Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय ६ : ध्यान योग (Dhyaan Yog)

काव्यगीता अध्याय ६ : ध्यान योग (Dhyaan Yog)

by Rajendra Vaishampayan / Saturday, 02 October 1999 / Published in kavyageeta
अध्याय ६ : ध्यान योग 
 
टाकुनी फलकामना कर्तव्यकर्माला स्मरावे ।
सार्थ या चिदआत्मरुपाला कसे समजून घ्यावे ।
खोल दडल्या आत्मसूर्याला कसे ते  ओळखावे।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१।।
 
जाणते सन्यस्त होती टाकती उपभोग सारे ।
साधना अष्टांगयोगाची करोनी कर्म द्वारे ।
साधला हा योग त्याने भौतिका टाकून द्यावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।२।।
 
चित्त आत्म्यासी सुधारी तेच त्याला अंगिकारी ।
तोच आत्मा बद्ध होई रंगुनी विषयाविकारी ।
चित्त आत्म्याचा रिपु त्यानेच त्याचे मित्र व्हावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।३।।
 
चित्त ज्याने जिंकले आत्मा तयाचा मित्र होई ।
हाय खाई जो मनाशी त्यास आत्मा शत्रू होई ।
ध्यानयोगे याचसाठी विवश या चित्ता करावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।४।।
 
जिंकले ज्याने मनाला निर्विकल्पी लीन झाला ।
सौख्य आणि दु:ख यांचा भेद सर क्षीण झाला ।
शीत उष्णाची तमा ना मान अपमानाला स्मरावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।५।।
 
सार्थ म्हणती ज्ञान विज्ञानास ज्याने साध्य केले ।
इंद्रियांचे दमन करुनी समादृष्टी स्थीर झाले ।
कांचनाचे मृत्तिकेचे द्वैत न त्यासी उरावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।६।।
 
शत्रु वा सन्मित्र होवो साधू वा कपटी कुणी ।
सत्यवादी तो असो वा मिथ्यभाषी तो कुणी ।
ध्यानयोग्यासी परी ते सारखे सारे दिसावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।७।।
 
ईश्वराच्या पावलांशी चित्त ते एकाग्र व्हावे ।
विजनवासी होऊनी एकांत जागी स्थीर व्हावे ।
संग्रहाचा त्याग करुनी परीग्रहानाला त्यजावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।८।।
 
शांत एकांतात भूमी शुद्ध स्थानाला करावे ।
त्यावरी दर्भासनावरती मृगाजिन अंथरावे ।
घालूनी मृदुवस्त्र अंती आसनाला सिद्ध व्हावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।९।।
 
नासिकाग्री स्थीर दृष्टी ताठ कायेने बसावे ।
शीर मानेसी कण्यासी वक्र न होऊन द्यावे ।
भोगमुक्ती अचारुनी निर्भये ध्यानस्थ व्हावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१०।।
 
निराहारी वा अती आहार सेवी तो न योगी  ।
अतीनिद्रा सेवितो वा जागतो तो ही न योगी ।
विहाराचे आहाराचे युक्त बंधन आचरावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।११।।
 
ज्योत अविचल शांत जैसी राहते निर्वात जागी ।
शांत ती चिद्ज्योत तैसी राखतो ध्यानस्थ योगी ।
आत्मतत्वाच्या प्रभेने चित्त ते उजळून जावे ।
 कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१२।।
 
चित्त एकाग्री स्थिरोनी नित्य जो रममाण झाला ।
आत्मतत्वाला बघोनी आत्मतत्वी लीन झाला ।
इंद्रियांना जे कळेना सौख्य त्याने ओळखावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।। १३।।
 
आत्मतत्वी स्थीर जो तो शांत झाला स्तब्ध झाला ।
दु:ख या संकल्पनेच्या जाणिवेचा लोप झाला ।
लाभ होता चिदरूपाचा मागण्या काही नुरावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१४।।
 
कामनेने जन्मणाऱ्या वासना टाकोनी द्याव्या ।
धैर्यतेने बुद्धिमार्गे वृत्ती साऱ्या ओळखाव्या ।
धावऱ्या अपुल्या मनाला समाधीने आवरावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१५।।
 
शांत ब्रह्मी दृष्टी ज्याची वृत्ती त्याची स्थीर झाली ।
मी पराची द्वैतबुद्धी एकतत्वी लीन झाली ।
मी जगाचा विश्व माझ्या अंतरी उमजून जावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१६।।
 
चित्त माझे विश्व हे सामावण्याला योग्य व्हावे ।
भूतमात्रांच्या ठिकाणी मीच मजला ज्ञात व्हावे ।
ध्यानयोगे या स्थितीला पोचण्याचे यत्न व्हावे ।
कृष्ण आता सांगती ध्यानात ते कैसे रमावे ।।१७।।
 
राजेंद्र (?) ०२ ऑक्टोबर १९९९
  • Tweet
Tagged under: Bhagwad Geeta, Bhagwadgeeta, Kavya Geeta, काव्यगीता, भगवद्गीता

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय १२ – भक्तीयोग (Bhakti Yog) 
काव्यगीता अध्याय ९ – राजविद्या राजगुह्य योग (Rajavidya Rajaguhya Yog) 
काव्यगीता अध्याय ७ : ज्ञान विज्ञान योग (Dnyan Vidnyan Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP