अलक (अति लघु कथा) – भाग १ (Alak – Part 1)
Sunday, 20 November 2016
१.१ त्याचे हात तिच्या हातात होते आणि नजर क्षितिजाच्या अथांगतेत. ती म्हणाली एकदा तरी माझ्या डोळ्यात बघ ना ! त्याचं उत्तर, त्यासाठीच सराव करतोय.. १.२ तिचे हात त्याच्या हातात होते. दोघंही काहीच बोलत नव्हती.. संभाषण मात्र सुरु होतं. १.३ तो काही म्हणाला. तिने सगळं ऐकून घेतलं. ती काहीच म्हणाली नाही. त्यानेही सगळं ऐकून घेतलं… १.४
- Published in alak

