मला काही दिवसांपूर्वी कलासंदर्भातील एका व्हाट्सअप गटाचा सदस्य करण्यात आलं. त्या गटातील सर्व सदस्यांच्या अंगातील सर्व सुप्त कला बाहेर याव्या आणि इतरांनाही त्याचा आनंद मिळावा हा त्यामागचा त्या गटनियंत्याच्या मनातील प्रामाणिक मनसुबा होता. त्याने मलाही त्या गटात सामील करून घेतलं. माझं लिखाण किंवा माझ्या संवादिनीवादनाच्या वा इतरही पोस्ट तिथे मी टाकाव्या अशी त्याने मला विनंती

काल एक धारवाहिक पाहत होतो. पहात होतो म्हणजे खरं तर दूरचित्रवाणीसमोर बसल्यामुळे (दूरचित्रवाणीला सध्याच्या नागरी मराठीत टीव्ही असं म्हणतात)  आणि काही कारणाने तिथून उठून जाता येत नसल्याने ती मालिका मला ‘पहावी लागत होती’ असं म्हणणं अधिक योग्य ठरेल.  एकंदरीत धारवाहिक मालिका आणि त्यांचा कलात्मक दर्जा हा मोठ्या चर्चेचा ( किंवा वादाचा, किंवा   गरमा गरमीचा,

इंजिनीरिंग कॉलेजमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा आयुष्यात प्रथमच पालकांच्या पंखाबाहेर येऊन जगाचा खरा अनुभव मला येऊ लागला. साधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात खूप सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात राहताना बाहेरच्या जगात काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांनी काय धुमाकूळ घातलेला असतो याची अजिबात कल्पना नव्हती. सगळं जग आपल्यासारखं सरळ मार्गी असतं, कुणी कुणाला फसवत नाही

माझ्या लहानपणी म्हणजे साधारणतः चाळीस वर्षांपूर्वी आमच्या घरी कृष्णधवल दूरदर्शन संच आला.  त्यावेळी दूरदर्शनचं दर्शनच इतकं दुरापास्त होतं की टीव्हीवरचा कुठलाही कार्यक्रम पाहायला आम्हाला आवडायचा. त्या काळातील एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे बातम्या बघण्याचा माझ्या आजोबांचा शिरस्ता. त्याच त्या बातम्या माझे आजोबा मराठी , हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत पाहत असत  आणि त्याच बातम्या त्याच

गेल्या महिन्यात माझ्या व्यवसायाच्या काही कामानिमित्त अमेरिकेत गेलो होतो. तिथे गेल्यावर काम तर असतंच पण कामाव्यतिरिक्त सुहृदांच्या भेटीगाठी आणि गप्पा टप्पा यात दिवस कसे  भुर्रकन उडून जातात कळतच नाही. वेगवेगळे विषय निघतात चर्चा रंगतात गमतीदार अनुभव एकमेकांना सांगितले जातात. अशाच एका खास सुहृदांबरोबर एका संध्याकाळी एक छान चर्चा रंगली. मी ज्यांच्याशी गप्पा मारत होतो ते

नुकताच घडलेला एक प्रसंग. मी रेल्वेमधून प्रवास करत होतो. माझ्यासमोरच एक ‘ज्येष्ठ नागरिक’ या गटात मोडणारी व्यक्ती बसली होती.  (हल्ली केश-कलपाच्या काळात कुणाला ‘वृद्ध’ म्हणायला धीर होत नाही. त्यापेक्षा ‘ज्येष्ठ नागरिक’ हा अधिक मनमिळावू आणि कमी भोचक शब्द हल्ली रूढ झाला आहे तोच वापरतो) तर  त्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तीने आपल्या पाऊच मधून त्यांचं श्रवणयंत्र बाहेर

तीन चार दिवसांपूर्वी आमच्याकडे आमचे एक स्नेही आले होते. चर्चा  करता करता विषय परदेशात राहणारी पुढची पिढी आणि त्यांचे इथे एकटेच राहणारे म्हातारे आईवडील यावर आला. त्यांच्या सोसायटीतील अठ्ठावीस पैकी चोवीस फ्लॅट मध्ये पुढची पिढी परदेशात स्थायिक झाल्यामुळे त्या फ्लॅटमध्ये म्हातारं जोडपं किंवा मागे राहिलेलं दोघांपैकी कुणीतरी एक असे एकटेच राहत असल्याचं त्यांनी सांगितलं, आणि

मी नुकताच एक प्रसंग ऐकला. एकदा पंढरीची पन्नास वर्ष वारी करणाऱ्या एका वारकऱ्याला कुणी एका चॅनेलवाल्या  अँकरनं खोचकपणे विचारलं,” आजोबा, एवढे कष्ट घेऊन, वेळ, पैसे खर्च करून पंढरीला येता पण इथे येणाऱ्या गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन सुद्धा तुम्हाला नीट होत नाही. जेमतेम एका क्षणाच्या या दर्शनानं कशी काय भक्ती जडते आजोबा?” ते वारकरी आजोबा मोठे इरसाल

काल ताशकंत फाईल्स हा सिनेमा पहिला. एक कलाकार म्हणून एक सिनेमा पाहतो आहे इतक्या तटस्थतेनं पहिला. कुठल्याही रंगाच्या चष्म्याशिवाय पहिला. कुणाचाही भक्त म्हणून कुठलीही टोपी डोक्यावर न ठेवता पहिला. त्या सिनेमाची समीक्षा हा या लिखाणाचा उद्देश नाही. एक राष्ट्रप्रेमी सामान्य नागरिक म्हणून जे तरंग मनात उठले ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १. एक सिनेमा म्हणून

अगदी कालचीच गोष्ट. मी आणि माझा मुलगा एक विडिओ पाहत होतो. त्यात एक कथक नर्तिका देवतेची पूजा करण्याचे भाव करून दाखवत होती. ते करता करता तिने गंध उगाळून देवाच्या भाळवर ते गंध लावण्याचे भाव व्यक्त केले. माझ्या मुलाचा मला निरागस प्रश्न. “बाबा तिने देवाला गंध लावल्याचं लक्षात आलं पण त्याअगोदर तिने जमिनीवर काहीतरी केल्याचे भाव

मी काही दिवसांपूर्वी प्रवासाला गेलो होतो. एका ठिकाणी खाण्यापिण्यासाठी थांबलो असताना माझ्या समोरच एक आई तिच्या चार पाच महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. माझ्या हातात गरम गरम चहा होता आणि मी त्या गोंडस बाळाचं निरीक्षण करत होतो.  गालावर आणि कपाळावर काळी तीट लावलेली, कानात छोटे मोत्याचे डूल, डोक्यावर मोजकेच केस, अंगात एक झबलं आणि

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक सामायिक मंत्र नेहेमी सांगितला जातो. तो म्हणजे “एक सधे तो सब साधे”. प्रत्येक क्षेत्रात असं एक कौशल्य, अशी एक चावी असते की ज्या चावीने त्या क्षेत्रातील यशाचे दरवाजे उघडायला खूप मदत होते. मी संगीत क्षेत्राचा जेव्हा विचार करतो आणि त्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ती चावी कुठली हा विचार

TOP