अलक (अति लघु कथा) – भाग ४४ (Alak – Part 44)
४४.१ पोत्यात माती भरता भरता तो आपल्या बायकोला म्हणाला, “मी सावकाराच्या घरी जातोय खतासाठी पैसे मागायला, आलो परत तर या मातीत खत घालून आणि नाही आलो तर यात माझ्या देहाची राख घालून पसरायची ही माती आपल्या शेतात.”… ४४.२ अर्ध्या चड्डीत फिरतो म्हणून अक्ख गाव त्याला हसायचं. पण जेव्हा धरण फुटलं आणि त्याखाली गाव बुडालं तेव्हा
- Published in alak
आपल्याच कर्मानं मरताय – ३० जुलै २०१९
साहित्याचा नोबेल पुरस्कार ज्याला मिळाला असा स्पेन या देशातील कवी पाब्लो नेरुडा याची एक कविता आज वाचनात आली. वाचता वाचता त्याचा भावानुवाद स्फुरत गेला तो मराठी काव्यानुवाद सुहृदांबरोबर वाटण्याचा हा प्रयन. मूळ कविता , *You start dying slowly…* if you do not travel, if you do not read, If you do not listen
- Published in bhavanuvad
बर्म्युडा चड्डीतले पुंडलिक – २७ जुलै २०१९
तीन चार दिवसांपूर्वी आमच्याकडे आमचे एक स्नेही आले होते. चर्चा करता करता विषय परदेशात राहणारी पुढची पिढी आणि त्यांचे इथे एकटेच राहणारे म्हातारे आईवडील यावर आला. त्यांच्या सोसायटीतील अठ्ठावीस पैकी चोवीस फ्लॅट मध्ये पुढची पिढी परदेशात स्थायिक झाल्यामुळे त्या फ्लॅटमध्ये म्हातारं जोडपं किंवा मागे राहिलेलं दोघांपैकी कुणीतरी एक असे एकटेच राहत असल्याचं त्यांनी सांगितलं, आणि
- Published in marathi
अलक (अति लघु कथा) – भाग ४३ (Alak – Part 43)
अलक ४३.१ गुरुजींनी श्रीमदभगवद्गीतेतील संकल्पना समजावण्यासाठी एका हातात पटवलेली उदबत्ती आणि दुसऱ्या हातात पटवलेली सिगरेट पकडली आणि शिष्यांना म्हणाले,” धूर दोन्हीतून येतोय पण त्यातला फरक समजून घ्या. एक सत्वगुणी आहे आणि एक तमोगुणी. पण तुम्हाला मात्र व्हायचं आहे ते उदबत्ती आणि सिगरेट दोघांनाही एकामागोमाग एक पेटवून आपलं काम करून विझून जाणारी काडी. खरी कर्मयोगी स्थितप्रज्ञ”…
- Published in alak
अलक (अति लघु कथा) – भाग ४२ (Alak – Part 42)
४२.१ कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा तेव्हा गाई आजूबाजूला ऐकायला गोळा व्हायच्या, असं आजी सांगायची, तेव्हा लहानपणी कृष्णाचं खूप कौतुक वाटायचं. आता मोठा झाल्यावर त्या गाईंविषयी आदर अधिक वाढलाय. चांगलं काय वाईट काय हे ही कळावं लागतं. ४२.२ परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला भारतात एकट्याच राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी फोनवरच विचारलं. “तू काही आता परत येत नाहीस
- Published in alak
रबराचा हात आणि विठुराया- २० एप्रिल २०१९
मी नुकताच एक प्रसंग ऐकला. एकदा पंढरीची पन्नास वर्ष वारी करणाऱ्या एका वारकऱ्याला कुणी एका चॅनेलवाल्या अँकरनं खोचकपणे विचारलं,” आजोबा, एवढे कष्ट घेऊन, वेळ, पैसे खर्च करून पंढरीला येता पण इथे येणाऱ्या गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन सुद्धा तुम्हाला नीट होत नाही. जेमतेम एका क्षणाच्या या दर्शनानं कशी काय भक्ती जडते आजोबा?” ते वारकरी आजोबा मोठे इरसाल
- Published in marathi
मी आणि माझा राष्ट्रवाद – १८ एप्रिल २०१९
काल ताशकंत फाईल्स हा सिनेमा पहिला. एक कलाकार म्हणून एक सिनेमा पाहतो आहे इतक्या तटस्थतेनं पहिला. कुठल्याही रंगाच्या चष्म्याशिवाय पहिला. कुणाचाही भक्त म्हणून कुठलीही टोपी डोक्यावर न ठेवता पहिला. त्या सिनेमाची समीक्षा हा या लिखाणाचा उद्देश नाही. एक राष्ट्रप्रेमी सामान्य नागरिक म्हणून जे तरंग मनात उठले ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १. एक सिनेमा म्हणून
- Published in marathi
रेडिमिक्स जीवन – १ एप्रिल २०१९
अगदी कालचीच गोष्ट. मी आणि माझा मुलगा एक विडिओ पाहत होतो. त्यात एक कथक नर्तिका देवतेची पूजा करण्याचे भाव करून दाखवत होती. ते करता करता तिने गंध उगाळून देवाच्या भाळवर ते गंध लावण्याचे भाव व्यक्त केले. माझ्या मुलाचा मला निरागस प्रश्न. “बाबा तिने देवाला गंध लावल्याचं लक्षात आलं पण त्याअगोदर तिने जमिनीवर काहीतरी केल्याचे भाव
- Published in marathi
बाळाची वर्चुअल रिऍलिटी – २६ मार्च २०१९
मी काही दिवसांपूर्वी प्रवासाला गेलो होतो. एका ठिकाणी खाण्यापिण्यासाठी थांबलो असताना माझ्या समोरच एक आई तिच्या चार पाच महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. माझ्या हातात गरम गरम चहा होता आणि मी त्या गोंडस बाळाचं निरीक्षण करत होतो. गालावर आणि कपाळावर काळी तीट लावलेली, कानात छोटे मोत्याचे डूल, डोक्यावर मोजकेच केस, अंगात एक झबलं आणि
- Published in marathi
प्रथम लयस्वर साधे – २५ मार्च २०१९
कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक सामायिक मंत्र नेहेमी सांगितला जातो. तो म्हणजे “एक सधे तो सब साधे”. प्रत्येक क्षेत्रात असं एक कौशल्य, अशी एक चावी असते की ज्या चावीने त्या क्षेत्रातील यशाचे दरवाजे उघडायला खूप मदत होते. मी संगीत क्षेत्राचा जेव्हा विचार करतो आणि त्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ती चावी कुठली हा विचार
- Published in marathi










