आज खूप दिवसांनी आमच्या जवळच्या एका संस्थेमध्ये गणपतीच्या आरतीला जाण्याचा योग आला. या संस्थेमध्ये आमचे कुटुंबीय तीन पिढ्यांपासून संलग्न आहेत. माझ्या लहानपणची गणपतीची पहिली आठवणच  मुळी या संस्थेची आहे. गणपतीच्या दिवसात दर रात्री टाळ आणि ढोलाच्या गजरात पंधरावीस आरत्या आपल्याला जशा समजतील तशा बोबड्या बोलाने म्हणणे आणि नंतर पोट भरेल इतका घवघवीत प्रसाद खाऊन (खरं

Otto Rene Castillo, या ग्वाटेमाला या देशातील एका कवीने लिहिलेली एक कविता मला माझ्या एका स्नेह्यांनी पाठवली आणि त्याचा भावानुवाद करण्यास सुचवलं. सध्याच्या समाजस्थितीचं यथार्थ वर्णन करणारी ही कविता वाचता वाचताच त्यावरील भावानुवाद सुचत गेला. तो आपल्या समोर मांडतो आहे. *इंग्रजीतील मूळ कविता* One day the apolitical intellectuals of my country will be interrogated by

४१.१   मंदिराच्या आत मी मूर्तीसमोर उभा होतो आणि मंदिराबाहेर दाराजवळ तो भिकारी. काय  फरक होता आमच्यात? नाही सांगू शकलो मी… ४१.२ मंदिरात सेल्फी घेणाऱ्या एकाला एका लहान मुलाने देवाचा फोटो विकत घ्यायची विनंती केली. “देवाच्या फोटोत देव नसतो” असं त्या मुलाला सांगून त्या सेल्फीवाल्याने फटकारलं. मी माणसातला विरोधाभास पाहून नुसता स्वतःशीच हसलो. ४१.३ माणसाची ज्याच्याशी

माझा ध्वनिमुद्रण स्टुडिओ असल्यामुळे ध्वनिमुद्रण करण्यासाठी खूप मंडळी माझ्या संपर्कात येत असतात. माझं बहुतांशी सर्व काम खूप आल्हाददायी असतं. पण कधी कधी मात्र खूप गमतीदार प्रसंगही  घडतात. अशीच एकदा, एका हिंदीशी साधर्म्य सांगणाऱ्या कुठल्यातरी भाषेत एक गाणं ध्वनिमुद्रित करण्याची वेळ  माझ्यावर आली. ‘हिंदीशी साधर्म्य’ असं मी म्हणण्याचं कारण की त्या गाण्यातील ओळींचा कर्ता इंग्रजीत, कर्म

४०.१ सफाई कामगाराने कंटाळून शेवटी तळ मजल्यावर बिल्डिंगच्या लिफ्टच्या बाहेर असलेली ‘इथे थुंकू नका’ ही पानाच्या पिंकांनी रंगलेली पाटी काढली आणि त्या जागी  देवाचं छानसं चित्र असलेली टाईल लावली. आता लोक टाईलचा तेवढा भाग सोडून आजूबाजूला थुंकतात…  ४०.२ देशाची सराहद्द राखणारा एक जवान सुट्टीवर घरी आला. आल्यावर कळलं की त्याच्या सख्ख्या भावाने शेतीत वाटा मागितला

मी सकाळी उठलो आणि माझं व्हाट्सअप उघडलं.  नेहेमीचे ‘गुड मॉर्निंग’ चे संदेश, सकाळ प्रसन्न करू पाहणारे आणि आपण अगदीच ‘गये गुजरे’ आहोत अस उगाच अध्यारुत धरून पाठवलेले ज्ञानगुटी मिश्रित संदेश, फुलाचे इंटरनेटवर फुकट उपलब्ध असणारे म्हणून ‘दिल खोलके’ पाठवलेले फुलांचे फोटो, देवाचे फोटो व अग्रेशित भक्तीसंदेश इत्यादी बरीच नित्याची प्रभातसफाई झाली.आणि माझं लक्ष गेलं एका

३९.१ एकुलता एक म्हणून त्यांच्या मुलाला त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. पण त्यामुळे आपण कुठे कमी पडलो तर काय करायचं, ही गोष्ट तो मुलगा कधीच शिकू शकला नाही. ३९.२ गर्भश्रीमंत घरातल्या मुलांच्या अर्ध्या होऊन टाकून दिलेल्या पेन्सिली कचरा साफ करणारी मोलकरीण आपल्या मुलांसाठी घरी घेऊन जायची. त्या अशिक्षित मोलकरणीला माहीत होतं हीच अर्धी

३८. १ तो रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल वर थांबला होता . त्याच्या लक्षात आलं एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लाला रस्ता ओलांडता येत नाहीये. त्यांनी त्या पिल्लाला उचललं आणि दोघांनी रस्ता ओलांडला. त्याने त्या पिल्लाला सोडून दिलं आणि आपली आंधळ्यांची काठी उलगडून तो मार्गस्थ झाला. या व्यग्र शहरात कुणी कुणाचा नसतो हे सत्य त्या कुत्र्याच्या पिल्लाला अजून उमगलं

३७.१ त्याचं वय झालं होतं. ज्यांनी मानसन्मान दिले त्यांना तो विसरला पण ज्यांनी अपमान केले त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजारसुद्धा विस्मृतीत ढकलू शकला नाही.. ३७.२ स्वातंत्र्यसैनिक म्हणून अनेक वेळा कारागृहाच्या फेऱ्या त्याने पचवल्या. पण राहत्या घरात म्हातारपण नावाचं कारागृह मात्र त्याला असह्य झालं होतं… ३७.३ खूपशा आवडी निवडी त्याने म्हातारपणी करू म्हणून राखून ठेवल्या. त्याच्या लक्षात आलं

कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे.  ३६.१ ‘क्ष’ व्यक्तीच्या आशीर्वादाने, ‘य’ व्यक्तीच्या आदेशानुसार, ‘ज्ञ’ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, ‘फ’ व्यक्तीच्या प्रेरणेने, ‘स’ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार, ‘छ’ व्यक्तीच्या सहकार्याने, ‘ढ’ व्यक्तीची आमच्या बिल्डिंगच्या क्रिकेट टीममध्ये बारावा खेळाडू म्हणून निवड झाली म्हणून त्याच्या शुभेच्छूक मित्रपरिवाराने सर्व टीम