तीन चार दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी मुंबईच्या बाहेर जायचं होतं. रस्ता माहिती नसल्यामुळे लगेच मॉडर्न ब्रह्मदेवाला म्हणजे गुगलला पत्ता विचारला आणि घरापासून मुक्कामापर्यंत जाण्याचा रस्ता सुद्धा. गुगलने मी कुठे आहे ते तर ओळखलंच पण माझ्या मुक्कामाला जाण्याचा सर्वात सोयीचा आणि कमी ट्राफिक असलेला रस्ताही दाखवला. ईश्वराने माणसाचं जीवन सुखकर बनावं यासाठी जी साधन निर्माण केली त्यात

देवाच्या पूजेसाठी हवी म्हणून फ़ुलं आणायला बाजारात गेलो. उत्सवाचे दिवस म्हणून फुलवाल्यांना अधिक मागणी होती. मी एका फुलवालीकडे गेलो आणि 5 रुपयाची फ़ुलं मागितली. मी काहीतरी जगावेगळं मागतोय अशा अर्थाचा चेहरा करून काही न बोलताच दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे ती वळली आणि तोंडानी ‘आता 5 रुपयाची फ़ुलं द्या म्हणे, दुसरा धंदा नाही का आम्हाला’ असं काहीतरी तिचं

मागच्या आठवड्यात सलूनमध्ये गेलो होतो केस कापायला. रविवार असल्यामुळे बरीच गर्दी होती आणि माझा नंबर दोन गिर्हाईकांनंतर लागणार होता म्हणून तिथेच बसलो. माझ्यासमोर एकाची दाढी कोरणे, एकाची दाढी करणे आणि एकाचं फेशिअल अशी तीन कामं चालली होती. ज्याचं फेशिअल चाललं होतं त्याच्याकडे जरा कुतूहलाने पहात होतो. बराच वेळ बरीच क्रीम्स तो सलूनवाला त्या गिर्हाईकच्या चेहेऱ्यावर

परवा youtube वर एक विडिओ पाहत होतो. त्यामध्ये वैमानिक अभियांत्रिकी (एरोनॉटिक इंजिनीरिंग) मध्ये काय प्रगती सुरु आहे या बद्दल चर्चा केली होती. अधिक जलद, अधिक ताकदीची, अधिक सुरक्षा असणारी, अधिक प्रवासी घेऊन जाणारी अशी विमानं बाजारात घेऊन येताना विमान कंपन्या किती चाचण्या करतात याचाही थोडा उहापोह त्या व्हिडिओमध्ये केला होता. सुरक्षेचे अतिशय कडक नियम पाळून

पु. ल. देशपांडे यांच्या ‘रावसाहेब’ या व्यक्तिरेखेमध्ये एक सुंदर वाक्य आलं आहे. पु. ल. कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत हे कळल्यावर त्यांना कानडी हेलात रावसाहेब प्रश्न विचारतात “ते मराठी मध्ये काय शिकवायचं असतं हो त्यांतं “. ते वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर मी खळखळून तर हसलोच आणि मन लगेच भूतकाळात गेलं. अगदी खरं सांगतो असे काही प्रश्न मलाही

मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि त्यातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स या विषयाशी अधिक निगडित असलेला. आमच्या अभ्यासक्रमात आम्हाला खूप इलेक्ट्रॉनिक्स च्या सर्किट्स चा आणि विविध सुट्या भागांचा अभ्यास होता. आम्ही विद्युतवाहक पदार्थ, विद्युतनिरोधक पदार्थ शिकलो. रेसिस्टर्स, कॅपॅसिटर्स, इन्डक्टर्स इत्यादी सुटे भाग, त्यांचे गुणधर्म, ते कसे बनवले जातात आणि त्यांचा सर्किट मध्ये कसा उपयोग होतो तेही शिकलो.

आज आमच्याकडे असलेला पाऱ्याचा थर्मामिटर चुकून फुटला. आणि त्यातला पारा जमिनीवर बारीक बारीक थेंब होऊन पसरला. थर्मामिटरच्या काचांचे तुकडे नीट व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावल्यानंतर माझा मोर्चा मी पाऱ्याकडे वळवला. मी हळू हळू एकेक थेंब एकत्र करायला लागलो. पाऱ्याची एक विशेषता असते. पाऱ्याचा एक थेंब दुसऱ्याजवळ नेला की क्षणार्धात ते दोन थेंब एकत्र

माझ्या कार्यक्रमांच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने खूप ठिकाणी प्रवासाचा योग येतो. प्रवास करून नंतर छान गरम पाण्याचा शॉवर हा एक परमानंद देणारा कार्यक्रम असतो. एकदा असंच जवळजवळ 10 तासांच्या प्रवासानंतर खूप रात्री उशिरा मुक्कामी पोहोचलो. नियोजकाने माझी राहण्याची सोय, काही कारणाने हॉटेल मध्ये न करता कुणाच्या तरी घरी केली होती. त्या यजमानांनी सर्व सोय खरोखर अप्रतिम

आमच्या घराजवळच एक पाटी लावलेली आहे. त्यावर पुढीलप्रमाणे ओळी आहेत. “विसंभर पलंबर. 5739201938. लिकेज पेशालीस” या एका पाटीवरून केवळ ‘लिकेज’ या शब्दामुळे ती पाटी एखाद्या पलंबर म्हणजेच प्लम्बरची असावी असा आम्ही बरेच दिवस कयास करत होतो. एकदा खरंच घराच्या वॉशबेसिन चा नळ अचानक लीक व्हायला लागला आणि आम्ही त्या पाटीवाल्या नंबरवर फोन लावला आणि त्या

मी ‘सोनी’ या जगद्मान्य कंपनीचे संस्थापक ‘अकिओ मोरिता’ यांचं “मेड इन जपान” हे पुस्तक वाचत होतो. दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण बेचिराख झालेल्या या देशात कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना ‘मासारु इबुका’ या सहसंस्थापकाबरोबर त्यांनी ‘सोनी’ सारखी कंपनी सुरु केली आणि नंतर ती जगाच्या पाठीवर एक बलाढ्य कंपनी म्हणून नावारूपाला आणली. पूर्वी “मेड इन जपान” ही ओळ