काल ताशकंत फाईल्स हा सिनेमा पहिला. एक कलाकार म्हणून एक सिनेमा पाहतो आहे इतक्या तटस्थतेनं पहिला. कुठल्याही रंगाच्या चष्म्याशिवाय पहिला. कुणाचाही भक्त म्हणून कुठलीही टोपी डोक्यावर न ठेवता पहिला. त्या सिनेमाची समीक्षा हा या लिखाणाचा उद्देश नाही. एक राष्ट्रप्रेमी सामान्य नागरिक म्हणून जे तरंग मनात उठले ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १. एक सिनेमा म्हणून

अगदी कालचीच गोष्ट. मी आणि माझा मुलगा एक विडिओ पाहत होतो. त्यात एक कथक नर्तिका देवतेची पूजा करण्याचे भाव करून दाखवत होती. ते करता करता तिने गंध उगाळून देवाच्या भाळवर ते गंध लावण्याचे भाव व्यक्त केले. माझ्या मुलाचा मला निरागस प्रश्न. “बाबा तिने देवाला गंध लावल्याचं लक्षात आलं पण त्याअगोदर तिने जमिनीवर काहीतरी केल्याचे भाव

मी काही दिवसांपूर्वी प्रवासाला गेलो होतो. एका ठिकाणी खाण्यापिण्यासाठी थांबलो असताना माझ्या समोरच एक आई तिच्या चार पाच महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. माझ्या हातात गरम गरम चहा होता आणि मी त्या गोंडस बाळाचं निरीक्षण करत होतो.  गालावर आणि कपाळावर काळी तीट लावलेली, कानात छोटे मोत्याचे डूल, डोक्यावर मोजकेच केस, अंगात एक झबलं आणि

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक सामायिक मंत्र नेहेमी सांगितला जातो. तो म्हणजे “एक सधे तो सब साधे”. प्रत्येक क्षेत्रात असं एक कौशल्य, अशी एक चावी असते की ज्या चावीने त्या क्षेत्रातील यशाचे दरवाजे उघडायला खूप मदत होते. मी संगीत क्षेत्राचा जेव्हा विचार करतो आणि त्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ती चावी कुठली हा विचार

दोन तीन दिवसांपूर्वी मी एक अफलातून किस्सा ऐकला. कुणीतरी एकदा एकाला विचारलं,”श्रीमद्भग्वद्गीतेविषयी कधी ऐकलं आहे का ? ” त्यावर  “अहो ऐकलंय म्हणजे काय ? हे काय विचारणं झालं का? श्रीमद्भग्वद्गीता म्हणजे कोर्टात साक्ष देण्यासाठी जे पुस्तक वापरतात तेच ना?”  असं छाती फुगवून अभिमानाने उत्तर मिळालं म्हणे!! आणि कहर म्हणजे हा किस्सा निवडणुकीला नुकताच उभ्या राहिलेल्या

माझ्या वडिलांनी मला एकदा त्यांच्या वडिलांची म्हणजेच माझ्या आजोबांची एक गोष्ट सांगितली. माझे वडील लहान असताना सगळं कुटुंब आजोबांच्या एका स्नेह्यांकडे गेले होते. माझे वडील खूप लहान होते. काहीतरी कारण झालं आणि माझ्या वडिलांनी त्यांची चप्पल हरवली. इतक्या लांबून अनवाणी येणं तर शक्यच नव्हतं. म्हणून आजोबांच्या स्नेह्यांनी माझ्या वडिलांना चप्पल देववली. स्नेह्यांची आर्थिक परिस्थिती खूप

हिंदी भाषेतील एक दंतकथा ठरून गेलेले प्रतिभावान कवी गुलजार यांचे काही स्वैर शेर वाचनात आले.. वेगवेगळे शेर एकत्र करून एकसंध काव्य करण्याचा हा प्रयत्न आहे. यातील बहुतांशी कल्पना या कवी गुलजार यांच्या आहेत हे इथे नम्रपणे नमूद करतो. गुलजार साहेबांच्या कल्पनांवर आधारित ही कविता असल्याने याला गुलछडी असं नाव दिलं आहे. त्या शेरांचा एकत्रितपणे केलेला

एका मंदिरात फिरता फिरता एका भिंतीकडे माझं लक्ष गेलं . त्या भिंतीवर आतापर्यंत दिल्या गेलेल्या देणग्या आणि त्यांचे देणगीदार यांची यादी होती. रीतसर काळ्या ग्रॅनाईटवर सोन्याच्या अक्षरात ती यादी होती. अगदी अकरा लाखांपासून ते एक हजार एकशे अकरा रुपये दिलेल्या लोकांची देणगीच्या रकमेच्या उतरत्या भाजणीत व्यवस्थित केलेली ती यादी होती. मला ती यादी बघून थोडं

काही दिवसांपूर्वी एका देवस्थानी राहण्याचा योग आला. त्या देवस्थानच्या वेळापत्रकाचं निरीक्षण करताना लक्षात आलं की एकंदरीत तिथला दिनक्रम अगदी भरगच्च होता. त्या देवस्थानचा काय किंवा इतर सगळ्याच बहुतांशी देवस्थानांमध्ये मुख्य देवाच्या होणाऱ्या उपचारांचं वेळापत्रक पाहिलं की तो देव खरोखर व्ही. आय. पी. असल्यासारखं वाटतं. अर्थात त्या स्थानाचा तोच व्ही. आय. पी. असतो म्हणा. म्हणूनच पहाटे

एकदा असंच काहीतरी पहावं म्हणून मोबाईल वर सहज युट्युब सुरू केलं. तिथे कथक या नृत्यप्रकाराचे अनभिषिक्त सम्राट बिरजू महाराज यांचा एक विडिओ होता. तो विडिओ म्हणजे त्यांची एक प्रकट मुलाखत होती. त्या व्हिडिओमध्ये मी एक वाक्य ऐकलं.  ‘शांती की अपनी एक लय होती है’ हे वाक्य ऐकलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले. त्या वाक्यात खरा