४६.१ बहिण पोस्टाने राखी पाठवायची तेव्हा तो तिला अंधश्रद्धाळू म्हणायचा. तीच राखी हातातून खाली पडली म्हणून परत उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि सीमापार असणाऱ्या शत्रूच्या गोटातून सु सु करीत आलेली लक्ष्यवेधी गोळी त्याच्या  डोक्यावरून त्याला इजा न करता निघून गेली…. ४६.२ दरवाज्यावर कुणाची तरी टकटक झाली तेव्हा तिने दार उघडल्यावर बाहेर अपेक्षा होती तोच होता.

गेल्या महिन्यात माझ्या व्यवसायाच्या काही कामानिमित्त अमेरिकेत गेलो होतो. तिथे गेल्यावर काम तर असतंच पण कामाव्यतिरिक्त सुहृदांच्या भेटीगाठी आणि गप्पा टप्पा यात दिवस कसे  भुर्रकन उडून जातात कळतच नाही. वेगवेगळे विषय निघतात चर्चा रंगतात गमतीदार अनुभव एकमेकांना सांगितले जातात. अशाच एका खास सुहृदांबरोबर एका संध्याकाळी एक छान चर्चा रंगली. मी ज्यांच्याशी गप्पा मारत होतो ते

४५.१ आपल्या गुरुजींचा पट्टशिष्य म्हणवून घेण्यासाठी त्याने गुरुजींसारखं गाण्याचा खूप प्रयत्न केला. पण गुरुजींसारखं तो कधीच गाऊ शकला नाही. जेव्हापासून  गुरुजींसारखं गायचं सोडुन गुरुजींनी शिकवलेलं गायला लागला तेव्हापासून लोक त्याला गुरुजींचा पट्टशिष्य म्हणून ओळखायला लागले. ४५.२ तो मैफिलीत रंग भरत होता. त्याचं स्वरचित्र पूर्ण होत आलं. आणि मग मैफिल ऐकायला नाही तर मैफिलीत ‘दिसायला’ आलेल्या

नुकताच घडलेला एक प्रसंग. मी रेल्वेमधून प्रवास करत होतो. माझ्यासमोरच एक ‘ज्येष्ठ नागरिक’ या गटात मोडणारी व्यक्ती बसली होती.  (हल्ली केश-कलपाच्या काळात कुणाला ‘वृद्ध’ म्हणायला धीर होत नाही. त्यापेक्षा ‘ज्येष्ठ नागरिक’ हा अधिक मनमिळावू आणि कमी भोचक शब्द हल्ली रूढ झाला आहे तोच वापरतो) तर  त्या ज्येष्ठ नागरिक व्यक्तीने आपल्या पाऊच मधून त्यांचं श्रवणयंत्र बाहेर

४४.१ पोत्यात माती भरता भरता तो आपल्या बायकोला म्हणाला,  “मी सावकाराच्या घरी जातोय खतासाठी पैसे मागायला, आलो परत तर या मातीत खत घालून आणि नाही आलो तर यात माझ्या देहाची राख घालून पसरायची ही माती आपल्या शेतात.”… ४४.२ अर्ध्या चड्डीत फिरतो म्हणून अक्ख गाव त्याला हसायचं. पण जेव्हा धरण फुटलं आणि त्याखाली गाव बुडालं तेव्हा

साहित्याचा नोबेल पुरस्कार ज्याला मिळाला असा स्पेन या देशातील कवी पाब्लो नेरुडा याची एक कविता आज वाचनात आली. वाचता वाचता त्याचा भावानुवाद स्फुरत गेला तो मराठी काव्यानुवाद  सुहृदांबरोबर वाटण्याचा हा प्रयन.    मूळ कविता ,    *You start dying slowly…* if you do not travel, if you do not read, If you do not listen

तीन चार दिवसांपूर्वी आमच्याकडे आमचे एक स्नेही आले होते. चर्चा  करता करता विषय परदेशात राहणारी पुढची पिढी आणि त्यांचे इथे एकटेच राहणारे म्हातारे आईवडील यावर आला. त्यांच्या सोसायटीतील अठ्ठावीस पैकी चोवीस फ्लॅट मध्ये पुढची पिढी परदेशात स्थायिक झाल्यामुळे त्या फ्लॅटमध्ये म्हातारं जोडपं किंवा मागे राहिलेलं दोघांपैकी कुणीतरी एक असे एकटेच राहत असल्याचं त्यांनी सांगितलं, आणि

अलक ४३.१ गुरुजींनी श्रीमदभगवद्गीतेतील संकल्पना समजावण्यासाठी एका हातात पटवलेली उदबत्ती आणि दुसऱ्या हातात पटवलेली सिगरेट पकडली आणि शिष्यांना म्हणाले,” धूर दोन्हीतून येतोय पण त्यातला फरक समजून घ्या. एक सत्वगुणी आहे आणि एक तमोगुणी. पण तुम्हाला मात्र व्हायचं आहे ते उदबत्ती आणि सिगरेट दोघांनाही एकामागोमाग एक पेटवून आपलं काम करून विझून जाणारी काडी. खरी कर्मयोगी स्थितप्रज्ञ”…

४२.१ कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा तेव्हा गाई आजूबाजूला ऐकायला गोळा व्हायच्या, असं आजी सांगायची, तेव्हा लहानपणी कृष्णाचं खूप कौतुक वाटायचं. आता मोठा झाल्यावर त्या गाईंविषयी आदर अधिक वाढलाय. चांगलं काय वाईट काय हे ही कळावं लागतं. ४२.२ परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला भारतात एकट्याच राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी फोनवरच विचारलं. “तू काही आता परत येत नाहीस

मी नुकताच एक प्रसंग ऐकला. एकदा पंढरीची पन्नास वर्ष वारी करणाऱ्या एका वारकऱ्याला कुणी एका चॅनेलवाल्या  अँकरनं खोचकपणे विचारलं,” आजोबा, एवढे कष्ट घेऊन, वेळ, पैसे खर्च करून पंढरीला येता पण इथे येणाऱ्या गर्दीमुळे विठुरायाचं दर्शन सुद्धा तुम्हाला नीट होत नाही. जेमतेम एका क्षणाच्या या दर्शनानं कशी काय भक्ती जडते आजोबा?” ते वारकरी आजोबा मोठे इरसाल