अध्याय १ : अर्जुनविषाद योग  अठरा अक्षौहिणी सैन्य हे संगरी जमले असता । संजय वदतो धृतराष्ट्राला युद्धभूमीची वार्ता ।। १।। कुरुक्षेत्रीच्या मध्यवरती वीर धनंजय जाता । संमोहित तो होई बघुनी स्वजना आणि आप्ता ।।२।। म्हणे केशवा उचले ना मज गांडिव धनु हे आता । कसे चालवू शर मी माझे साहे न मम चित्ता ।। ३।। भीष्म पितामह द्रोण कृपाळू