Connect With Me: 0900 800 900

Rajendra VaishampayanRajendra Vaishampayan

  • Home
  • About Me
    • Innovator
    • Tabla Player
    • Samvadini Player
    • Software Engineer
    • Recording Engineer
    • Composer Arranger
    • Poet
    • Writer
    • Voice Over Artiste
    • Social Entrepreneur
    • Entrepreneur
    • Guru
    • Speaker
  • Photos
    • Solo Performances
    • Accompaniments
    • With Prominent Personalities
    • Certificates and Accolades
    • Press Coverage
    • CD Release Functions
    • Other Occassions
  • Videos
    • Video Blog
    • Performances
  • Marathi Blog
    • लेख
    • अलक (अति लघु कथा )
    • काव्यगीता
    • चित्र अलक
  • Contact Me
  • Buy Books
  • No products in cart.
  • Home
  • Blog
  • kavyageeta
  • काव्यगीता अध्याय ३ : कर्म योग (Karma Yog)

काव्यगीता अध्याय ३ : कर्म योग (Karma Yog)

by Rajendra Vaishampayan / Saturday, 24 April 1999 / Published in kavyageeta
अध्याय ३ : कर्मयोग 
 
धनंजयाच्या द्विधामतीला काही कळेना काय करावे ।
निरासक्तिची  दीक्षा देई कृष्ण म्हणे पण युद्ध करावे ।
वासुदेव मग सांगे कैसे कर्त्यावाचून कर्म घडावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।१।।
 
साक्षात्कारी होण्या व्यक्ती दोनच रस्ते पुढ्यात असती ।
सांख्यांची ती आत्मप्रचीती योग्यांची कर्माची रीती ।
दोन्ही मार्गी एकच पूर्ती मी माझेपण सरून जावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।२।।
 
नसते केवळ कार्यारंभी कर्मबंधानामधून मुक्ती ।
कर्माच्या त्यागाने केवळ न सिद्धी ना निरोधवृत्ती।
कर्मावाचुन देह त्रिगुणी कधी एक न क्षणी स्थिरावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।३।।
 
इंद्रिय कर्मामध्ये असता विषयाराधन करतो दांभिक ।
असून विषयांमध्ये अवयव आत्मचिन्तनि रमतो सात्विक ।
कर्माची पूजा बांधोनी निष्कर्माला दूर करावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।४।।
 
सकमतेने केल्या कर्मामधे जीव हा गुंतून राही ।
जन्ममृत्युच्या चक्रामध्ये पुन:पुन्हा तो  घेई ।
कर्मयज्ञ शेकडो करोनी विमुक्ततेचे यत्न्य करावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।५।।
 
अहंपणाचे हविर्द्रव्य अन आसक्तीची पडे आहुती ।
कर्माच्या या यज्ञामध्ये कुठली नाती कसली प्रीती ।
याज्ञभावना हेच जीवनी सर्व क्रियांचे वर्म असावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।६।।
 
कृतज्ञतेची एक भावना  यज्ञक्रियेची मूळ कल्पना ।
ज्याचे घ्यावे त्याला द्यावे कर्मयोग ही अर्चना ।
कर्मरुपाने त्याचे त्याला श्रद्धापूर्वक परत करावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।७।।
 
यज्ञक्रियेच्या  पूर्णत्वाने तेजस्वी मग कर्ता होतो ।
अग्नीसम तो भासमान अन संतोषी पण अलिप्त असतो ।
कर्माच्या स्वहाकारांना देउनि पौरोहित्य करावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।८।।
 
भावविव्हल या पर्जन्याने श्रद्धारूपी धन्य उगवते ।
कर्मयज्ञ हे घडून येता भावरुपाची वर्षा होते ।
म्हणुनि कर्माच्या यज्ञांचे सद्धर्मी संकल्प करावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।९।।
 
साक्षात्कारी असणाऱ्यांना कार्माचेही बंधन नसते ।
परंतु करण्या मार्गदर्शना कर्मवृत्ती हे साधन असते ।
निरासक्त होऊनी स्वत:च्या कर्तव्याचे ध्यान करावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।१०।।
 
नसे ईश्वरा असाध्य काही नसे प्राप्त ना करण्याजोगे।
सर्वश्री ऐश्वर्यरूपाच्या पायी लक्ष्मी विनम्र वागे ।
असे असोनि ईशाने का सृष्टितत्व निर्माण करावे ?।

फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।११।।

 

कर्मत्याग हा आसक्तांना सुधारण्याचा मार्ग नसावा ।
ज्ञानियाने आचरणाने भक्तिमार्ग हा विशद करावा ।
कर्माच्या निवृत्तीपेक्षा प्रवृत्तीचे बी रुजवावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।१२।।
 
कर्मयोग हा स्वधर्म जाणा आसक्ती परधर्म पाहुणा ।
स्वधर्म स्वाभाविकता आणि परधर्माचा फोल बहाणा ।
जाणुनी घ्यावा स्वधर्म आणिक परधर्माला टाकुनि द्यावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।। १३।।
 
स्वधर्म रक्षापालन व्हावे परधर्माची ओढ नसावी । 
अनुसरताना स्वधर्म अंतिम घटिका आली जरूर यावी ।
परधर्माच्या कभिन्न काळ्या वृत्तीचे सावटहि नसावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।१४।।
 
रजोगुणी उमटते कामना कामुक होता क्रोध जन्मतो ।
हाच क्रोध मोही बुद्धीला पापकर्म तो बाले घडवितो ।
कर्म घडे दोन्ही वेळेला सत्व रजाचे भान असावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।१५।।
 
धूर जसा अग्नीला ग्रासे वार जशी गर्भाला फासे ।
दर्पण जसा धुळीने निष्प्रभ काम तसा आत्म्याला त्रासे ।
इंद्रिय माती मनाच्या सदनी कामाचे स्वस्थान नसावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।।१६।।
 
रज तम सत्वाच्या त्रिगुणांना पार करोनी शरणा जावे ।
स्वधर्म नीती पळूनी कर्माच्या मार्गांनी विमुक्त व्हावे ।
कर्ममार्गि ते चित्त ठेउनी इशार्पण त्याचे फल व्हावे ।
फलश्रुतीची आस सोडुनी कर्मासाठी कर्म करावे ।। १७।।
 
राजेंद्र (?) २८ एप्रिल १९९९
  • Tweet
Tagged under: Adhayay 3, Bhagwad Geeta, Bhagwadgeeta, Karma Yog, Kavya Geeta, काव्यगीता, भगवद्गीता

About Rajendra Vaishampayan

What you can read next

काव्यगीता अध्याय ८ – अक्षरब्रह्म योग (Akshar Brahma Yog)
काव्यगीता अध्याय ४ :  ज्ञानकर्मसंन्यास योगांतर्गत अवतार मीमांसा (Yadaa Yadaa Hi )
काव्यगीता अध्याय ११ – विश्वरूपदर्शन योग (Vishwaroop Darshan Yog)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • GET SOCIAL
Rajendra Vaishampayan

© 2023 All rights reserved. Designed & Developed by Sonic Softech

TOP