११.१ त्याला अनंत व्याधी होत्या पण तरीही तो नेहेमी प्रसन्न असायचा. त्याला एकाने विचारलं,”इतक्या आजारातही कसा आनंदी राहू शकतोस तू?” तो म्हणाला,”या आजाराने मला वेदना आणि दुःख यातला फरक शिकवला आणि तेंव्हापासून मी वेदना सहन करूनही आनंदात असतो,” ११.२ एकदा एका दारुड्याचा एका धर्मप्रसारकला धक्का लागला. त्या एका कारणावरून तो धर्मप्रसारक त्या दारुड्याला खूप अद्वातद्वा

१०.१ तो नेहेमी एका प्रार्थनास्थळाबाहेर लोकांच्या चपला सांभाळायचा. पण त्याला आत जाताना कधी पाहिलं नाही. त्याला विचारलं तर तो म्हणाला. प्रत्येक माणसात ‘तो’ आहे तर मी आत जाऊन अजून वेगळं असं पादुकांचं दर्शन काय घेणार ? १०.२ प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेने होत असते असं लहानपणापासून त्याचे वडील त्याला सांगत आले. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले ,”

९.१ घरेलू बायको म्हणून पार्टीज मध्ये तिला तो घेऊन जात नसे. पण त्याला अर्धांगवायू झाला तेव्हा त्याला आणि त्याच्या व्यवसायालाही घरीच बसून सांभाळलं तिने. ९.२ हौदात दिसणाऱ्या पाण्याच्या नितळतेबद्दल सगळे हौदाचं कौतुक करायचे आणि पाण्याचं गुणगान. कोणीतरी आला आणि तळ हलवून गेला काठीने. तेव्हा कळलं लोकांना हौदाने आणि पाण्याने मिळून किती चिखल दडविला होता तळाशी.

८.१ एकदा एका ठिकाणी पाहिलं की खूप संगणक त्यांच्या समोर बसलेल्या माणसांना खेळवत होते. एका संगणकाला विचारलं काय करतो आहेस ? तर तो उत्तरला. आमच्या आभासी बुद्धीचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करून माणसाची बुद्धी वाढवायचे प्रयोग चालले आहेत. ८.२ एका  संतांच्या तीर्थक्षेत्राला गेलो असता तिथल्या एका विविधवस्तू भांडारात जाण्याचा योग आला. मी सहज चौकशी केली,”सर्वात जास्त

७.१ एकदा शिष्य गुरूंना विचारतो,” गुरुजी एखाद्या माणसाच्या विचाराची खोली कशी ओळखायची?” गुरुजी म्हणतात,” तो स्वतःविषयी  किती बोलतो यावरून” “आणि उंची?” शिष्य विचारतो. गुरुजी उत्तरतात,” तो इतरांविषयी   कसं बोलतो यावरून” ७.२ काल माझ्या मित्राचा मेसेज आला,”काय करतोयस आत्ता? कंटाळा आलाय. कट्ट्यावर भेटूया?”  मी मेसेज लिहिला,”नाही जमणार खूप बिझी आहे” त्यानं ,” बरं” असा मेसेज

६.१ शेजारच्या परसातील गवताच्या गंजीला लागलेल्या आगीमुळे आपला गोठा जळला असा समज करून त्याने शेजाऱ्याचं अख्ख घर जाळलं. या गदारोळात कुणाच्याच लक्षात आलं नाही की यात ज्याचा सर्वाधिक फायदा झाला त्याला गंजी पेटवायला केवळ एक काडीचा खर्च आला. ६.२ हल्ली आमच्या घरातला देव्हारा खूप खराब झालाय हे असे लोक आम्हाला सांगतायत की ज्यांच्या घरात देव्हाराच

५.१ तो एक कर्तृत्ववान माणूस होता. खूप मोठं कार्य उभारलं त्याने.त्याच्या अनुयायांनी त्याला देव मानला. आता त्याचे अनुयायी त्याच्या पूजेशिवाय काहीच करत नाहीत. ५.२ सर्वांच्या हृदयाला हात घालायचा म्हणून तो कलाकार खूप लोकप्रिय झाला. नंतर  त्याच्या भोवती पुरस्कारांची भिंत उभी राहिली आणि तो दिसेनासा झाला. ५.३ एकदा नदीच्या शेजारून जात असताना नदीने हाक मारली आणि

४.१ कोपऱ्यावरच्या रामय्याच्या टपरीला उर्जितावस्था येते आहे हे काल जगजाहीर झालं. परवापर्यन्त आमच्या कटिंग चहाचे पैसे बहीखात्यावर टाकणाऱ्या रामय्याने काल ‘आज नगद कल उधार’ ही पाटी लावली टपरीच्या पत्र्याला, आमच्याकडे पहात. ४.२ आशा कशाला म्हणतात ते हल्लीच पटलं मला जेव्हा मी ऐकलं की रेल्वेमार्गाचा एक रूळ दुसऱ्या रुळला म्हणत होता  ,”चल! भेटू लवकरच क्षितिजावर”. ४.३

३.१ लक्ष्मी सरस्वतीला म्हणाली, “मी असेन तर तुझी कुणालाच गरज नसेल” सरस्वती उत्तरली,”मी नसेन तर तुला मुळात कुणी ओळखणार कसं?” ३.२ टेक्नॉलॉजिमुळे वृद्ध आईवडीलांशी परदेशातून खूप वेळ व्हिडिओ चॅट करून त्यांना भेटल्याचं मनाचं समाधान तो नेहेमी करून घ्यायचा . पण त्याच्या आठवणीने पाणावलेले त्याच्या आईवडिलांचे डोळे कधी पुसू शकला नाही तो मोबाईलवरून. ३.३ रस्त्यावर पुस्तक

२.१ आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ; “मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!” २.२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ? जी मोजता येत नाही ती खरी उंची.” २.३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो.