काव्यगीता अध्याय ६ : ध्यान योग (Dhyaan Yog)
अध्याय ६ : ध्यान योग टाकुनी फलकामना कर्तव्यकर्माला स्मरावे । सार्थ या चिदआत्मरुपाला कसे समजून घ्यावे । खोल दडल्या आत्मसूर्याला कसे ते ओळखावे। कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१।। जाणते सन्यस्त होती टाकती उपभोग सारे । साधना अष्टांगयोगाची करोनी कर्म द्वारे । साधला हा योग त्याने भौतिका टाकून द्यावे । कृष्ण आता सांगती ध्यानात ते
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय ५ : कर्म संन्यास योग (Karma Sanyaas Yog)
अध्याय ५ : कर्म संन्यास योग पार्थ म्हणे कर्म सोडण्यास तूच सांगतो । परि फिरुनी भक्तियुक्त कर्म तू प्रशंसतो । श्रेयस्कर काय पार्थ सांगण्यास विनवितो । कर्म संन्यास योग कृष्ण सार्थ वर्णितो ।।१।। कर्म संन्यास एक एक कर्मयोग तो । दोन्ही मार्ग आक्रमोनी व्यक्ती मुक्ती साधतो । भक्तियुक्त कर्म परी त्यात श्रेष्ठ मार्ग तो ।
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यास योग (Dnyan Karm Sanyaas Yog)
अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यास योग काळे ज्यास अद्भूत ऐश्वर्यरूप । जयासी कळे ज्ञान कर्मस्वरूप । पुन्हा ना कधी तो हि जन्मासी आला । नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।१।। भयासाक्ती क्रोध त्यजूनी विचारी । पवित्र प्रगल्भ स्थिरे निर्विकारी । तयासी हरीची मिळे प्रेमलीला । नमस्कार साष्टांग पुरुषोत्तमाला ।।२।। जयाचा जसा भाव अभ्यंतरीचा । तसा
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यास योगांतर्गत अवतार मीमांसा (Yadaa Yadaa Hi )
अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यास योगांतर्गत अवतार मीमांसा आता सांगे तो माधव कधी अवतार होतो । कधी येई धरेवर सगुणात दृश्य होतो । जेव्हा घालीतसे साद धरा आर्त या स्वरात । तेव्हा अवतार घेई देव अद्भुत रुपात ।।१।। कली माततो जगात होई स्वैराचार रीत । जाई स्वधर्म पाताळी चढे अधर्म व्योमात । नीच राहतो सुखात राही
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय ३ : कर्म योग (Karma Yog)
अध्याय ३ : कर्मयोग धनंजयाच्या द्विधामतीला काही कळेना काय करावे । निरासक्तिची दीक्षा देई कृष्ण म्हणे पण युद्ध करावे । वासुदेव मग सांगे कैसे कर्त्यावाचून कर्म घडावे । फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।१।। साक्षात्कारी होण्या व्यक्ती दोनच रस्ते पुढ्यात असती । सांख्यांची ती आत्मप्रचीती योग्यांची कर्माची रीती । दोन्ही मार्गी एकच पूर्ती मी माझेपण
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे (Sthitapradnya Lakshane)
अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे अर्जुन वदला सांग केशवा स्थितप्रज्ञ या कसा दिसे । कसे बोलतो कसे चालतो लक्षण त्याचे काय असे । प्रश्न ऐकुनी उत्तर देता वासुदेव तो मनी हसे । धनंजया तुज ऐक सांगतो स्थितप्रज्ञ हा असा दिसे ।।१।। निश्चयात्मिका बुद्धी ज्याची दृढ हे ज्याचे ध्येय असे । बुद्धीला नच
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय २ : सांख्य योग (Sakhkya Yog)
अध्याय २ : सांख्य योग हा असतो आत्मा अविनाशी सर्वांचा । रे नकोस पार्थ मोह धरू देहाचा ।।ध्रु॥ का सुचला तुजला विचार भलत्या वेळी । अस्थानी मोह हा असतो संगरकाळी । तू त्याग मोह हा तुझा तुझ्या आप्तांचा । रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।१।। नामर्द म्हणोनी हसतिल तुजला वीर । संग्रामी सुटता तुझा
- Published in kavyageeta
काव्यगीता अध्याय १ : अर्जुनविषाद योग ( Arjun Vishad Yog)
अध्याय १ : अर्जुनविषाद योग अठरा अक्षौहिणी सैन्य हे संगरी जमले असता । संजय वदतो धृतराष्ट्राला युद्धभूमीची वार्ता ।। १।। कुरुक्षेत्रीच्या मध्यवरती वीर धनंजय जाता । संमोहित तो होई बघुनी स्वजना आणि आप्ता ।।२।। म्हणे केशवा उचले ना मज गांडिव धनु हे आता । कसे चालवू शर मी माझे साहे न मम चित्ता ।। ३।। भीष्म पितामह द्रोण कृपाळू
- Published in kavyageeta