Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय २ : सांख्य योग (Sakhkya Yog)

काव्यगीता अध्याय २ : सांख्य योग (Sakhkya Yog)

by Rajendra Vaishampayan / Tuesday, 06 April 1999 / Published in kavyageeta
अध्याय २ : सांख्य योग 
 
हा असतो आत्मा अविनाशी सर्वांचा ।
रे नकोस पार्थ मोह धरू देहाचा ।।ध्रु॥ 
 
का सुचला तुजला विचार भलत्या वेळी ।
अस्थानी मोह हा असतो संगरकाळी ।
तू त्याग मोह हा तुझा तुझ्या आप्तांचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।१।।
 
नामर्द म्हणोनी हसतिल तुजला वीर ।
संग्रामी सुटता तुझा असा हा धीर ।
तू नको करू अपमान क्षात्रधर्माचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।२।।
 
तो काळच झाला नाही नसे तू ज्यात ।
भूतात भविष्यामध्ये वर्तमानात ।
हा युगायुगांचा खेळ जन्म मरणाचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।३।।
 
जन्मासी येतो जीव शैशवी रमतो ।
तारुण्य भोगुनी वृद्धत्वी निज जातो ।
या आलेखाचा अंत्यबिंदू मरणाचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।४।।
 
शीत उष्ण ही जाणिव सुख दु:खांची ।
भोगतो फळे हा देह तुझ्या कर्मांची ।
नको बनू तू दास तुझ्या कायेचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।५।।
 
अविचल बुद्धी असे सौख्य दु:खात ।
स्थीर असे जरी झाले वज्राघात ।
तोच होई सद्भागी या मोक्षाचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।६।।
 
दृश्यमान ते स्थीर कदापि नसते ।
पण अदृश्याची सत्ता स्थिरचर असते ।
हा अंत कुणी का करितो अदृश्याचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।७।।
 
सत्य नित्य हा असे मुक्त निर्गूण ।
हा अविचल शाश्वत अमर्याद संपूर्ण ।
दृष्टांत असा हा जाण असे आत्म्याचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।८।।
 
टाकिसी जसे तू वस्त्र जुने झालेले ।
आत्माही त्यजतो शरिर जीर्ण शिणलेले ।
त्याहुनी अर्थ या नसे अधिक शरिराचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।९।।
 
न करू शके आत्म्यास दग्ध तो अग्नी ।
ना विरतो नच तो वाळतसे वाऱ्यानी ।
न भग्न प्रहारही करी त्यास शस्त्रांचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।१०।।
 
जन्म मृत्यु ही असती जुळी अपत्ये ।
ती भिन्न असोनी अतूट त्यांचे नाते ।
परि त्यांच्यावरती नसतो बंध कुणाचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।११।।
 
आश्चर्यमुग्ध आत्म्यास वर्णिती ज्ञानी ।
आश्चर्यमुग्ध ते नेत्रदीप्त विज्ञानी ।
हा आश्चर्याचा विषय असे सर्वांचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।१२।।
 
हे कळले तुजला स्वस्वरूप आत्म्याचे ।
चल उठ सिद्ध हो पूजन कर शस्त्रांचे ।
उसळून उठू दे लोळ क्षात्रतेजाचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।१३।।
 
सुखदु:खे ही समान जाणुनि आता ।
विजय पराजय सोडुन त्यांची चिंता ।
हे युद्ध करोनी क्रमी मार्ग स्वर्गाचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।१४।।
 
राजेंद्र (?) ०६ एप्रिल १९९९
  • Tweet
Tagged under: Adhyay 2, Bhagwad Geeta, Bhagwadgeeta, Kavya Geeta, काव्यगीता, भगवद्गीता

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय १७ – श्रद्धात्रय विभाग योग  (ShraddhaTraya Vibhag Yog)
काव्यगीता अध्याय १३ – क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग योग  (Kshetra Kshetradnya Vibhag Yog)
काव्यगीता अध्याय ५ : कर्म संन्यास योग (Karma Sanyaas Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP