Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय १ : अर्जुनविषाद योग ( Arjun Vishad Yog)

काव्यगीता अध्याय १ : अर्जुनविषाद योग ( Arjun Vishad Yog)

by Rajendra Vaishampayan / Sunday, 28 March 1999 / Published in kavyageeta
अध्याय १ : अर्जुनविषाद योग 
अठरा अक्षौहिणी सैन्य हे संगरी जमले असता ।
संजय वदतो धृतराष्ट्राला युद्धभूमीची वार्ता ।। १।।
कुरुक्षेत्रीच्या मध्यवरती वीर धनंजय जाता ।
संमोहित तो होई बघुनी स्वजना आणि आप्ता ।।२।।
म्हणे केशवा उचले ना मज गांडिव धनु हे आता ।
कसे चालवू शर मी माझे साहे न मम चित्ता ।। ३।।
भीष्म पितामह द्रोण कृपाळू सामोरी मज दिसता ।
खांद्यावरती रमलो त्यांच्या विसरू कशी महत्ता ।।४।।
श्वशुर कुणी कुणी हे भाचे बंधू कुणी कुणी चुलता ।
कसे चालवू शस्त्र अस्त्र मी समोर असता भ्राता ।।५।।
मरणाअधीन होऊन सैनिक धारातीर्थी पडता ।
अश्रूंना मी कारण होईन शापातील त्या माता ।।६।।
नकोच कीर्ती यश हे मजला नकोच पापी सत्ता ।
मारुनि बांधव वडील जनांना काय अर्थ या वित्ता ।।७।।
जरी दुष्ट तो असेल शत्रू आततायी सर्वार्था ।
मारुनि त्यांना घेईन मी ते पापच माझ्या माथा ।।८।।
कुलानाशी हे कृत्यच अन मी झालो त्यांचा कर्ता ।
नरकाचा मी होईन भागी कोण उरे मज त्राता ।।९।।
अनर्थ घडतो त्यांच्या देशा कुलनाशी निपजता ।
संकर होतो वर्णांचा अन स्त्रिया होति पतिता ।।१०।।
म्हणुनी माधवा प्राणही नसती प्रिय हे मजला आता ।
वदुनि एवढे बसे धनंजय त्यागुनी धनु अन भाता ।। ११।।
राजेंद्र (?) २८ मार्च १९९९
  • Tweet
Tagged under: Adhayay 1, Bhagwad Geeta, Bhagwadgeeta, Kavya Geeta, अध्याय १, अर्जुनविषाद योग, काव्यगीता, भगवद्गीता

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय ९ – राजविद्या राजगुह्य योग (Rajavidya Rajaguhya Yog) 
काव्यगीता अध्याय २ : सांख्ययोगांतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणे (Sthitapradnya Lakshane)
काव्यगीता अध्याय ११ – विश्वरूपदर्शन योग (Vishwaroop Darshan Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP