आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्यावर खूप परिणाम होतो असा मानसशास्त्राचा एक सिद्धांत आहे. सर्व संत मंडळींनी म्हणूनच सत्संगतीचा महिमा गायला आहे. वातावरणाचा मनावर खूप परिणाम होतो आणि त्याच वातावरणातील लहरींशी मन एकरूप होण्याचा प्रयत्न करतं असं मानसशास्त्र मानतं.
आधुनिक जगात सर्वच बाबतीत संगणकीकरण सुरु आहे. डिजिटल जग सर्वच व्यापून दशांगुळं उरलं आहे. ध्वनी डिजिटल, छायाचित्र डिजिटल, चित्रपट डिजिटल, आता तर iPad वर चित्रकलाही डिजिटल झाली आहे. एक नाही अशा अनेक गोष्टींचं डिजिटलीकरण आपण ठायी ठायी पाहतो आहोत. या सगळ्या वातावरणातील डिजिटलीकरणामध्ये मानस शास्त्राच्या सिद्धांतानुसार आपलं मन ही डिजिटल व्हायला लागलं आहे असं नाही वाटंत ? आता मनाला एक तर शून्य (zero) किंवा पूर्ण (one) याच मापनात सर्व तोलायची आणि अनुभवायची सवय व्हायला लागली आहे असं नाही वाटंत?
गम्मत म्हणजे आतांचं प्रेमही डिजिटल झालं आहे. म्हणजे जमलं तर अगदी वाहून जातात आणि नाही जमलं तर लगेच पूर्ण ब्रेक उप. तसंच यश डिजिटल, नाती डिजिटल, इतकंच काय देव आणि देवाची भक्तीही डिजिटल झाली आहे. अगदी खऱ्यासारखी वाटणारी इलेक्ट्रिक समयी आली आहे आणि २४ तास जळत राहू शकेल अशी LED ची उदबत्ती सुद्धा. आता कुठलाही देव फ्री ऍप्स च्या माध्यमातून अगदी त्याच्या सर्वालंकारांसह , युनिक फिचरनी युक्त, आणि ऑन डिमांड दर्शन द्यायला प्रत्येकाच्या स्मार्ट फोन मध्ये केव्हाही उपस्थिती लावतो. आता पूजा डाउनलोड करता येते आणि आरती स्ट्रीम करता येते.
सोयीचा भाग सोडून द्या, पण डिजिटलीकरणामुळे सगळंच इतकं सोपं झाल्यावर मनाला तितिक्षा, यम, नियम याची सवय कशी लागेल? तिळाच्या तेलाचा सुगंध, कापसाच्या वातीमधला हळूवरपणा, उदबत्तीच्या धुरातलं पावित्र्य, शुभंकरोती मधली शांतता, रामरक्षेतली सुरक्षितता कशी समजेल?
ज्यावेळी मनाला या डिजिटलिकरणातून सुटका मिळेल त्याच वेळी कुणी समर्थ रामदास तळमळीनं मनाचे श्लोक समजावताना



