Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय ११ – विश्वरूपदर्शन योग (Vishwaroop Darshan Yog)

काव्यगीता अध्याय ११ – विश्वरूपदर्शन योग (Vishwaroop Darshan Yog)

by Rajendra Vaishampayan / Monday, 10 January 2000 / Published in kavyageeta
अध्याय ११ : विश्वरूप दर्शन योग 
 
ऐकुनी अतिगुह्य ज्ञान धन्य जाहला ।
मिटले अज्ञान सर्व मोह निवळला ।
प्राप्त होय दिव्य दृष्टी नेत्रदीप्त तो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो ।।१।।
 
उत्पत्ती विलय स्थिती सार्थ जाणुनी ।
कृष्णाचे अविनाशी रूप समजुनी ।
बघण्या ऐश्वर्य ते मनात इच्छितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२।।
 
उमजतात विभूती परी लोभ हा मनी ।
ज्ञान शक्ती वीर्य तेजयुक्त शतगुणी ।
ईश्वरीय रूप पाहण्यास प्रार्थितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।३।।
 
उमजे कृष्णास भक्त शुद्ध हा उरी ।
पार्थाचा भाव शुद्ध भक्ती अंतरी ।
शेकडो सहस्ररूपे कृष्ण दावितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।४।।
 
आदितीचे पुत्र वासू रुद्र मारुत ।
दोन अश्विनीकुमार देव अद्भुत ।
जे कुणास ना दिसले ते न्याहाळितो।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।५।।
 
त्या रुपात दिसले त्यासी चराचर ।
सर्व विश्व व्यापे अव्यक्त ईश्वर ।
दिव्यदृष्टी दान गुडाकेश धारितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।६।।
 
राजासी कथन करी दृश्य संजय ।
परमदिव्य रूपा पाही धनंजय ।
संजय सद्भागी ते रूप वर्णितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।७।।
 
दिसती बहुसंख्य मुखे नेत्र दर्शने ।
शस्त्रे अतिदिव्य दिव्य वस्त्रभूषणे ।
गंधलेप माळांनी देह शोभतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।८।।
 
तेजस्वी रूप सर्वव्याप्त दिव्य ते ।
अद्भुत आश्चर्ययुक्त तेज फाकते ।
तेजलोळ की सहस्रसूर्य भासतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो ।।९।।
 
चकित भ्रमित रोमांचित पार्थ राहतो ।
नतमस्तक होउनि भगवंत प्रार्थितो ।
अनुभवास येई व्यक्त ते करीत तो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१०।।
 
अगणित ते जीव सर्प देवता मुनी ।
रुद्रदेव अन ब्रह्मा कमल आसनी ।
बहुत अवयवांनी सजे दिव्य देह तो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।११।।
 
शंख चक्र मुकुट गदायुक्त रूप हे ।
सूर्याचे तेज जसे अग्निकाष्ठ हे ।
आदी अंत मध्य मुक्त परी दृय्ष्य तो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१२।।
 
सर्व दिशा ग्रहमंडळ व्योम व्यापले ।
उग्र तरी अतिअद्भुत तेज पसरले ।
अच्युत विश्रामधाम आद्य सत्य तो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१३।।
 
सर्व देव शरण तदरुपी प्रवेशती ।
सिद्ध महर्षी ऋचांत मांडिती स्तुती ।
वेदघोष शांतीचा तेथ उमटतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१४।।
 
दीप्तवर्ण उग्र मुखे व्योम स्पर्शिती ।
दीप्त ते विशाल नेत्र उग्र भासती ।
भयकंपित व्यथित पार्थ धैर्य सांडितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१५।।
 
पार्थ पाही प्रज्वलीत मुखे मृत्युची ।
दंतपंक्ती ती कराल घेत आहुती ।
संभ्रमीत चित्तयुक्त पार्थ राहतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१६।।
 
भीष्म कर्ण द्रोण तथा सर्व कौरव ।
स्वजन स्वपक्षीय तसे काही बांधव ।
दिव्यमुखी मुंडमाळचूर्ण पाहतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१७।।
 
जलप्रवाह अंती उदाधित मिसळिती।
की पतंग जळण्या अनली प्रवेशिती ।
शिरती योद्धे मुखी कराल पाहतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।१८।।
 
ग्रासुनि जगतास सर्वनाश घडवितो ।
उग्र प्रखर तेजाने विश्व व्यापितो ।
उग्ररूप पार्थ पार्थ जाणण्यास प्रार्थितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।। १९।।
 
वदती भगवंत जान कालरूप मी ।
पांडवास सोडुन अन्यास मृत्यु मी ।
संहारी मीच मीच युद्ध घडवितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो ।।२०।।
 
युद्ध अटळ यास्तव तू झुंज संगरी ।
भोग विजय सत्ता आयुष्य भूवरी ।
युद्ध करी विसर व्यथा कृष्ण सांगतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो ।।२१।।
 
द्रोण भीष्म कर्ण शूर संगरातले ।
मृत्युलेख त्यांचे पूर्वीच आखले ।
पार्थ हा निमित्त अंत कृष्ण आखतो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२२।।
 
स्तुती मुखे गात मनी नम्र भावना ।
पंचतत्व ईशा प्रणिपात प्रार्थना ।
प्रपिता म्हणुनी तयास पार्थ वंदितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२३।।
 
मानुनी कृष्णास सखा चिडविले तया ।
घडला अपमान कधी खेदिले तया ।
अपराधी होई मनी क्षमा याचितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२४।।
 
माता पुत्रास क्षमा करी ज्या परी ।
सखा राग सखयाचा धरी न उरी ।
क्षमापूर्ण दृष्टि तशी पार्थ प्रार्थितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२५।।
 
विश्वरूप पाहुनि आनंद दाटला ।
पार्थ म्हणे भयकंपित जीव राहिला ।
चतुर्भूज सार्थ रूप पाहू इच्छितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२६।।
 
अंती भगवान रूप घेई सावळे ।
आवरती विश्वरूप दिव्य आगळे ।
म्हणती दुष्प्राप्य योगाची यथार्थ तो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२७।।
 
म्हणती हे रूप पाहण्यास सुरमुनी ।
यज्ञ दान करती तप उग्र ते कुणी ।
ना मिळतो क्षणिकही कृतार्थ भाव तो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२८।।
 
भक्ती हे साधन अप्राप्य पावते ।
भक्तीचेनी योगे चिद्तत्व साधते ।
भक्त भक्ती कृष्णपदी स्वये अर्पितो ।
परमदिव्य विश्वरूप पार्थ पाहतो।।२९।।
 
राजेंद्र (?) 
१० जानेवारी २०००
  • Tweet

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय ३ : कर्म योग (Karma Yog)
काव्यगीता अध्याय १४ – गुणत्रयविभाग  योग  (Guantraya Vibhag Yog) 
काव्यगीता अध्याय ७ : ज्ञान विज्ञान योग (Dnyan Vidnyan Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP