Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय ७ : ज्ञान विज्ञान योग (Dnyan Vidnyan Yog)

काव्यगीता अध्याय ७ : ज्ञान विज्ञान योग (Dnyan Vidnyan Yog)

by Rajendra Vaishampayan / Sunday, 28 November 1999 / Published in kavyageeta

अध्याय ७ ज्ञान विज्ञान योग 

 

अनित्यात भरले नित्य त्यास नाव ज्ञान ।

नित्य जन्म देत अनित्य आकळे विज्ञान ।

असा खेळ खेळत राही सृष्टीचा पसारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा ।।१।।

 

धरा आप अग्नी वायू व्योम महाभूते ।

अहंकार बुद्धी चित्ते वृत्ती पूर्ण होते ।

परी नचही वृत्ती अपरा जीव मूळ धारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।२।।

 

पर श्रेष्ठ वृत्ती माझी समुळ जीवरूपी ।

परा आणि अपरेमधुनी सृजन स्वस्वरूपी ।

मीच आदी या जगताचा अंती मी निवारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।३।।

 

मीच भरुनि राही सारा नित्य या जगात ।

काही नुरे जाणायाचे मीच सर्व ज्ञात ।

सर्व मणी  माळायाला एक मीच दोरा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।४।।

 

रवी चंद्र तेज प्रभा मी सुरस जलरुची मी ।

प्रणव मीच वेदांमधला मीच शब्द व्योमी ।

पुष्पगंध मीच धरेचा तप्त मी निखारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।५।।

 

तेज अग्नितत्वामधले तपहि तपस्व्यांचे ।

सर्वभूत जीवनशक्ती शुद्ध बीज साचे ।

बुद्धी मी बुद्धिमंतांची सृजनीचा फुलोरा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।६।।

 

काम क्रोध रहित असे जे बलची बलिष्ठांचे ।

धर्ममान्य ऐसे माझे रूप काम्यतेचे ।

सत्व रजस तम त्रिगुणांचा मीच रे उतारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा ।। ७।।

 

करी अंध या विश्वासी जगा मोही माया ।

अव्ययी इशासी विसरे नाशिवंत काया ।

दु:खपुर्ण भवउदाधीचा मीच रे किनारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।। ८।।

 

जाणण्या इशाला येती भक्त शरण चार ।

आर्त ज्ञानी जिज्ञासू वा अर्थलोभी फार ।

प्रियच असे मजसी परी हा भक्ती साधणारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।। ९।।

 

भक्त चार इच्छा धरिती भजति मम रुपाला ।

उदारही असती जरी ते योग्य साधनेला ।

ज्ञानी एक प्रिय हा मजसी योग साधणारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।१०।।

 

ज्यास काम्य जैसे तैसा भजे देवतेला ।

स्थीर करुनी भक्ती नेई योग्य मी स्थितीला ।

काम फळे त्यांची त्यांना मीच वाटणारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।११।।

 

परी ज्ञान साधे कोणी भक्ती माझी कोणी ।

सर्वथैव पाहे मुक्ती माझिया ठिकाणी ।

मोक्षमार्ग मुक्ती त्याची मीच साधणारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।१२।।

 

भूत वर्तमानी मीही असे भविष्यात ।

मीच जाणतो सर्वांना परी मी न ज्ञात ।

सोडी मोह जो इच्छांचा तोच जाणणारा ।

हाच ज्ञानविज्ञानाचा योग असे सारा।।१३।।

 

बह्म कर्म अध्यात्माचे मीच असे रूप ।

जन्ममरण जर्जरकाया सोड त्रिविध ताप ।

जन्म मीच देतो अंता मीच अर्पिणारा ।

हाच ज्ञान विज्ञानाचा योग असे सारा ।।१४।।

 

राजेंद्र (?) २८ नोव्हेंबर १९९९

  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय ६ – ध्यानयोगांतर्गत मनःसंयम (Kavyageeta Adhyay Dhanyogantargat Manahsanyam)
काव्यगीता अध्याय १२ – भक्तीयोग (Bhakti Yog) 
काव्यगीता अध्याय १४ – गुणत्रयविभाग  योग  (Guantraya Vibhag Yog) 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP