काव्यगीता अध्याय ५ : कर्म संन्यास योग (Karma Sanyaas Yog)
Tuesday, 27 July 1999
अध्याय ५ : कर्म संन्यास योग पार्थ म्हणे कर्म सोडण्यास तूच सांगतो । परि फिरुनी भक्तियुक्त कर्म तू प्रशंसतो । श्रेयस्कर काय पार्थ सांगण्यास विनवितो । कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१।। कर्म संन्यास एक एक कर्मयोग तो । दोन्ही मार्ग आक्रमोनी व्यक्ती मुक्ती साधतो । भक्तियुक्त कर्म परी त्यात श्रेष्ठ मार्ग तो ।
- Published in kavyageeta