathi
जनाचे श्लोक – ५ डिसेंबर २०१७
माझा एक जवळचा मित्र आहे. तो नावाजलेला कलाकारही आहे. आम्ही आमच्या आमच्यात वेगळे वागतो मात्र बाहेर सर्वांसमक्ष मी त्याच्याशी वेगळा वागतो. एकदा त्याने मला प्रश्न विचारला की ‘आपण दोघेच असताना तू खूप मोकळा वागतोस पण लोकांत असताना अंतर ठेऊन वागतोस असं का?’ मी त्यावेळी त्याला माझं मत व्यक्त केलं की प्रत्येक व्यक्तीचं , प्रत्येक नात्यामध्ये,
- Published in marathi










