मी सातवीत असताना आम्हाला शाळेत बीजगणित हा विषय शिकण्यासाठी होता. बीजगणिताची एक गोष्ट मला त्या बालवयात गंमतशीर वाटायची. उदाहरण काहीही असो पण ‘जी गोष्ट माहीत नाही पण जी शोधून काढायची आहे त्याला ‘एक्स’  म्हणू’ असं प्रत्येक उदाहरणात असायचं. ए पासून झेड पर्यंतच्या वर्णाक्षरात शेवटून तिसरं वर्णाक्षर बीजगणितात वापरण्यासाठी प्राधान्य देऊन का निवडलं असावं या मागचं

आमच्या घराच्या स्वयंपाकघराला एक मोठी खिडकी आहे. त्या खिडकीच्या लगतच ओटा आहे. त्यामुळे खिडकीकडे तोंड करूनच सगळा स्वयंपाक होतो. त्या ओट्याच्या खिडकीबाहेर खूप झाडं आहेत आणि म्हणून तिथे सर्व प्रकारचे पक्षी येत असतात. ही घटना कधी सुरू झाली कुणास ठाऊक पण स्वयंपाक करण्यासाठी ओट्याजवळ कुणी उभं राहिलं रे राहिलं की एक कावळा कुठूनतरी येऊन त्या

काव्यानुवाद मूळ इंग्रजी काव्य : Mario de Andrade (San Paolo 1893-1945) Poet, novelist, essayist and musicologist. भावानुवाद: राजेंद्र वैशंपायन मूळ कविता —————- I counted my years & realized that I have Less time to live by, Than I have lived so far. I feel like a child who won a pack of candies: at first

मागच्या आठवड्यातली घटना. माझ्या एका संगीतातील विद्यार्थ्यांबरोबर चर्चा सुरू होती. मी जे शिकवलं होतं त्याचा खूप रियाझ करायला मी त्या विद्यार्थ्याला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडा संभ्रम, थोडी चिंता, थोडी तक्रार अशा अनेक भावनांच्या छटा होत्या. मनात काहीतरी शंका होती हे जाणवत होतं पण विचारावं की नाही या द्विधा मनस्थितीत तो दिसला. मग मीच विचारलं, “काय

माझ्या माहिती तंत्रज्ञानाच्या कारकिर्दीत म्हणा किंवा सांगीतिक प्रवासात म्हणा, मला खूप चांगल्या मंडळींबरोबर काम करण्याचा योग आला. त्यात खूप दिग्गज माणसं होती आणि त्यांनी सहज बोलता बोलता मला इतक्या गोष्टी शिकवल्या की त्या सहज अंगी मुरत गेल्या आणि त्याचा एकंदरीत माझ्या वैयक्तिक जीवनावर आणि व्यावसायिक कारकिर्दीवर मूलगामी परिणाम झाला. एकदा माझा एक बॉस मला सहज

आज माझा मुलगा त्याच्या एका मित्राच्या ‘बद्देपार्टी’ हुन परत आला आणि त्या पार्टीचं  रसभरीत वर्णन करू लागला. एका अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये साधारण 100 लोकांची पार्टी होती. त्या पार्टीतला मेनू त्याने सांगितला तेव्हा, तुडुंब पोट भरलेलं असूनसुद्धा पुन्हा एकदा त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, आणि मी हेही प्रामाणिकपणे मान्य करतो की तो मेनू ऐकून या वयातही माझे

साधारण काही काळ लोटला की काही घरातील फ्रिजची धोक्याची पातळी उलटते. म्हणजे ‘आता मज सोसवेना भार’ या स्थितीकडे तो फ्रिज जायला सुरवात झालेली असते. एकावर एक भांडी, वाट्या, वाडगे, इत्यादींच्या एकमेकांच्या साहाय्याने शक्य असलेल्या सगळ्या तोल सांभाळण्याऱ्या रचनांचे नमुने तिथे उपस्थित असतात. जरा धक्का लागला तर ती सर्व सर्कस केव्हा खाली कोसळेल याचा नेम नसतो.

काही दिवसांपूर्वी एका पिकनिकला जाण्याचा योग आला. आम्ही सर्व तयारी करून निघालो आणि कारचे  कागदपत्र तपासून पाहताना लक्षात आलं की गाडीच्या PUC (Polution Under Control) सर्टिफिकेटची संपण्याची तारीख तीन चार दिवसात येणार होती. म्हणून एका पेट्रोल पंपाच्या जवळ एक PUC सेंटरवर गाडी नेऊन उभी केली. तिथला कर्मचारी चांगला मुरलेला होता. त्याने विचारलं ‘चेक करू की

मुंबईबाहेरची एका निवांत ठिकाणची एक सुंदर आणि निवांत संध्याकाळ. लांबून कुठून तरी पं. जितेंद्र अभिषेक यांची ‘लागी कलेजवा कटार’ ही अप्रतिम ठुमरी कानावर पडते.  ऐकणाऱ्याला उन्मनी करून स्वतःबरोबर अलगद घेऊन जाण्याची स्वरमोहिनी आजही माझ्यावर परिणाम करते आणि मी त्या स्वरहिंदोळ्यावर ‘झोपाळ्यावाचून झुलायला’ लागतो. त्या परिचित स्वरांबरोबरच मी माझ्याच मनोराज्यातील खूप खोलवरच्या आणि बऱ्याच वेळा अपरिचित

माझे आजोबा आणि नंतर माझे वडील यांच्याकडून मी एक कवन लहानपणापासून ऐकत आलो आहे. अदमासे शंभर वर्षे तरी ते कवन आमच्या कुटुंबात परंपरेने म्हटलं जातं आहे. ते कवन असं सावधान सावधान । वाचे बोलो राम नाम । सावधान सावधान ।। धृ।। दश वर्षे बालपण । वीस वर्षे तारुण्य । अंगी भरलासे मदन । तेथे कैसा