जीवन म्हणूनच बशीतून पितोय – १ जानेवारी २०१८ 

/ / bhavanuvad

मला माझ्या एका सुहृदाने आंग्लनववर्षाची शुभेच्छा म्हणून जॉन पॉल मुर ची एक सुंदर कविता पाठवली. मला अतिशय आवडली. वाचता वाचता त्याचा मराठीत भावानुवाद सुचला तो सर्वांबरोबर वाटावा असं वाटलं म्हणून हा संदेशप्रपंच 

 

मूळ इंग्रजी कविता अशी: 

 

_*Drinking From The Saucer*_

– John Paul Moore_

 

I’ve never made a fortune,

And I’ll never make one now

But it really doesn’t matter

‘Cause I’m happy anyhow. 

 

As I go along my journey

I’m reaping better than I’ve sowed

I’m drinking from the saucer

‘Cause my cup has overflowed. 

 

I don’t have a lot of riches,

And the going’s sometimes tough

But with kin and friends to love me

I think I’m rich enough. 

 

I thank God for the blessings

That His mercy has bestowed

I’m drinking from the saucer

‘Cause my cup has overflowed. 

 

He gives me strength and courage

When the way grows steep and rough

I’ll not ask for other blessings

For I’m already blessed enough. 

 

May we never be too busy

To help bear another’s load

Then we’ll all be drinking from the saucer

When our cups have overflowed.

 

मला सुचलेला मराठी भावानुवाद : 

 

छोटुसा माझ्या मनाचा पेला

आनंदाने भरून वाहतोय |

जीवन यथेच्छ भुरका मारत मी

म्हणूनच बशीतून पितोय ||धृ||

 

नशीब माझं उघडण्याची

 वेळ टळून गेल्ये |

आता प्रयत्न करायची सुद्धा

इच्छा गळून गेल्ये|

कशाला हवी धडपड तसंही

मी आनंदगीतच गातोय|

जीवन यथेच्छ भुरका मारत मी

म्हणूनच बशीतून पितोय ||2||

 

प्रवासात माझ्या कधी तसा

एकटाच नसणार मी |

पारख माणसांची करता करता

स्वतःशीच हसणार मी |

जाऊदे तसही कमी पेरून मी

आयतंच अधिक खातोय| 

जीवन यथेच्छ भुरका मारत मी

म्हणूनच बशीतून पितोय ||3||

 

श्रीमंती राहणी नव्हतीच कधी 

आयुष्यही होतं संघर्षमय|

सगेसोयऱ्यांच्या प्रेमामुळे मात्र

जीवन झालंय सुखमय|

यापेक्षा अधिक श्रीमंतीची 

अपेक्षाच कोण करतोय|

जीवन यथेच्छ भुरका मारत मी

म्हणूनच बशीतून पितोय ||4||

 

मनःशक्ती अन धैर्याचं दान

‘तो’ संघर्षात मला देतोय|

भरपूर दिलंय ‘त्यानं’ आधीच

मी कशाला अधिक मागतोय|

देवाच्या ऋणात धन्यवाद देत

काळ मजेत जातोय|

जीवन यथेच्छ भुरका मारत मी

म्हणूनच बशीतून पितोय ||5||

 

दुसऱ्याला मदत करण्यासाठी

कमतरता वेळेची कधीच नसो|

भार दुसयाचा पेलण्यासाठी

बाहूत ताकद सदा वसो|

प्रत्येकाचा प्याला आनंदाने वाहो

एवढंच मागणं मागतोय|

जीवन यथेच्छ भुरका मारत मी

म्हणूनच बशीतून पितोय ||6||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *